अधिक उत्पादनासाठी उन्हाळी भुईमुग लागवड कशी करावी?

भुईमुग

भुईमुग शेंगा मधून काढलेले शेंगदाण्यांना इतके महत्व आहे की शेंगदाण्यांना गरीबाचे काजू म्हणतात. दैनंदिन जीवनात आहारात शेंगदाणे खुप महत्वाचे आहेत.
विविध आमटी, चटणी, चिक्की, चिवडा यामध्ये मुख्तात्वे शेंगदाणे वापरतात. शेंगदाणे भाजुन ,भिजवून वापरतात.

अधिक उत्पादनासाठी उन्हाळी भुईमुग लागवड कशी करावी?
summer groundnut

●उन्हाळी भुईमुग लागवड माहिती

लागवड तंत्रज्ञान : जमीन : भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. ज्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन मुळया चांगल्या प्रकारे जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

●उन्हाळी भुईमुग किती दिवसात निघतो

उन्हाळी भुईमूग मे महिन्याअखेर पर्यंत निघणे आवश्यक असते. त्याकरिता ११० – ११५ दिवसांत परिपक्व होणाऱ्या उपट्या प्रकारातील जातीची निवड करावी. उन्हाळी हंगामाकरिता टीएजी २४ व एसबी अकरा या जातींची निवड करावी. TAG – २४ ही जात लवकर (उन्हाळी हंगामात ११० – ११५ दिवसांत) परिपक्व होते.

उन्हाळी मिरची लागवड कशी करावी संपूर्ण माहिती

उन्हाळी भुईमुग जाती

1)एस.बी. – ११ • वाण – एस.बी. – ११ • प्रसारीत वर्ष – १९६५ • प्रकार – उपट्या • जमीन – मध्यम ते हलकी • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
2) टीएजी – २४ • वाण – टीएजी – २४ • प्रसारीत वर्ष – १९९१ • प्रकार – उपट्या • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
3) जे.एल. – २८६ (फुले उनप) • वाण – जे.एल. – 286 (फुले उनप) • प्रसारीत वर्ष – 2004 • प्रकार – उपट्या • जमीन – मध्यम – हलकी • हंगाम – खरीप व उन्हाळी
4) वाण – टिपीजी – ४१ – • वाण – टिपीजी – ४१ • प्रसारीत वर्ष – २००४ • प्रकार – उपट्या • जमीन – मध्यम ते हलकी • हंगाम – उन्हाळी हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्राकरिता प्रसारीत
5) वाण – जे. एल. – ५०१ • वाण – जे. एल. – 501 • प्रसारीत वर्ष – 2009 • प्रकार – उपट्या • जमीन – मध्यम ते हलकी • हंगाम – खरीप व उन्हाळी
6) वाण – फुले उन्नती (आर एच आर जी ६०८३) • वाण – फुले उन्नती (आर एच आर जी ६०८३) • प्रसारीत वर्ष – २०१२ • प्रकार – उपट्या • जमीन – मध्यम ते हलकी • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
7) वाण – फुले ६०२१ (आर एच आर जी ६०२१) • वाण – फुले ६०२१ (आर एच आर जी ६०२१) • प्रसारीत वर्ष – २०११ • प्रकार – उपट्या • जमीन – मध्यम ते हलकी • हंगाम – खरीप आणि उन्हाळी

PM विश्वकर्मा योजना: PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

●उन्हाळी भुईमुग बियाणे अनुदान

योजनेमध्ये भुईमूग TAG-24 प्रमाणित वाणाचे बियाणे उपलब्ध आहे. या बियाण्याची २० किलोच्या बॅगेची मूळ किंमत ३१४० रुपये असून, यासाठी 1000 रुपये अनुदान दिले जाते . त्यामुळे शेतकऱ्यांना हे बियाणे अनुदानित एक्व्वीशे चाळीस रुपये प्रति बॅग या अनुदानित दराने मिळेल.

उन्हाळी भुईमुग लागवड

भुईमूग हे तेलबियावर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. भुईमूग पिकाची तीनही हंगामांमध्ये लागवड करता येते. खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले, तरी उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे रोग आणि किडींची समस्या कमी प्रमाणात उद्‍भवते. ओलिताची व्यवस्था असल्यास तसेच व्यवस्थित नियोजन केले तर चांगले उत्पादन मिळते . उन्हाळ्यामध्ये भुईमुगाबरोबर तीळ, बाजरी, मूग आणि चवळी इत्यादी आंतरपिके अथवा मिश्रपीक म्हणून घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त पाहिजे . फुलोरा येण्याच्या अवस्थेमध्ये दिवसा तापमान २४ – २५ अंश सेल्सिअस एवढे आवश्यक आहे . उशिरा पेरणी केल्यामुळे फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते. याचा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

●उन्हाळी भुईमुग खत व्यवस्थापन –

जमिनीत शेवटच्या वखराच्या पाळी करण्या पूर्वी शेण खत वावरात पसरून द्यावे. त्यापासून झाडास लागणारी अन्नद्रव्य हळूहळू मिळतात. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा साठा वाढून जलधारण शक्ती वाढते.

.उन्हाळी तीळ लागवड कशी करावी संपूर्ण माहिती.

●उन्हाळी भुईमुग तणनाशक

नायट्रोफेन + फ्लुक्लोरालिन @ 0.7 kg ai आणि 0.5 kg ai / हेक्टर मिश्रण पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत भुईमुगाच्या विविध तणांचे प्रभावीपणे नियंत्रण करते.

●उन्हाळी भुईमुग पाणी व्यवस्थापन

भुईमुग पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी एक पाणी (आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ – १० दिवसाचे अंतराने १० – १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आश्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याची कमतरता पडू देवू नये..

बहुपयोगी शेवगा शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती.

 

●भुईमुगाच्या शेंगा फोडायची मशीन

हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे व मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्या- करिता शेंगा फोडणी यंत्र निर्माण केले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची आणि खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत 4 पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूला वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला 3 खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत 4 ते 5 किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात. शेंगांच्या आकारमानाप्रमाणे जाळी बदलता येते, शिवाय जाळी आणि ब्रश यातील अंतर कमी – जास्त करता येते.

शेंगदाणा खाण्याचे फायदे:

1. भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते.

2. यामध्ये असलेले

कैल्शियम,

विटामिन A आणि

प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते

3. दररोज भिजलेले शेंगदाणे खालल्या मुळे ब्लड शुगरवर नियंत्रित राहते.

यामुळे तुम्ही डायबिटीज सारख्या आजारा पासून वाचता.

4. फाइबर ने भरपूर शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने पचन तंत्र चांगले राहते.

थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी व उर्जा मिळते

5. यामधे

पोटेशियम,

मैग्नीज,

कॉपर,

केल्सियम,

आयरन,

सेलेनियम गुणांनी भरपूर असलेले शेंगदाणे भिजवून खाली पोटी खाण्यामुळे गैस व एसिडीटी च्या समस्या दूर होतात.

6. थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे व गुळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.

7. लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन – सी मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते व स्मरणशक्ती चांगली होते.

8. शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा व स्फूर्ती मिळते.

9. शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला व भूक न लागणे या समस्या दूर करते.

10. रोज मुठ भर शेंगदाणे खाल्ल्या मुळे महिला कैंसर पासून दूर राहतात.

कारण यामध्ये असलेले

एंटीऑक्सीडेंट,

आयरन,

नियासिन,

फोलेट,

कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.

11. शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांसाठी पण चांगले असते.

हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.

12. जेवणा नंतर जर 50 अथवा 100 gm शेंगदाणे खाल्ले तर बॉडी बनते,

भोजन पचते, रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये

प्रोटीन,

फैट,

फाईबर,

खनिज,

विटामिन आणि एन्टीऑक्सीडेंट असते.

शेंगदाणा तेल वापरण्याचे फायदे:
शेंगदाणा तेलामध्ये नारळ अथवा पाम तेलापेक्षा कमी संतृप्त चरबी असते.

संधिवात, सांधेदुखी, कोरडी त्वचा, एक्जिमा व इतर त्वचेच्या समस्यांसारख्या त्वचेच्या स्थितीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

ते उच्च उष्णता सहन करू शकते व म्हणून स्टिअर-फ्राय डिश शिजवण्याकरिता हा एक चांगला पर्याय असू शकतो.

टरबूज / कलिंगड लागवडीविषयी संपूर्ण माहिती

●यंत्राची वैशिष्ट्ये

एका तासात एक मजूर सरासरी 60 – 70 किलो शेंगा सहजपणे व जास्त मेहनत न करता फोडू शकतो.

शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा वाचतो.

यंत्राने शेंगा फोडल्यास 6 ते 8 % फूट होते; मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.

यंत्रातून निघालेले सर्व शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

● उन्हाळी भुईमुगचे बाजार भाव

नवीनतम बाजार दरांनुसार, सरासरी भुईमुगाची किंमत ₹6338.17/क्विंटल आहे. सर्वात कमी बाजारभाव ₹4516/क्विंटल आहे. सर्वात महाग बाजारभाव ₹7377/क्विंटल आहे.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: