●केळी
केळी ह्या फळाचे आरोग्याच्या दृष्टीने व सांस्कृतिक महत्त्व आहे. केळीचा 86 टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो. पिकलेली केळी चांगले पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी व जेली इत्यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून वापरले जातात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून वापर केला जातो.
●केळी लागवड माहिती
क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या मागे केळीचा क्रमांक आहे. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात सरासरी दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीसाठी आहे. केळी उत्पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने अथवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणा-या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला उत्पादनापैकी सुमारे 50 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकून चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीसाठी आहे त्यातून अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हात आहे. म्हणून जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते.
सर्व सरकारी शेतकरी योजनांची माहिती सर्वात आधी माहीत जाणून घ्या, आजच आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आम्हाला तुमच्या पर्यंत माहिती पोहचवण्याची संधी दया ! धन्यवाद
मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठविली जाते. त्याप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात होते. त्यापासून मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.
• हवामान
केळी हे उष्ण कटीबंधीय फळ आहे त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले ठरते. साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास उत्तम ठरते. हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्त उष्ण हवामान असल्यास पिकावर अनिष्ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्यास पिवळी पडतात व 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्त झाल्यास केळीची वाढ खुंटते. उन्हाळयातील उष्ण वारे व हिवाळयातील कडाक्याची थंडी या पिकाला हानीकारक असते. जळगांव जिल्हयातील हवा दमट जरी नसेल तरी केळी खाली जास्त क्षेत्र असण्याचे कारण म्हणजे तेथील काळी कसदार माती, पाणी पुरवठयाची उत्तम पूर्ती व उत्तर भारतातील बाजारपेठांशी सुलभ व थेट दळणवळण हे होय.
•जमीन
केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित अथवा मध्यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवतेग. क्षारयुक्त जमिन मात्र केळी लागवडीस उपयुक्त नाहीत.
• खते व वरखते उत्पादन
या झाडाची मुळे उथळ असतात. त्यांची अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते. त्यामुळे वाढीच्या सुरुवातीच्या वेळेत (पहिले वार महिने) नत्रयुक्त जोरखताचा हप्ता देणे गरजेचे ठरते. प्रत्येक झाडास 200 ग्रॅम नत्र 3 सारख्या हप्त्यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्या महिन्यात द्यावे. प्रत्येक झाडास प्रत्येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खताबरोबर द्यावी. शेणखता बरोबर 400 ग्रॅम ओमोनियम सल्फेट प्रत्येक झाडास लावणी करतांना देणे चांगले ठरते.
दर हजार झाडास 100 कि नत्र 40 कि स्फूरद व 100 कि पालांश ( प्रत्येक खोडास) 100 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्फूरद, 40 ग्रॅम पालाश म्हणजेच हेक्टरी 440 कि. नत्र 175 कि. स्फूरद व 440 कि पालाश द्यावे.
• केळी जाती
केळीच्या 30 ते 40 जाती आहेत. त्यापैकी पिकवून खाण्यास उपयुक्त जाती उदा. बसराई हरीसाल लालवेलची, सफेदवेलची, मुठडी, वाल्हा लालकेळी व शिजवून अथवा तळून खाण्यास उपयुक्त जाती उदा राजेळी, वनकेळ तसेच शोभेसाठी रानकेळ या जाती आहेत. प्रत्येक जाती विषयी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
बसराई –
या जातीचे खानदेशी, भुसावळ, वानकेळ, काबुली, मॉरीशस, गव्हर्नर व लोटणं इत्यादी नांवे आहेत. व्यापारी दृष्टया ही जात महाराष्ट्रात अधिक महत्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये केळीच्या एकूण क्षेत्रापैकी 75 टक्के क्षेत्र या जातीचा लागवडीखाली आहे. ही जात बांध्याने ठेंगणी 5 ते 6 फूट उंच, भरपूर प्रमाणात उत्तम व दर्जेदार फळ देणारी असल्यामुळे तिला बाजारात जास्त मागणी आहे. या जातीला उष्ण कोरडे हवामान मानवते. या जातीला वा-यापासून कमी नुकसान पोहोचते. या जातीचे घड मोठे असून समान आकाराचे असते. प्रत्येक घडाला अंदाजे 6 ते 7 फण्या असून एका फणित 15 ते 25 केळी असतात. केळीच्या प्रत्येक लोंगरात 120 ते 170 फळे असते वत्याचे वजन 25 किलोपर्यंत असते. याजातीच्या फळाचा आकार मोठा, गर मळकट पांढ-या रंगाचा असून त्यास चांगला वास व गोडी मोठ्या प्रमाणात असते. ही जात मर या रोगास प्रतिकारक असते.
हरीसाल –
या जातीची लागवड वसई भागात जास्त प्रमाणात होते. या जातीची उंची 4 मिटरपर्यंत असते. या जातीची साल अधिक जाडीची असून फळे बोथट आहे, तसेच ही जात टिकाऊ आहे. प्रत्येक लॉगरात 150 ते 160 फळे आहे व त्यांचे वजन सरासरी 28 ते 30 किलो भरते. या जातीला सागरी हवामान मानवते.
लालवेलची –
या जातीची लागवड कोकण विभागात प्रमुख आढळून येते. या जातीचा खोडाचा रंग तांबूस, उंच झाड, फळ लहान व पातळ सालीचे आहे. चव आंबूस-गोड व रंग पिवळा असतो. या जातीच्या लोंगरात 200 ते 225 फळे आढलतात. त्यांचे वजन सरासरी 20 ते 22 किलोपर्यंत भरते. या जातीची लागवड भारतातील केळीच्या इतर जातीचा लागवडीपेक्षा अधिक प्रमाणात आहे.
सफेदवेलची –
या जातीचे झाड उंच, खोड बारीक , फळ फार लहान व पातळ सालीचे आहे. त्याचा गर घटट असतो. प्रत्येक लोंगरात 180 फळे असून वजन 15 किलो इतके असते. या जातीची लागवड ठाणे जिल्हयात दिसून येते.
सोनकेळ –
या जातीच्या झाडाची उंची पाच मिटर, भकम खोड, फळ मध्यम जाड व गोलसर आकाराचे आहे त्याची चव गोड व स्वादिष्ट असते. ही जात पना या रोगास बळी पडते. या जातीची लागवड रत्नागिरी भागात दिसूनयेते.
राजेळी –
ही जात कोकण विभागामध्ये अधिक प्रमाणात दिसूनयेते. या झाडाची उंची पाच मिटर असते, फळे मोठे व लांब, लोंगरात 80 ते 90 फळे अढळतात. त्यांचे वजन 12 ते 13 किलो असते. या जातीची कच्ची फळे शिजवून खाण्यास योग्य तसेच सुकेळी करण्यासाठी उपयोगी ठरते.
बनकेळ –
या जातीच झाड 4 ते 5 मिटर उंच, फळ मोठे, बुटाच्या आकारासारखे सरळ व टोकदार असते. प्रत्येक लौंगरात 100 ते 150 फळे असून त्यांचे वजन 18 ते 23 कि. इतके असते. ही जात भाजी करिता उपयोगी आहे. या जातीची लागवड कोकण भागात दिसून येते.
वाल्हा –
या झाडाची उंची दोन मिटर असते व फळ जाड सालीचे असून फळांची चव आंबूस गोड असते. संपूर्ण लोंगरात 80 ते 100 फळे असतात आणिर त्यांचे अंदाजे वजन 12 ते 14 किलोपर्यंत असते या जातीची लागवड दख्खनच्या पठारामध्ये मुख्यप्रमनात दिसून येते.
लालकेळ –
या जातीच्या झाडाची उंची 4 ते 5 मिटर असते. फळ मोठे असून जाड व टणक असते. या जातीची साल लाल व सेंद्री रंगाची असून गर दाट असतो. तसेच चव गोड असते. प्रत्येक लोंगरात 80 ते 100 फळे असतात. त्यांचे वजन 13 ते 18 किलोपर्यंत असते. केळीच्या सगळ्या जातीमध्ये ही जात दणकट म्हणून ओळखली जाते. या जातीची लागवड ठाणे जिल्हात दिसून येते.
•आंतरपिके
केळीत घ्ययची मिश्र पिकांची निवड करतांना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्याचा पुरवठा मशागतीच्या पध्दती पिकांवर पडणारे रोग व किड पाणीपुरवठा इत्यादी बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक ठरते. जळगांव भागातील शेतकरी सुरुवातीला मिश्र पिक घेत नाहीत. परंतु पिक 16 ते 17 महिन्याने झाल्यावर व बागेतील 85 ते 90 टक्के घड कापले गेल्यावर केळीच्या बागेत गहू हरबरा सारखी रब्बी हंगामातील पिके घेतात. अथवा कांद्याचे बियाण्यासाठी कांदे लावतात. कोकण किनारपटटीत नारळ पोफळीच्या बागेत केळीच पीक घेता
•केळीचे सांस्कृतिक महत्त्व
हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला, आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न व मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण बांधले जाते. आपण हे सुद्धा अनेकदा एकले असेल की ज्या मुलांचे विवाह होत नसेल त्या वेळेस ही याच झाडाची पूजा आपणास करावयास सांगता. आपण जेव्हा केळीच्या पानावर गरमच वाढतो. तेव्हा पानातील पोषक तत्त्वे अन्नात मिसळतात जे आपल्या शरीरासाठी उत्तम असतातत.
●केळी खाण्याचे फायदे:
जीवनसत्त्वेकेळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 व अनेक ब जीवनसत्त्वे असतात. केळी व्हिटॅमिन सीसह आवश्यक जीवनसत्त्वे प्रदान करतात, जे रोगप्रतिकारक कार्यास समर्थन देतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी व चयापचय प्रक्रियेसाठी फायदेशीर आहे.
●दररोज केळी खाणे चांगले आहे का?
दररोज एक केळ खाल्ल्याने माणूस सदैव निरोगी राहू शकतो. त्वचा तेजस्वी करण्यासाठी केळी खाणं गरजेचं आहे. केळी खाल्याने त्यातील पोटॅशियम तुमच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. यामुळे तुमच्या त्वचेच्या सर्व पेशींना भरपूर ऑक्सिजन व पोषण मिळते.
केळी खाण्याचे तोटे:
1- लठ्ठपणा वाढतो- जास्त केळी खाल्ल्याने तुम्ही जाड होऊ शकता. केळीमध्ये फायबर व नैसर्गिक साखर असते, दुधासोबत खाल्ल्यास वजन वाढते.
2- पोटदुखी व अॅसिडिटी- रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने पोटदुखी व गॅसची समस्या देखील होऊ शकते. केळीमध्ये स्टार्च असल्याने ते पचायला जड असते.
3- बद्धकोष्ठतेची समस्या – पिकलेले केळे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, पण केळी जराही कच्ची असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कच्ची केळी खाऊ नका व पिकलेली केळीही एका मर्यादेत खा.
4- साखरेची पातळी वाढते- केळी खाल्ल्याने मधुमेह असलेल्या लोकांना खूप नुकसान होऊ शकते. केळीमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्यांनी केळी कमी खावी.
5- दातांच्या समस्या व मायग्रेन- केळी जास्त प्रमाणात खाल्ल्यास दात किडण्याची शक्यता असते. केळी मध्ये टायरोसिन हे अमिनो असिड असते, जे शरीरात टायरामाइनमध्ये बदलते. यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. दमा असलेल्यांनीही केळी मर्यादेत खावी.
● केळीपासून बनवले जाणारे पदार्थ
1) केळी चिप्स
सर्वात लोकप्रिय दक्षिण भारतीय उत्पादन म्हणजे केळी चिप्स. केळीचे चिप्स काही बाबतीत बटाट्याच्या चिप्सपेक्षा अधिक असतात. उदाहरणार्थ, कुरकुरीत बटाटा चिप्स घरी बनवणे, जिथे त्यांना पाण्यात टाकणे व नंतर छतावर वाळवणे यासारखे कष्ट घ्यावे लागतात. केळीच्या चिप्स बनवायला खूप सोप्या असतात.
2)पीठ
केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरले जातात. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या अथवा बारीक तुकडे करून सुकवतात. त्यानंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा उपयोग करून पीठ तयार करतात. शेव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
3)भुकटी
केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर अथवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात. तयार केलेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात भरवून कोरड्या व थंड जागी साठवितात. त्याचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे व बेकरीमध्ये तसेच आइस्क्रोममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.
4)जेली
याचा वापर जेली चॉकलेट तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी केळी फळाचा गर पाण्यात मिसळून १५ ते २० मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात सारख्या मात्रेत साखर, ०.५ टक्के सायट्रेकि आम्ल व पेक्टीन घालून उकळी येईपर्यंत शिजवावे.
5)जॅम
कोणत्याही जातीच्या चांगली पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी केला जातो. गराच्या वजनाइतकी साखर मिसळून गर मंद आचेवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन ०.३ टक्के सायट्रेकि आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७० डिग्री झाल्यावर जॅम बनून तयार झाला, असे समजावे.
6)केळ्याचे सुके अंजीर
पूर्ण पिकलेली केळी सोलून, पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्या. नंतर त्याचे २.५ मि.मी. काप बनवून उन्हात वाळवा अथवा ५० अंश से. तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये अथवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा. पॉलिथीनच्या पेशिव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात. सुक्या अंजिराप्रमाणे ही अंजीर अत्यंत चविष्ट लागतात.
7)केळी बिस्कीट
केळी पिठात ३० टक्के मैदा मिसळून त्यामध्ये साखर, वनस्पती, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळ. योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याचा लगदा करा. हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्या. ही बिस्किटे अतिशय चविष्ट व पौष्टिक असतात.
8)बनाना प्युरी
प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर. यामधे ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग व सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते. प्युरीचा वापर मिल्कशेक, आइस्क्रीम, फळांचा रस यांसारख्या वेगवेळ्या पदार्थात केला जातो. पिकलेल्या केळीचा गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हवाविरहित करून निर्जतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. गर टिकावा यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा उपयोग केला जात नाही.
9)व्हिनेगर
अतिपक्व खाण्यास योग्य नसलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येते. केळीचा गर पाण्यात मिसळून घ्यावा. यात यीस्ट टाकून ४८ तास मिश्रण स्थिर ठेवा. त्यात माल्ट व्हिनेगरचे मुरवण २े ते ३े मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण ३० अंश से.तापमानात आांबवण्यास ठेवावे. ही रासायनिक अथवा (अॅसिडीफिकेशन) दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होते. नंतर सेंट्रेफ्यिूज करून व्हिनेगर वेगळे करतात व निर्जतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद ठेवतात
●केळी बाजार भाव
बाजार समिती- नाशिक
जात-भुसावळी
दर-900
बाजार समिती- नागपूर
जात-भुसावळी
दर-525
बाजार समिती-पुणे
जात-लोकल
दर-1000
बाजार समिती-पुणे मोशी
जात-लोकल
दर- 3750
●केळीचे पान
केळीचे पान जेवतानाच नाही तर अगदी काही पदार्थ शिजतानाही वापरतात. कारण त्यातील पोषक तत्व या पदार्थात मिसळून आरोग्याला पोषक ठरते. तसंच मोदक, अळूवडीसारखे पदार्थ यात समाविष्ट करून उकडवले जाते जेणेकरून ते करपत नाहीत. तसंच माशांसारखे पदार्थ केळीच्या पानात शिजवल्याने वेगळाच सुगंध व स्वाद मिळतो.
●केळी कोणत्या ऋतूत येते ?
कारण हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर, फळे लागण्यास व तयार होण्यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरू होतो. त्यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्ये लागवड केलेल्या बागेस मृगबाग म्हणतात.
●केळी मध्ये किती कॅलरीज आहेत?
उत्तर-89 calories
●केळीचे झाड
केळी ही वनस्पती झाड असून सुद्धा तिला खोड नाही. केळी या वनस्पतीला संस्कृत भाषेत रंभा असे नाव दिले गेले आहे
जगाचे पालनकर्ता भगवान विष्णू (God Vishnu) या वृक्षात वास करतात असे मानतात. ज्यामध्ये त्याचे मूळ व पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात.
●केळीच्या सालीचे फायदे :
केळ्याची साल फेकण्याआधी जाणून घ्या याचे फायदे
1)केळीच्या सालीमुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात. …
2)केळ्याची साल पचनविकार दूर करण्यासोबतच इतरही कामात फायदेशीर आहे. …
3)त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. …
4)केळ्याची साल पचनविकार दूर करण्यासोबतच इतरही कामात फायदेशीर आहे.
●केळी फोटो
●केळीचे शिकरण (keli shikran recipe in marathi
घटक
5 मिनीटे
1 सर्विंग
2 पिकलेली केळी
1 मोठा कप गार अथवा रूम टेंपरेचर झालेले दूध
2 टीस्पून साखर
1 टेबलस्पून ड्राय फ्रूट पाउडर
1/2 टीस्पून हिरवी वेलची पावडर
कुकिंग सूचना
स्टेप 1-प्रथम एका मोठ्या बाउल मध्ये 2 केळ्याचे गोल गोल काप करून घाला
स्टेप 2-आता गोल कापलेल्या केळी मध्ये साखर घाला
स्टेप 3-आता ड्राय फ्रूट्स घाला
स्टेप 4-आता हिरवी वेलची पावडर घाला
स्टेप 5-आता हे सर्व मिश्रण चमच्यानी छान एकजीव करून घ्या
स्टेप 6-आता गार अथवा रूम टेंपरेचर झालेले दूध घाला
स्टेप 7-आता परत छान पैकी मिक्स करून घ्या व केळ्याचे शिकरण तयार आहे.
बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया
गाई-म्हशी ना कमी दूध देण्याचे कारण काय?
दही खाण्याचे फायदे कोणते आहेत ?
अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा
कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका, अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत