इलेक्ट्रॉनिक माती
सध्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा (Electronic Soil) वापर वाढला असून, कृषी क्षेत्रही त्यापासून वेगळे राहिलेले नाही. कृषी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वावर वाढलेला आहे. वेगवेगळी यंत्रे आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे आता शेती व्यवसाय करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मेहनत कमी झाली असून, उत्पादन देखील वाढले आहे. अशातच शास्त्रज्ञांनी चक्क विद्युत वाहक ‘इलेक्ट्रॉनिक मातीचा’ (Electronic Soil) शोध लावला आहे.
स्वीडनच्या लिंकोपिंग विद्यापीठाने तंत्रज्ञान काळाबरोबर कसे प्रगती करत आहे याचे उदाहरण सादर केले आहे. वास्तविक, लिंकपिंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनिक electronic मातीचा शोध लावला आहे. म्हणजे पिके वाढवण्यासाठी तुम्हाला मातीची गरज नाही.
सर्व सरकारी शेतकरी योजनांची माहिती सर्वात आधी माहीत जाणून घ्या, आजच आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आम्हाला तुमच्या पर्यंत माहिती पोहचवण्याची संधी दया ! धन्यवाद
तुमचे पीक मातीशिवाय तयार होईल आणि उत्पादन देखील सामान्यपेक्षा 50% जास्त असेल. हा लेख वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. आता हे तंत्रज्ञान काय आहे व कोणावर चाचणी केली आहे ते समजून घ्या.
स्वीडीश शास्त्रज्ञांचा शोध
स्वीडीश शास्त्रज्ञांचा शोध (Electronic Soil For Crop Growth) ऐकून विचारात पडला असाल. मात्र हे खरे असून, या इलेक्ट्रॉनिक मातीच्या मदतीने 15 दिवसात जवसाचे (बार्ली) पीक जेवढे सामान्य मातीत वाढते, त्यापेक्षा 50 % अधिक वाढ या मातीत होऊ शकते. स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठातील संशोधक एलेनी स्टॅव्हिनिडो यांनी व त्यांच्या पथकाने या मातीचा शोध लावला आहे. खरे तर कृषी शास्त्रज्ञांनी हायड्रोपोनिक लागवड म्हणजेच मातीविना शेती तंत्र प्रवाहकीय लागवड सबस्ट्रेट विकसित केला असून, याला शास्त्रज्ञांनी इ-सॉईल म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक माती’ असे नाव दिले आहे.
पार्ले-जी वरील तो नवीन मुलगा कोण आहे?
ही इलेक्ट्रॉनिक माती काय आहे?
मातीशिवाय शेती करण्याच्या या तंत्राला हायड्रोपोनिक्स म्हणतात. हे तंत्रज्ञान आपल्यामध्ये खूप दिवसांपासून आहे व अनेक लोक त्यासोबत शेतीही करत आहेत. यामध्ये खनिजे, पाणी आणि वाळूचा वापर पिकांसाठी केला जातो. हायड्रोपोनिक्समध्ये खनिज पोषक द्रावणाच्या साहाय्याने पिके घेतली जातात व या तंत्राने कुठेही पिके घेता येतात. ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि आज अनेक लोक या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत आहेत. या तंत्रात, खनिज पोषक द्रावण हे वनस्पतीसाठी सर्वस्व आहे आणि ते प्रकाशाने सक्रिय होत असल्याने तिला विद्युत माती असे नाव देण्यात आले आहे.
लिंकपिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या शेती तंत्रात नवीन प्रकारचे सब्सट्रेट (ज्या पृष्ठभागावर वनस्पती वाढेल) वापरली आहे, ज्यामध्ये प्रकाशाच्या मदतीने हा थर उत्तेजित केला जातो. म्हणजे प्रकाशाच्या साहाय्याने पिकाच्या पृष्ठभागाला अधिक पोषण मिळते आणि पिकाची मुळे जलद गतीने सक्रिय होतात त्यामुळे पिकाची वाढ लवकर होते. या प्रकारच्या शेतीमध्ये तुम्ही पिकाच्या पोषणावर नियंत्रण ठेवू शकता.
हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?
15 दिवसांतच पिकात 50 % वाढ झाली
प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की विद्युत मातीत उगवलेल्या बार्लीची रोपे 15 दिवसांत 50 % अधिक वाढली जेव्हा त्यांची मुळे विद्युतदृष्ट्या उत्तेजित झाली. म्हणजेच, जेव्हा बार्ली रोपांची मुळे इलेक्ट्रिकली सक्रिय झाली, तेव्हा 15 दिवसात त्यांची वाढ सामान्यच्या तुलनेत 50% वाढली.
स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक एलेनी स्टॅव्ह्रिनिडो यांनी सांगितले की, जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे आणि ग्लोबल वार्मिंगची समस्या गंभीर आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात आपण नागरिकाच्या अन्नाच्या गरजा सध्याच्या कृषी पद्धतींनी भागविण्यास सक्षम राहणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल आणि हे सर्व हायड्रोपोनिक्सच्या मदतीने करता येईल.
कडबा कुटी मशीन अनुदान योजना 2024
इलेक्ट्रॉनिक मातीचे फायदे कोणते आहे?
‘इलेक्ट्रॉनिक माती’चे फायदे? हायड्रोपोनिक्स फार्मिंग अर्थातच माती विना शेती ही शेतीची एक आधुनिक पद्धत आहे ज्यामध्ये पीक वाढीसाठी मातीची गरज लागत नाही. या प्रकारच्या शेतीमध्ये पाण्यातच पीक वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक दिले जातात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लेट्यूस, औषधी वनस्पती, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या यांची यशस्वी लागवड करण्यात आलेली आहे. दरम्यान याच आधुनिक तंत्रज्ञानात अजून सुधारणा व्हावी यासाठी या मातीचा (Electronic Soil) शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
कमी जागेत जास्त पिके येतात या तंत्राने
तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही उभ्या पद्धतीने शेती करू शकता. उदाहरणार्थ, हा हायड्रोपोनिक्स सेटअप टॉवरच्या स्वरूपात स्थापित केला जाऊ शकतो व एकाच ठिकाणी अनेक पिके घेतली जाऊ शकतात. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये, नियंत्रित वातावरण तयार केले जाते आणि सर्व काही नियंत्रित केले जाऊ शकते.
जगातील लोकसंख्या वाढत असताना आणि हवामानातील बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. परिणामी अन्नाची मागणी पारंपरिक शेतीतून पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे ही भविष्यातील गरज म्हणून विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून हे संशोधन करण्यात आले आहे. मात्र आता या तंत्रज्ञानामुळे शहरी भागातही कमी जागेत शेती करणे शक्य होणार आहे. असे स्वीडनम शेतकरी ग्रुप जॉईन करा विद्यापीठातील संशोधक एलेनी स्टॅव्हिनिडा यांनी या संशोधनाबाबत म्हटले आहे.
वाढत्या लोकसंख्ये बरोबर अन्न धान्याची गरज ही वाढतच आहे. त्यामुळे हा शोध खुप महत्व पूर्ण मानल्या जातो.
अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा
कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका, अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत