कांदा लागवड कशी करावी याविषयी सविस्तर माहिती

●कांदा

Table of Contents

भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र प्रथम स्थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते.

●कांदा पीक लागवड

भारतामध्ये महाराष्ट्र राज्याचा कांदा पीक लागवडीत व उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो त्यामागचं कारणही असं आहे की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मधलं जे वातावरण आहे हे या पिकासाठी वर्षभर अनुकूल असणार हवामान आहे त्यामुळे आपल्याला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप,रांगडा,रब्बी व उन्हाळी म्हणजेच गावरान अशा सर्व प्रकारच्या हंगामातला कांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो,व या पिकासाठी पंचगंगा व एलोरा हि दोन बियाणे प्रामुख्याने महाराष्ट्रात वापरली जातात व आजच्या काळामध्ये या बियान्यांचे भाव देखिल खुप वाढत चालले आहेत. पण या पिकांमधून जेवढं उत्पन्न शेतकऱ्याला मिळायला पाहिजे तेवढ उत्पन्न आपल्या खर्चाच्या मानाने मिळत नाही.परंतु सरकार दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्यासाठी चाळ अनुदान अथवा अनुदान हे देत असते जेणेकरून शेतकऱ्याला थोडीफार मदत हि होत असते.

कांदा लागवड कशी करावी याविषयी सविस्तर माहिती
कांदा लागवड

 

●कांदे वाढण्यास किती वेळ लागतो?

कांद्याला बियाण्यापासून परिपक्व होण्यासाठी 90-100 दिवस लागतात, जे सुमारे चार महिने असतात . सेटमधून, कांदे सुमारे 80 दिवसांनी अथवा फक्त तीन महिन्यांच्या आत काढणीसाठी तयार होतात.

●कांदा वाण कोणते?

आपल्या महाराष्ट्र मध्ये चांगल्या बाणाचा जर विचार केला आपण तर सर्वात पहिलं बाण आहे पुना फुरसुंगी हे चांगल्या प्रकारचे त्याचबरोबर भीमाशक्ती हे देखील चांगलं बाण आहे यानंतर एन टू फोर वन हे देखील चांगलं बाण आहे अशी तीन चार बाण महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारे प्रचलित आहेत परंतु बियाण्याची निवड करताना जे आपण बियाणं निवडणार ते आपल्या डोळ्यासमोरील असलं पाहिजे म्हणजेच की त्याचे उत्तपण कसं होत हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

बहुपयोगी शेवगा शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती.

 

●कांदा पीक किती दिवसात येते?

लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्‍टरी उत्तपण 250 ते 300 क्विंटल मिळते.

●कांदा पीक खत व्यवस्थापन कसे करावे?

कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी द्यावा. त्‍यानंतर 1 महिन्‍याने पुन्हा 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने पाणी द्यावे तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या गरजेप्रमाणे पाणी द्यावे.
कांदा पिकाला शक्य तितके सेंद्रिय खत टाकावे, व सोबत रासायनिक खत हे एकरी 100 किलो नत्र , 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश या प्रमानात टाकावे. या मात्रा पिकाच्या अवस्थेनुसार विभागून देणे आवश्यक आहे. व जर आपण माती परीक्षण करून या मात्रा ठरवल्या तर ते अधिक उत्तम राहील.
कांद्यांचे रोपांची मुळे ही उथळ असल्यामुळे ते जास्त खोलवर जात नाहीत त्यामुळे आपल्याला त्या रोपांना योग्य वेळी खत देणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपण लागवड करायच्या आधी चांगलं शेणखत अथवा गांडूळ खत शेताला दिलं पाहिजे अशा सेंद्रिय खतामुळे कांद्याची जी साठवणूक क्षमता आहेत ती वाढण्यास मदत होते. या पिकासाठी तीन महत्त्वाचे खत आहेत म्हणजेच अन्नद्रव्य आहेत त्यामधील पहिलं म्हणजे नत्र नत्र हे पिकाच्या वाढीसाठी खूप मदत करते आपण जेव्हा लागवड करतो तेव्हापासून किमान दोन महिन्यापर्यंत नत्र या खताची आपल्याला गरज भासते जेव्हा आपण लागवड करतो त्याच्या दोन तीन आठवडे जर आपण नत्र हे आपण पिकाला टाकलं तर त्याचा फायदा आपल्याला पुढे दिसून येतो या पिकासाठी हेक्टरी 100 किलो नत्राची आवश्यकता आपल्याला भासते नत्र खत देताना सुरुवातीच्या लागवडीच्या वेळेस आपण 50 किलो खत द्यावे व उरलेले जे 50 किलो नत्र आहे ते आपण पुढील दोन तीन आठवडे विभागून पिकाला द्यावे जसं तुम्ही लागवडीनंतर वीस दिवसांनी 25 किलो अथवा 45 दिवसांनी 25 किलो असेही देऊ शकता.

टरबूज / कलिंगड लागवडीविषयी संपूर्ण माहिती

यानंतर आपल्याला या पिकाच्या मुळाच्या वाढीसाठी आपल्याला फॉस्फरस हे द्यायचा आहे याला काही भागात स्फुरद असे देखील म्हटले जाते प्रत्येक हेक्टरी 50 किलोच्या आसपास स्फुरद आपल्याला सुरुवातीला लागवडीच्या टायमाला रोपांना द्यायचे आहे असे हे दुसरं अन्नद्रव्य आहे ते म्हणजे स्फुरद हे देखील आपल्याला पिकासाठी द्यायचा आहे.

यानंतर तिसरे जे मुख्य अन्नद्रव्य आहे ते म्हणजे पालाश शेतकरी मित्रांनो पालाश हे अन्नद्रव्य सर्वांच्या जमिनीत भरपूर प्रमाणात उपलब्ध असते परंतु जेवढे या पिकासाठी असायला पाहिजे तेवढे शेतामध्ये ते उपलब्ध नसल्या कारणामुळे कांदा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे जास्त काळ टिकवण्यासाठी व पेशींना काटकपणा आणण्यासाठी तसेच गोलाकार व कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी या पालाश अन्नद्रव्याची आवश्यकता असते पालाश आपल्याला पिकाच्या लागवडीच्या आधी जेव्हा आपण पहिला बेसल डोस देतो तेव्हा आपल्याला पालाश द्यायचा आहे पालाश देताना प्रति हेक्टर 50 किलो असे आपल्याला द्यायचे आहे तसेच आपण गंधक युक्त खतांचा देखील वापर केला पाहिजे ज्यामुळे कांद्याची जी साठवण ठेवण्याची क्षमता असते ती वाढण्यास सहाय्यता होते.

पपई लागवड कशी करावी मराठी माहिती.

कांदे पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज देखील लागते जर आपण लागवडीच्या आधी शेतात सेंद्रिय खताचा वापर जास्त केला तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासत नाही व जर आपण सेंद्रिय खताचा वापर कमी केला तर आपल्याला थोडी फार सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते परंतु जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जास्त प्रमाणात केला तर त्याचा परिणाम आपल्याला कांदे पिकामध्ये पाहायला भेटतो त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीला देताना फवारणीच्या माध्यमातून द्या नाहीतर कमी प्रमाणात त्या जेणेकरून तुमच्या कांद्याचे उत्पादन चांगलं प्रकारे होईल या पिकासाठी खालील मुख्य सुषमा अन्नद्रव्यांची गरज भासते तांबे लोह दस्त मॅग्नेशियम मॅग्नीज बोरॉन व सिलिकॉन अशा सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज खास करून भासते.

कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे?

160 लिटर पाण्यामध्ये जिबिरलिक एसिड च्या  35 रुपयाच्या दोन ते तीन डब्या टाकायच्या आहेत व हे द्रावण पंपाद्वारे आपल्याला पिकाला फवारायचे आहे जेणकरून आपला कांदा चागला फुगेल.

●कांदा पीक फवारणी

1. कांदा फवारणीची माहिती (kanda favarni mahiti) –

अ) सुरुवाती अवस्थेमध्ये –

थायमिथोक्सम २५ डब्लूजी (अरेव्हा- धानुका एग्रीटेक) ८ ग्राम अथवा असिटामीप्रिड २०एस पी (टाटा माणिक) ८ ग्राम अथवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल (कॉन्फिडोर- बायर क्रॉप सायन्स) ८ मिली अथवा असिफेट ५०% +इमिडाक्लोप्रिड १.८ एस पी ( लान्सर गोल्ड- युपीएल ) – २२ ग्राम अथवा फिप्रोनील ५ एससी (फॅक्स – धानुका एग्रीटेक ) – २२ मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.

ब) प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर –

फिप्रोनील ४०% +इमिडाक्लोप्रिड ४०% डब्लू जी (पोलीस- घरडा केमिकल्स)- ८ ग्राम अथवा थायोमेथोक्साम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ झेड सी (झेपॅक- धानुका एग्रीटेक) ८ मिली अथवा अफीडोपायरोफेन ५० डीसी (सेफिना – बीएएस एफ) ३० ग्राम अथवा फिप्रोनील ४% + असिटामीप्रिड ४% एस सी (प्राविझ – आदामा) ३० मिली प्रति १५ ली पापं या प्रमाणात फवारणी करावी.
2. कांदा फवारणी माहित (kanda favarni mahiti) –

अ) प्रतिबंधात्मक उपाय –

रोगांच्या जैविक व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ३७ मिली + शूडोमोनास फ्लुरोसन्स ३७ मिली प्रति ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

ब) निवारणात्मक उपाय –

– मेटॅलॅक्सिल ३५% डब्लू पी (मॅट्रिक्स- ऍडव्हान्स पेस्टीसाईड) १५ ग्राम अथवा
– क्लोरोथॅलोनील ७५% डब्लू पी (कवच- सिंजेंटा इंडिया)- ३० ग्राम अथवा

– सायमोक्सिनिल ८% +मॅंकोझेब ६४% डब्लूपी (कर्झेट-ड्यूपॉन्ट)- ३० ग्राम किंवा
– फ्लसीलॅझोल १२.५%+कार्बेन्डाझिम २५% (धानुका लस्टर) ३० मिली अथवा
– टेबुकोनाझोल +ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबीन (नेटीओ- बायर)- ८ ग्राम अथवा
– अझोक्सिस्ट्रोबिन ११.५% +मॅंकोझेब ३०% डब्लूपी (प्लुटॉन- क्रिस्टल) ३० ग्राम अथवा
– मेटीराम ५५% +पायराक्लॉस्ट्रोबीन ५% (कॅब्रिओटॉप- बीएएसएफ)- ३५ ग्राम अथवा
– अझोस्ट्रोबिन १८.२%+डायफेनकोनाझोल ११.४% एस सी (धानुका-गोडीवा सुपर) १५ मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.

खरबूज शेती कशी करावी? शेती फायद्याची की तोट्याची?

●कांदा पिक तणनाशक
ग्लायफोसेट लावा

हे तंत्र योग्यरित्या व उबदार, सनी दिवशी केले पाहिजे. पॅकेजवरील सूचनांचे अनुसरण करा व लक्षात ठेवा की, तणनाशकांप्रमाणेच, ग्लायफोसेट देखील इष्ट वनस्पती तसेच तुम्हाला नष्ट करू इच्छित कांदा गवत नष्ट करू शकते. तीन दिवसांनंतर, कांद्याचे गवत कोमेजायला लागले आहे का ते पहा.

●कांदा खाण्याचे फायदे Benefits of Eating Raw Onion:

कांदा हा तसा सर्वांचा घरी सहज उपलब्ध असणारा घटक आहे. पण बरेच जण कच्चा कांदा खातांना नाक मुरडतात. पण कच्चा कांदा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या मुळे अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे.
जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे.

साधारणपणे प्रत्येक घरात कांद्याचा वापर केला जातो. काही लोकांना कांदा खायला आवडतो तर काही लोक ते खात नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कांदा खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या पदार्थात कांदा टाकला तर त्याची टेस्ट डबल होते. याशिवाय सलाद म्हणून सुध्दा कांदा खाणे अत्यंत फायद्याचे आहे. उन्हाळ्यात तर दररोज कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. कच्चा कांदा खाल्ल्याने भरपूर समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. कोणते ते जाणून घ्या.
आरोग्यासाठी आहे फायदेशीरः

कच्चा कांदा फक्त उष्माघातापासूनच सुरक्षित ठेवत नाही तर अनेक आजारांपासून देखील तुम्हाला वाचवू शकतो. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून कर्करोग व हृदयाच्या आजारांपर्यंतचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासही मदत होते. वास्तविक, यामध्ये असलेले मॅग्नेशियम व इतर खनिज क्षार शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे ऊर्जा पातळी राखली जाते.

1) रोग प्रतिकार शक्तीः कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम व व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्यूनिटी वाढविण्यास मदत करतात.

2) कॅन्सरपासून बचावः कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो.

3) हाय ब्लड प्रेशरः जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो
4) पचनः पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी व पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता.

5) विविध संक्रमणांपासून आरामः कांद्यामध्ये अँटी एलर्जिक, अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इंफेक्शपासून संरक्षण करण्यास मदत करते.

6) लोह कमतरताः कांदाला लोह, फोलेट व पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.
कच्चा कांदा खाल्ल्याने रक्ताच्या गुठळ्या मोडणे, स्ट्रोक, हृदयरोगाचा धोका कमी होणे व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे इत्यादी गोष्टींचा लाभ होतो. शिजलेल्या कांद्यापेक्षा कच्चा कांदा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. परंतु, कच्चा कांदा खाण्याचे काही तोटे देखील आहेत.

●कांदा खाण्याचे तोटे

कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज व फ्रुक्टोज असते, त्यामुळे ही ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने पोटदुखी व बद्धकोष्ठता होऊ शकते, म्हणून आपण जास्त प्रमाणात त्याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

●कांदा व केस

कांद्याचा रस आपल्या केसांच्या कूपांना पुनरुज्जीवित करण्यास मदत करतो. जर तुम्ही कांद्याच्या रसात 2 चमचे खोबरेल तेल मिक्स केले तर ते तुमच्या केसांसाठी आणखी फायदेशीर ठरते. कारण खोबरेल तेलात अँटी-फंगल गुणधर्म आढळतात जे टाळूच्या संसर्गापासून व कोंड्यापासून संरक्षण करतात. तसंच आपले केस निरोगी राहतात.

●कांदयाचे तेल कसे बनवावे?

कांद्याचे तेल बनवण्यासाठी, कांदा बारीक चिरून घ्या व एका पॅनमध्ये तेल (जसे की खोबरेल तेल अथवा ऑलिव्ह तेल) मिसळा. यानंतर, हे मिश्रण मंद आचेवर, कांदा सोनेरी होईपर्यंत शिजवा त्यानंतर कांदा सोनेरी झाला की थंड होऊ द्या. आता गाळणीतून तेल गाळून घ्या जेणेकरून फक्त तेल शिल्लक राहील. आता हे कांद्याचे तेल तुम्ही केसांना लावू शकता.

1)कांद्याचा रस केसांवर किती काळ ठेवता?

कांद्याचा रस थेट तुमच्या टाळू व केसांच्या मुळांना लावा. कांद्याचा रस समान रीतीने वितरीत केला जाईल याची खात्री करण्यासाठी काही मिनिटे आपल्या टाळूची मालिश करा. कांद्याचा रस केसांवर किमान ३० मिनिटे ते एक तास राहू द्या. सौम्य शैम्पू व थंड पाण्याने आपले केस पूर्णपणे स्वच्छ धुवा.

2)केसांसाठी कोणता कांदा चांगला आहे?

उत्तर- होय, लाल कांदा . लाल कांद्याचे तुमच्या केसांसाठी अनेक फायदे आहेत जसे की वाढ, केसगळती नियंत्रण व बरेच काही. आपण कदाचित विचार करत असाल की कांदा – एक सामान्य स्वयंपाकघरातील मुख्य – केसांसाठी कसा वापरला जाऊ शकतो व खरं तर फायदेशीर ठरू शकतो. लाल कांद्याची केसांची उत्पादने/रस हे केसांच्या वाढीच्या बाबतीत जादूने काम करतात.

●कांदा चाळ अनुदान किती?

कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.

●अनुदानाचे उद्दिष्ट काय?

कांदा चाळ उभारल्याने शेतकर्‍याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल व अधिक नफा मिळवता येईल.
हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव अत्यंत कमी होतात तसेच हंगामा नंतर कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे.

कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे

●कांदा चाळ अनुदान योजना पात्रता

या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार शेतकऱ्याच्यी स्वतःच्या मालकीची जमीन असणे गरजेचे आहे.

७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.

अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.

●कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?

वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी

शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट

शेतकरी महिला गट

शेतकऱ्यांची उत्पादक संघ

नोंदणीकृत शेती संबंधित संस्था

शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था

सहकारी पणन संघ

आवश्यक कागदपत्रे –

सातबारा उतारा

आधार कार्डची छायांकित प्रत

आधार लिंक बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत

संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)

विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २)

अर्ज कुठे करायचा?

या अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in/) या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.

रजिस्ट्रेशन करताना महत्वाची ती सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.

पूर्व संमती पत्र आलेल्या शेतकऱ्याना सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये सादर करावा लागतो. पूर्वसंमती पत्राबरोबर आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे नियमाचे असणार आहे.

तुमचा तालुका कृषी अधिकारी यांच्याद्वारे अनुदान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल.

कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवावे लागेल.

आम्ही या लेखातून तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजने विषयीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी सहाय्यक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा व तुमच्या शंकांचे निरसन करावे.

●कांदा बाजारभाव काय आहे?

महाराष्ट्रात कांद्याचा दर किती आहे?
नवीनतम बाजार दरांनुसार, महाराष्ट्रात कांद्याची सरासरी किंमत ₹1183.33/क्विंटल आहे. सर्वात कमी बाजारभाव ₹200/क्विंटल आहे. सर्वात महाग बाजारभाव ₹3000/क्विंटल आहे.

 

FAQ
1) भारतात कांदा कुठे पिकतो?
उत्तर-   : महाराष्ट्र हे 30.41% उत्पादन वाटा असलेले प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे, त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात

2)2023 मध्ये सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन करणारा देश कोणता आहे?

उत्तर- रवर्षी २६,७३८ मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन करणारा भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात उगवलेला कांदा तिखटपणासाठी ओळखला जातो व वर्षभर वाढतो. चीन दरवर्षी 23,660 मेट्रिक टन अथवा सुमारे 20 दशलक्ष टन उत्पादन करतो, 9.2 दशलक्ष एकर जमीन केवळ कांद्यासाठी समर्पित आहे.

3)कांद्याचे दर जास्त का?

उत्तर-  साठवलेला रब्बी कांदा संपुष्टात आल्याने व खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्याने पुरवठ्याची तंग स्थिती आहे, परिणामी भाव वाढले आहेत . हंगामानुसार, ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढतात व नंतर डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये घसरतात.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: