ज्वारी
ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य धान्य आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य व जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
ज्वारी पूर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी बनवून खाल्याजाता. याचे बी लघवीच्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते.
ज्वारी हे अस धान्य आहे जे लहान पासून ते मोठ्या व्यक्ति पर्यंत सगळ्याना चालते. गहू नंतर ज्वारीचा जास्त वापर केला जातो. बऱ्याच लोकांची ज्वारीची भाकर ही आवडीची आहे. व ती पचायला ही सोपी आहे. ज्वारी मध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. ज्वारीचा वापर नुसताच पिठाची भाकरी म्हणूनच केला जात नाही तर त्या पासून विविध प्रकारचे पदार्थ बनविले जातात.
आपल्या देशात ज्वारी सर्वत्र पिकते. महाराष्ट्रात विविध खेड्यांत ज्वारी हे रोजचे अन्न आहे. गुजरात, खानदेश, धारवाड या राज्यातही ज्वारीचा वापर भरपूर प्रमाणात होतो. लाल व पांढरी असे ज्वारीचे दोन प्रकार आढळतात. याशिवाय सोलापुरी, गुंदळी, चोपडी, शाळू व खानदेशी अशाप्रकारचा ज्वारी आढळते.
ज्वारी लागवड माहिती :
1) रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींचीच पसंती करावी. हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन-3, फुले अनुराधा, व मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1, व भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती व परभणी मोती या जाती निवडाव्या. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड केली पाहिजे.
2) रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उतारानुसार 10×12 चौ.मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. अथवा 2.70 मीटर अंतरावर उताराला आडवे सारा यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत.
3) पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंतच केली पाहिजे.
4) प्रतिहेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. व नंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
5) पेरणीसाठी 45 x 15 सें.मी. अंतर ठेवावी.
6) बागायती पिकासाठी चांगल्या जमिनीस एकूण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश पेरणी सोबत पेरून द्यावे. राहीलेले 50 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. मध्यम जमिनीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र सगळी स्फुरद व पालाश पेरताना द्यावा व उर्वरित 50 टक्के नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसानी द्यावी.
7) कोरडवाहू हलक्या जमिनीत पिकाकरीता हेक्टरी 25 किलो नत्र पेरतेवेळी पेरून द्यावे.
8) ज्वारी पीक पेरतेवेळी दोन चाडी पाभरीचा वापर करावा.
सर्व सरकारी शेतकरी योजनांची माहिती सर्वात आधी माहीत जाणून घ्या, आजच आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आम्हाला तुमच्या पर्यंत माहिती पोहचवण्याची संधी दया ! धन्यवाद
ज्वारी पेरणी:
पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. 4) प्रतिहेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. नंतर प्रति 10 किलो बियानात 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
ज्वारी खाण्याचे फायदे:
सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन करावे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम व मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
वाढत्या प्रदुषणामुळे व दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी व गर्भाशयाच्या समस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. अशा समस्यांमुळे आहारात ज्वारी खुप महत्वाची ठरते.
ज्वारीत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात ज्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपाती पेक्षा आहारात ज्वारीची भाकरी खावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा आजार देखील बरा होण्यास मदत होते.
ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात ज्वारीचा समावेश केल्यास फायदा होतो.
सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होतो.
●मालदांडी ज्वारी
खरीप हंगामात पावसाने चांगली साथ दिल्याने जिरायती भागात हमखास रब्बी हंगामात मालदांडी ज्वारीचे पीक घेतले जाते. येथील लोणीभापकर, मोरगाव, सुपे, उंडवडी कडेपठार मंडळामध्ये मालदांडी ज्वारीचे पीक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. येथील शेतकऱ्यांनी मालदांडी ज्वारीचे बियाणे परंपरेने सांभाळून ठेवले आहे. टपोरे दाणे, कसदार कडबा व चवदार भाकरीमुळे मालदांडी ज्वारीला भरपूर प्रमाणात मागणी आहे. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक आहे. जिरायती भागात बहुतांश दुग्धव्यवसाय मालदांडीच्या कडब्यावर आधारीत असता. ज्या शेतकऱ्याकडे जनावरांची संख्या अधिक आहे, असे शेतकरी हमखास मालदांडी ज्वारीचे पीक भरपूरप्रमाणात घेतात.
●उन्हाळी ज्वारी लागवड
उन्हाळी ज्वारीच्या बियाण्यास थायामेथाेक्झाम (७०%) ३ ते ५ ग्रॅम प्रति किलो प्रक्रिया करावी. यामुळे खोडमाशीने होणारी पोंगेमर कमी होते झाडाचा जोम वाढण्यास मदत होते. उन्हाळी ज्वारी ही ओलिताखालीच घेतली जात असल्यामुळे व ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळींतील अंतर ४५ सेंटिमीटर (१८ इंच) असावे.
●ज्वारी मध्ये कोणता मुख्य पदार्थ जास्त प्रमाणात आढळतो
ज्वारीमध्ये कर्बोदके, ऊर्जा, तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे ती शक्तीवर्धक व पचण्यास सुलभ आहे. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स (रक्तातील साखरेची पातळी वाढविण्याची क्षमता) कमी असल्याने मधुमेहांच्या रुग्णासाठी ज्वारीचे सेवन उत्तम ठरते. ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, नायसिनचे प्रमाण जास्तप्रमाणात आहे.
●ज्वारीच्या जातींची नावे
भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित.
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी १०-१२ क्विं. व कडबा २५-२७ क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 12-15 क्विं. व कडबा ३०-३२ क्विं.
●ज्वारीच्या सुधारित बियाणांची नावे
ज्वारी पिकाचे सर्वोतकृष्ट ८ वाण : Jowar Seed Variety In Maharashtra
1)मालदांडी ३५-१ (एम-३५-१)
प्रसारण वर्ष – एसओ (ई) सन 1984 • लागवडी करिता शिफारस – रब्बी हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक, व आंध्र प्रदेशातील दख्खनच्या पठारान मध्ये या वाणाची पेरणी करता येते. • जमिनीचा प्रकार- मध्यम • कालावधी-१२५ ते १३५ दिवस • वाणाचे गुणधर्म- उंची १८०-२००
सेंटीमीटर कणीस घट्ट व अंड्याच्या आकाराचे, दाण्याचा रंग मो त्याप्रमाणे पांढरा, व दाणा मोठा.
2)परभणी मोती पीव्हीआर-३९६ (एस पी व्ही १४११ ) :
• प्रसारित वर्ष- सन २००२ • लागवडी करिता शिफारस –
महाराष्ट्रात रब्बी हंगामात, बागायती व कोरडवाहू क्षेत्राकरिता
● जमिनीचा प्रकार – मध्यम व चांगल्या प्रकारची जमीन • – एकूण १२६ते १२९ दिवस कालावधी.
●वाणाचे गुणधर्म- या ज्वारी ची उंची १९०-२०० सें.मी. इतके, कणीस मध्यम घट्ट लांबट टोकाकडे बोथट, दाण्याचा रंग मोत्याप्रमाणे पांढरा चकाकणारा असणार.
● सरासरी उत्पादन- या वाणाची कोरडवाहू उत्पन्न प्रति हेक्टरी १७ क्विंटल, तर बागायती क्षेत्रासाठी प्रति एकरी ३२ क्विंटल इतके उत्पादन मिळते
3)फुले रेवती आरएसव्ही-१००६ (एसपीव्ही) १८३० :
• प्रसारण वर्ष-२००९
• लागवडी साठी शिफारस – बागायती क्षेत्रात रब्बी हंगामात • जमिनीचा प्रकार – मध्यम व भारी
• कालावधी-११८ते १२० दिवस
• वाणाचे गुणधर्म- या वाणाका ज्वारी उंची २२०-२४० सेंटी मीटर इतके असते कणीस मध्यम व घट्ट, सम प्रमाण असलेल्या आकाराचे, केसाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा
• सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल इतके आहे.
4) फुले वसुधा आरएसव्ही-४२३ ( एसपीव्ही-१७०४)
• प्रसारण वर्ष – २००७
●लागवडी करिता शिफारस – महाराष्ट्रातील कमी पावसाच्या व हमखास पावसाच्या प्रदेशात करिता रब्बी हंगामात या वाणाची शिफारस केली आहे
• जमिनीचा प्रकार – भारी प्रकारची जमीन
• कालावधी-११६-१२० दिवस
• वाणाचे गुणधर्म- कणीस माध्यम घट्ट, वरवंटा च्या आकाराचे,
केसाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा • रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील • कीड प्रतिकारक्षमता- खोड मासी पासून संरक्षण • सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी कोरडवाहू जमिनीसाठी २५-२८ क्विंटल, बागायतीसाठी ३०-३५ क्विंटल उत्पादन मिळते.
5) पीकेव्ही क्रांती एकेएसव्ही -१३ आर :
• प्रसारण वर्ष -२००४
• लागवडी करिता शिफारस – रब्बी हंगामातील महाराष्ट्र बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रकरिता
• जमिनीचा प्रकार- भारी
• कालावधी-१२०-१२२ दिवस
• वाणाचे गुणधर्म- या ज्वारीची ऊंची २३५-२४० से.मी कणीस मध्यम व अंड्याच्या उलट आकाराचे, दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा
• रोग प्रतिकार क्षमता- पानावरील करपा या रोगास किडीस सहनशील असतो.
• कीड प्रतिकारक्षमता – खोडमाशी व खोडकिडा या किडीस सहनशील असतो.
• सरासरी पीक- प्रती हेक्टरी कोरडवाहू क्षेत्रात २४-२५ क्विंटल, बागायती जमिनीसाठी ३३-३४ क्विंटल इतके उत्पन्न मिळते.
6)फुले चित्रा आरएसव्ही-२३७ ( एसपीव्ही-१५४६)
• प्रसारण वर्ष – २००६ • लागवडी करिता शिफारस – पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागाकरिता कमी पावसाच्या क्षेत्रास रब्बी हंगामात • जमिनीचा प्रकार- मध्यम • कालावधी-११८-१२२ दिवस • वाणाचे गुणधर्म- या ज्वारीची उंची २००-२२० सेंटी मीटर इतकी असते.
कणीस मध्यम घट्ट, आकार अंड्या सारखा, केशाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा चकाकणारा. • रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील करते • कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी या किडस सहन करते • सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी उत्पन्न ३०-३२ क्विंटल मिळते.
7) फुले सुचित्रा आरएसव्ही-१०९८ एसपीव्ही-२०४८)
जमिनीचा प्रकार- मध्यम • कालावधी-१२०-१२५ दिवस
• वाणाचे गुणधर्म- कणीस मध्यम आकाराचे घट्ट, घंटा सारख्या आकाराचे, केसा दाण्याचा रंग मोत्याप्रमाणे पांढरा असतो.
• रोग प्रतिकार क्षमता- तांबेरा व
करते
• कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी व खोडकिडा या किडीस सहनशील
• सरासरी उत्पादन- या वाणाची प्रति हेक्टरी उत्त्पन कोरडवाहू क्षेत्रासाठी २०-२५ क्विंटल होते.
8) फुले अनुराधा आरएसव्ही-४५८ ( एसपीव्ही-१७०९)
• प्रसारण वर्ष – २००८ • लागवडी करिता शिफारस – पश्ि महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्राकरिता रब्बी हंगामासाठी • जमिनीचा प्रकार- हलकी • कालावधी-१०५-११० दिवस • वाणाचे गुणधर्म- कणीस मध्यम आकाराचा घट्ट, अंड्याच्या आकाराच्या केसाळ दाण्याचा रंग मोत्याप्रमाणे. • रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील करते • कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी खोड किडा यास सहनशील.
9) सी.एस.व्ही 22 । hybrid jowar –
पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.
दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली.
खोडमाशीस प्रतिकारक्षम.
भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 10-12 क्विं. व कडबा 25-27 क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 13-14 क्विं. व कडबा 30-32 क्विं.
10) परभणी मोती –
पक्व होण्याचा कालावधी 125 ते 130 दिवस.
दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 7 क्विं. व कडबा 22-23 क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 13 क्विं. व कडबा 25-26 क्विं.
11) फुले रेवती –
पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार.
भाकरीची चव उत्कृष्ट.
कडबा पौष्टीक व अधिक पाचक.
भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस.
धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 17-18 क्विं. व कडबा 38-40 क्विं.
12) मालदांडी 35-1 –
मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस.
पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
दाणे चमकदार, पांढरे.
भाकरीची चव चांगली.
खोडमाशी प्रतिकारक्षम.
धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 6-7 क्विं. व कडबा 23क्विं.
13) फुले उत्तरा –
हुरड्याची अवस्था येण्यास 90-100 दिवस.
हुरड्यासाठी शिफारस.
भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.
सरासरी 70-90 ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
हुरडा चवीस उत्तम, अत्यंत गोड, शिवाय ताटेदेखील गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
14) फुले पंचमी –
लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) 87.4 टक्के.
लाह्या भरपूर प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात.
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी लाह्यांसाठी प्रसारित.
●शेतकरी मित्रांनो हे सर्व ज्वारीचे वाण रब्बी हंगामात १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर पर्यंत पेरणी करावे. या ज्वारीची पेरणी तिफणीने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करू शकता २ ज्वारीच्या रोपांमधील अंतर कोरडवाहू ४५ *१५ सेंटीमीटर तर बागायतीसाठी ४५*१२ सेंटी मीटर इतके अंतर असावे याची काळजी घ्या. ज्वारी पेरणी करताना आपले ज्वारीचे बियाणे जमिनीचा ती खोल जाण नाही याची दक्षता घ्या ज्वारीचे बियाणे जमिनीमध्ये ५ सेंटी मीटर इतके खोलवर जातील एवढेच पेरणी यंत्राचे सेटिंग करा वरील वाणाचे तुम्ही जर पेरणी करत असाल तर प्रति हेक्टरी १० किलो बियाणे पडले पाहिजेत. पेरणी करताना जे आपण खत वापरतोय त्या खतांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश, या तिन्ही घटकांचा समावेश असलेले खत पेरावे. उपरोक्त सर्व माहिती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांच्या रब्बी सुधारित ज्वारी पिकाच्या वेगवेगळ्या वाणांच्या
लागवडीबाबत व गुणधर्माविषयी संक्षिप्त माहिती यात त्याच्या साह्याने हा लेख लिहिला आहे. हा महत्त्वपूर्ण लेख तुम्ही वेळ काढून इथपर्यंत वाचलात त्याबद्दल धन्यवाद लेख आवडला असेल तरी इतर मित्रांना नक्की शेअर करा.
ज्वारी पीक बाजार भाव
Rs 5350 / क्विंटल
FAQ
1)ज्वारीच्या जाती किती?
उत्तर- गावरान ज्वारीचे प्रकार दगडी,गळादाबी,लाल ज्वारी,झिपरी,सेन्द्री,काळगोंडी,पांढरगोंडी,पिवळीगोंडी
2)उन्हाळी ज्वारी लागवड कधी करावी?
उत्तर- पेरणीचा कालावधी : उन्हाळी हंगामातील ज्वारीची काढणी पावसाच्या पूर्वी म्हणजेच मे महिन्यापर्यंत झाली पाहिजे. त्या करिता पेरणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. पेरणी करताना रात्रीचे तापमान १० ते १२ अंश से. पेक्षा जास्त असावे.
3)ज्वारी किती दिवसात येते?
उत्तर- 708 ही जात 115 ते 120 दिवसांत बनते.
4)ज्वारी कशासाठी वापरली जाते?
उत्तर- धान्य ज्वारी हे एक गवत आहे जे पशुधनांना खायला वापरले जाते व आपण खातो त्या अन्नासाठी पीठ बनवले जाते. हे पांढरे, टॅन, केशरी, लाल, कांस्य व काळ्या रंगात येते. लाल, नारिंगी व कांस्य ज्वारी पशुखाद्यापासून ते इंधनापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरण्याइतपत बहुमुखी आहे.
5)ज्वारीची लागवड किती अंतरावर करायची?
उत्तर- पंक्तीमधील अंतर प्रदेशानुसार बदलते, परंतु धान्य ज्वारीसाठी पंक्तीतील अंतर जे बहुतांश वातावरणात बसते ते 30 इंच असते. एक 30-इंच पंक्ती अंतर कमी कालावधीत दुष्काळात साठवलेले पाणी पुरवण्यासाठी प्रकाश अडथळे व पुरेशी मातीची मात्रा यांचे चांगले संयोजन प्रदान करते.
6)ज्वारीमध्ये काय आहे?
उत्तर- ज्वारी हे एक वनस्पती-आधारित प्रथिने आहे ज्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट समृद्ध आहे व शिफारस केलेल्या आहाराची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करू शकते. हे प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी 6, नियासिन, मॅग्नेशियम व फॉस्फरस यांनी भरलेले आहे जेणेकरुन निरोगी शरीरास मदत होईल.
7)गोमेद ज्वारी सुरक्षित आहे का?
उत्तर- संपूर्ण धान्य म्हणून, गोमेद ज्वारी नक्कीच निरोगी व संतुलित आहारात बसते .
गाई-म्हशी ना कमी दूध देण्याचे कारण काय?
दही खाण्याचे फायदे कोणते आहेत ?
अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा
कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका, अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत