मुळा (Radish)
मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक प्रकारचा कंद आहे.याची भाजी, कोशिंबीर अथवा पराठे करतात. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास आहे.मुळा मधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळता असतो.
मुळ्याची पानांची भाजी ही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे करतात. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी’ केली जाते. बहुतेक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी बनवतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) व थालिपीठेही करतात.
शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस व लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस व बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न पचनहोते.
मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास लवकर फरक पडतो.
थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.
मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने लघवी व शौचास साफ होते.
सर्व सरकारी शेतकरी योजनांची माहिती सर्वात आधी माहीत जाणून घ्या, आजच आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आम्हाला तुमच्या पर्यंत माहिती पोहचवण्याची संधी दया ! धन्यवाद
मूळव्याध असलेल्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्याचा रस दिल्याने लाभकारी ठरतो. मुळ्याच्या कंदांपेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.
मुळा लागवड
मुळ्याची विक्रीसाठी लागवड रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान बियांची पेरणी करावी.
1) मुळ्याची लागवड करताना दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सें.मी. व 2 रोपांमधील अंतर 8 ते 10 सें. मी. ठेवा.
2) मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात अथवा सरी वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यामधील अंतर मुळ्याच्या जातीवर निर्धारित असते.
3) युरोपीय जातीसाठी हे अंतर 30 से. मी. ठेवतात, तर आशियाई जातीकरिता 45 सें. मी. इतर ठेवतात. वरंब्यावर 8 से.मी. अंतरावर 2-3 बिया टोकन करून पेरणी करतात. सपाट वाफ्यात 15-15 सें. मी. अंतरावर लागवड करतात.
4) बियांची पेरणी 2-3 से.मी. खोलीवर करावी. पेरणीपूर्वी जमिनीत ओलावा असावा. कमी अंतरावर लागवड केल्याने मध्यम आकाराचे मुळे मिळून उत्तपन अधिक मिळते. मुळ्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 10 – 12 किलो बियाणे लागते.
मुळा शेतीसाठी तापमान –
मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते; परंतु चांगला स्वाद व कमी तिखटपणा येण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असावे.
जमीन कशी असावी –
वाढ चांगली होण्यासाठी लागवडीसाठी जमीन भुसभुशीत असावी. योग्य मशागत करा नाहीतर मुळ्याचा आकार वाकडा होत व त्यावर असंख्य तंतू मुळे येतात. मुळ्याची लागवड अनेक प्रकारच्या जमिनीत करता येते, तरी मध्यम ते खोल भुसभुशीत अथवा रेताड जमिनीत मुळा अधिक पोसतो. चोपण जमिनीत मुळ्याची लागवड करू नये.
मुळा जाती:
पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, जपानीज व्हाईट व गणेश सिथेटिंग या मुळ्याच्या आशियाई अथवा उष्ण समशितोष्ण हवामानात वाढणार्या जाती आहेत.
अधिक उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी –
मुळ्याचे पीक कमी कालावधीत तयार होते. अधिक पीक मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्या. कोरड्या जमिनीत मुळ्याची पेरणी करू नका. बियांची पेरणी केल्यावर लगेच कमीप्रमाणात पाणी द्या.
मुळा किडीवर नियंत्रण उपाय –
मावा या किडीचा उपद्रव ढगाळ वातावणात जास्त प्रमाणात होतो. तसेच काळी अळी ही प्रमुख कीड असते. या किडीची पिल्ले व प्रौढ किडे पानांतील अन्नरस संपून घेतात. त्यामुळे पाने गुंडाळली जातात. रोप कमजोर होण्याची जास्त शक्यता असते. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिलिलिटर मॅलॅथिऑन मिसळून पिकावर फवारा.
●मुळा खाण्याचे फायदे व तोटे:
1)मुळा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते तसेच मुळा ऍसिडिटी गॅस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
2)मुळा ही अशी फळभाजी आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात ही भाजी खाणं अधिकच फायदेशीर ठरतं. मुळा खाल्ल्यानं आपलं शरीर हायड्रेट राहतं.
3)मुळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. सोबतच तो फ्री रेडिकलमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतो.
4)मुळा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते तसेच मुळा ऍसिडिटी गॅस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे तुम्ही मुळ्याचा समावेश तुमच्या आहारात सॅलडच्या स्वरूपात करू शकता.
5)मुळ्यात अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइडचे प्रमाण चांगले असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. तसंच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही मुळा उपयुक्त आहे. सोबतच मुळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
भाजी, कोशिंबीर व थालिपिठे-
कोशिंबिरीसाठी पांढरा मुळा स्वच्छ धुऊन, किसून घ्यावा. त्या किसलेल्या मुळ्यात खवलेले ओले खोबरे व बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करावी. चवीनुसार मिश्रणात मीठ व साखर घालावी. कमी तेलावर जिरे, हिंग, मोहरी व कढीलिंबाची फोडणी करून, ती किसलेल्या मुळ्यावर ओतावी. कोशिंबिरीत हळद घालू नये. अशा प्रकारे लाल मुळ्याचीही कोशिंबीर करता येते. या कोशिंबिरीत गोड दही घातल्याने स्वादात आंक भर पडते.
मुळ्याची भाजी करतेवेळी मुळा पाल्यासहित धुऊन, बारीक चिरून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा. दोन चमचे तुरीची डाळ गरम पाण्यात भिजू घालावी. तेलाच्या फोडणीत लसणीच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्या फोडणीवर हिरवी मिरची, हळद, तूर डाळ व बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी चांगली परतून घ्यावी. चांगल्या परतलेल्या फोडणीत मुळ्याची चिरलेली भाजी घालावी. पाण्याचा हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकणावर पाणी ठेवून वाफेवर भाजी शिजवावी. भाजी शिजल्यावर त्यात साखर मीठ घालावे. वाफेवर भाजी पूर्ण शिजल्यावर त्यात ओले खोबरे घालावे. गोड्या डाळीबरोबर ही भाजी चविष्ट लागते.
बारीक चिरलेल्या मुळ्याच्या पाल्यात मीठ टाकून पाला चांगला मळून घ्यावा. मळल्यावर मुळ्यालापाणी सुटते. तो पाला पिळून पाणी वेगळं काढावे.त्याच पाण्यात भाजी शिजवावी. बाहेरचे पाणी घालून भाजी शिजवल्याने भाजीच टेस्ट बिघडते. या पाण्यातभाजी शिजवताना मीठ कमीच घालावे. ही भाजी पूर्ण शिजल्यावर त्यात नंतर खोबरेल तेल टाकावे.
मुळ्याचे थालिपीठही रुचकर लागते. दोन मध्यम आकाराचे मुळे किसून घ्यावेत. किसल्यावर त्यांचा रस पिळून घ्यावा. कीस पिळल्यावर त्यातील उग्रपणा कमी होतो. किसात एक बारीक चिरलेला कांदा, एक वाटी तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, अर्धा चमचे धणेपावडर व जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साखर, ओल्या खोबरयाचे पातळ काप, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ असे सगळे साहित्य एकत्र करून घालावे. गरजेपुरते पाणी टाकून मिश्रण मळून घ्यावे. प्लास्टिकच्या कागदावर अथवा केळीच्या पानांवर तेलाचा हात लावून मळलेल्या पिठाची थालिपिठे थापावी. तव्यावर तेल गरम करून ती कमी आचेवर भाजावी. दही किंवा लोण्यासोबत पानात वाढावीत..
श्रावणी सोमवारला मुळा खूप महत्त्वाचा आहे. तो उपवास सोडताना आवश्यक असतो.
मुळा खाल्ल्यानंतर हे 3 पदार्थ खाऊ नका… होऊ शकते ‘गंभीर परिणाम’ –
1)मुळा खाल्ल्यानंतर दूध किंवा दुधावर आधारित पेये घेतल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये ऍसिड रिफ्लक्स देखील होऊ शकते. हे त्याच्या उबदार स्वभावामुळे आहे, जे लैक्टोजसह एकत्र केल्यावर अस्वस्थता होऊ शकते. जरी तुम्ही एकाच दिवशी दोन्ही खाण्याचा विचार करत असाल तरीही दोन्ही पदार्थांमध्ये निरोगी अंतर
आहे याची खात्री करा.
2)दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कारले. खूप जणांचं कारले हे नावडती भाजी असली तरी कारल्यात भरपूर गुणधर्म आहेत. परंतु कार्ल्यासोबत आपण मुळा खाऊ नये. हे जर आपण एकत्र घेतले तर या दोघांचे मिश्रण होते त्यामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात.
3)संत्र्यात अँटिऑक्सिडेंट्स आहेत तश्याच प्रकारे ते मुळ्यात देखील आहेत व मित्रांनो जेव्हा आपण हे दोन पदार्थ आपण एकत्र खातो तेव्हा ह्या अँटिऑक्सिडेंट्स ची एकमेकांसोबत प्रतिक्रिया होते व परिणामी आपल्या पोटाचे अनेक प्रकारचे विकार होतात. स्थूलपणा वाढतो, तसेच ऍसिडिटी, पित्त वाढणे अश्या बऱ्याच प्रकारच्या समस्या तयार होतात. म्हणून मुळा खाण्यापूर्वी व खाल्यानंतर व एकत्र देखील त्याचे सेवन करू नका.
●हिवाळ्यात मुळा खाण्याचे 5 जबरदस्त फायदे:
पचनक्रिया सुधारते
मुळा मध्ये फायबरचे प्रमाण जादा असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तुम्ही नियमित मुळा थोडा-थोडा खाल्ला तर तुमची आतड्याची हालचाल सुरळीत तर होतेच. शिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही. पोट निरोगी ठेवण्यास मुळा उपयुक्त आहे.
सर्दीशी लढा
मुळामध्ये कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे घशातील श्लेष्मा साफ होत. नाॅर्मली सर्दी वर कोणताही इलाज नाही. परंतु हिवाळ्यात होणाऱ्या सर्दीपासून काही काळ आराम मिळु शकतो.
प्रतिकारशक्ती वाढवते
मुळ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स व अँथोसायनिन्सन तुमच्या हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. शिवाय यात जीवनसत्त्वे ए, सी, ई, बी 6, पोटॅशियम व इतर खनिजे असतात. दीर्घकालीन लाभ घेण्यासाठी तुम्हाला या भाजीचा रोजचा आहारत समावेश करावा लागेल.
रक्तदाबावार नियंत्रण
हपोटॅशियमने समृद्ध असणारा मुळा शरीरात सोडियम-पोटॅशियम संतुलित ठेउन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरतो. यात हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. हिवाळ्यात प्रत्येकाने आवर्जून खायला हवा. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने जाणीवपूर्वक मुळा खावा.
त्वचेसाठी फायदेशीर
मुळ्याचा उपयोग त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात फॉस्फरस व जस्त असते. यामुळे कोरडेपणा कमी होतो. पुरळ पासून मुक्तता मिळण्यास मदत होते. मुळा शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतो. मुळा नियमित खाल्ल्यास हिवाळ्यात त्वचा चमकदार होते.
●मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो
होय.मूळव्याध असणाऱ्या लोकांना कच्चा मुळा खाल्ला पाहिजे. मुळा किसूनही तुम्ही खाऊ शकता. १०० ग्रॅम मुळ किसून १ चमचा मध मिसळून, दिवसातून दोन वेळेस खा.
यापेक्षा सोपा उपाय मुळ्याचा रस काढा, ग्लासभर रसात थोडसं मीठ टाका व दिवसातून दोन वेळेस प्या. पण कच्चा मुळा खाणं हा सर्वात प्रभावी व सोपा उपाय आहे
मुळ्याची भाजी त्वचेसाठी फायदेशीर आहे?
आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते, रक्तदाब नियंत्रित करते, प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेसाठी चांगले असते, लाल रक्तपेशींचे नुकसान नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, फॉलिक अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात.
मुळा पाने खावी का?
अनेक लोकांना मुळा खायला आवडत नाही. मुळ्याच्या चवीमुळे व उग्र वासामुळे अनेक लोक मुळा खाण्यासाठी कंटाळा करतात. मात्र, मुळा व मुळ्याच्या पानांमध्ये अत्यंत गुणकारी गुणधर्म आहेत. मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे उकडून, भाजी बनवून अथवा इतर भाज्या म्हणजेच मटारसोबत मिक्स करुन खाता येऊ शकते. सलादमध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश केल्यास आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतात. (Radish leaves are beneficial for health)
1)मुळ्याच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्यासही अनेक फायदा होतात.
2)मुळा अथवा त्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिस्न दूर होतात व त्वचा उजळते. त्यामुळे त्वचा चांगली ठेवण्या साठी आजच मुळ्याची पाने आपल्या आहारात समाविष्ट करा.
3)मुळ्यामध्ये एंथोकायनिन असते. जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत करते. त्यामुळे मुळा रोज आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. मुळ्याच्या भाजीसोबत मुळ्याची भजी व कोशिंबीर देखील खाऊ शकता.
4)यामध्ये आर्यन, फॉस्फोरस असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढते व कमजोरी दूर होते. अशक्तपणा कमी होण्यासाठी मुळ्याची भरपूर उपयोग होतो.
5)यामध्ये डाययूरेटिक गुण असतात. जे युरिनसंबंधीत प्रॉब्लम दूर करण्यात इफेक्टिव्ह आहे. भरपूर पाणी पिण्याबरोबरच मुळा सुधा फायदेशीर आहे.
6)मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करते. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीरा बाहेर पडतो.
मुळा भाजी (Mula bhaji recipe in marathi)
2 मुळे
4 पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून
5 सहा लसणाच्या पाकळ्या
मुठभर कोथिंबीर
1/4 टीस्पून जीरे
1/4 टीस्पून मोहरी
1/4 टीस्पून हळद
1/4 टीस्पून हिंग
2 टेबलस्पून तेल
चवीनुसार मीठ
कुकिंग सूचना
स्टेप 1
मुळा स्वच्छ धुवून,साल काढून किसून घ्या.मिरची, कोथिंबीर कापून घ्या.लसूण कापून किंवा चेचून घ्यावा..(लसूण चेचून घेतला तर त्याचा मस्त खमंग वास भाजी ला येतो)
स्टेप 2
मुळ्याचा अती उग्र वास असल्या वर किसलेल्या मुळ्या मध्ये दोन ग्लास पाणी टाकून मिनिटभर ठेवा.व नंतर पाणी काढून घ्यावे. गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी तडतडताच त्यात लसूण, मिरची घालावी.
स्टेप 3
कडिपत्ता, कोथिंबीर, हळद व हिंग घालून फोडणी तयार झाल्या वर मुळा टाकून परतून घ्यावा.
स्टेप 4
झाकण ठेवून दहा मिनिटे शिजून द्यावे.अधुनमधून हलवून घ्या.. थोडेही पाणी घालू नये.. स्वादिष्ट भाजी तयार होते..
स्टेप 5
बारीक कापून कोथिंबीर घालून मिक्स करा व एक वाफ काढून घ्या..बस… भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करा..
गाई-म्हशी ना कमी दूध देण्याचे कारण काय?
दही खाण्याचे फायदे कोणते आहेत ?
अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा
कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका, अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत