शेवगा
शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे ‘तोंड येणे’ या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन फायद्याचे आहे. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.
●शेवगा लागवड कशी करावी?
शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या हलक्या जमिनी उपयुक्त ठरतात. शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असली तरी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा उत्तम होणाऱ्या जमिनीत फायद्याची ठरते. पाणि धरून ठेवणारी जमीन पिकास मानवत नाही. परंतु निचरा न होणाऱ्या भारी काळ्या जमीनीत शेवगा लागवड करू नये.
जमिनीत पाण्यामुळे झाडांची मुळे कुजतात, झाडे मरतात. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ५ ते ६.५ असावा. जमीन भुसभुसीत, सेंद्रिय पदार्थयुक्त अशी असावी. ज्या जमीनीत क्लेचे प्रमाण अधिक आहे त्या जमीनीत लागवड शक्यतो करू नये.
महाराष्ट्र राज्यात गेल्या २० वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली आहे, ती मोठ्या संख्येने यशस्वी झालेली दिसून येते. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला बिलकुल पाणी नसले तरीही झाड मरत नसते. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे ७ ते ८ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळत शेवग्याची लागवड कोकणातील अति पावसाच्या जिल्ह्य़ांत ऑगष्ट ते सप्टेंबरपासुन करावी. व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड करायची असल्यास ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून ते जानेवारीपर्यंत केव्हाही करता येते.
शेवगा शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती.
◆शेवगा पिकाची लागवड बियापासुन तसेच काड्यांपासुन केली जाते. काड्यांपासुन होणारी लागवड हि बहुवार्षिक शेवग्याची केली जाते. वार्षिक शेवग्याची लागवड हि बियापासुन करतात. साधारण १० गॅम वजनात ३५ बिया असतात. प्रति बि साधारणता ०.२८८ गॅम वजन भरते. एक एकर क्षेत्रात लागवडीकरिता २५० गॅम बियाणे पुरेसे ठरता. जवळपास एकूण ८७५ बिया एक एकर क्षेत्रात २.५ × २.५ मिटर अंतरावर लागवड केल्यास ६४० रोपे बसतात. बेड तयार करून अथवा प्लास्टिक पिशव्या भरून रोपांची निर्मीती केली जाते. शेवग्याचे बियाणे उपलब्ध झाल्यावर त्याचे प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करावी. बियांची लागवड हि २ सेंटीमीटर खोलीवर करावी. लागवडीसाठी पिशवी भरताना गाळ, माती तसेच पूर्णपणे कुजलेले शेणखत अथवा त्याहुन अधिक उत्तम असे निंबोळी पेंडीचा विपर करावा. बियाणे टोकताना त्यास इजा होऊ नये म्हणून बी न दाबता हळुवारपणे पिशवीत ठेवावे व नंतर त्यावर माती टाकावी, हळुवार हाताने पाणी घालावे. बि लागवडीनंतर साधारणपणे ३० दिवसात रोप पुनर्लागवडीसाठी तयार होते. शेवग्याचे बी पिशवीत लावल्यानंतर एक महिण्याच्या आत पुन्हा लागवड होईल याची काळजी घ्यावी. रोप आधीक काळ पिशवीत रहील्यास सोटमुळ वाढून वेटोळे होतात. रोप खराब होऊन पाने गळून रोपे जळण्याची शक्यता वाढते.
◆लागवडीसाठी २ ×२ ×२ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे पाडण होत नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने खोल सरी करावी. त्यात प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत एक घमेले, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व ५ ते १० ग्रॅम फोरेट टाकूण हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे बनवून घ्यावे व एक-दोन चांगले पाऊस पडल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे.
●शेवगा जाती
शेवग्याच्या सुधारित जाती
१) जाफना :
हा शेवगाचा वाण स्थानिक व लोकल आहे. देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सेंटीमीटर लांब असते. या वाणाला वर्षांतून एक दाच म्हणजे फेब्रुवारीत फुले येतात. मार्च, एप्रिल, मेमध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२, शेंगा बसतात. प्रत्येक झाडाला ऐका हंगामात १५० ते २०० शेंगा लागतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.
२) रोहित-१ :
या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सेंटीमीटर असून, शेंगा सरळ, गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न अधिक आहे व्यापारी उत्पन्न मिळविण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे पीक मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या असतात.
३) कोकण रुचिरा :
हा वाण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विकसित करण्यात आला आहे. कोकणासाठी शिफारस केली आहे. या झाडाची उंची ५ ते ६ मीटर असुन याच्या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंग एका देठावर एक या प्रमाणे येते या वाणाला एकाच हंगामात शेंगा लागतात. साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दर झाडी पी. के. एम. २ या वाणाचा तुलनेत ४० टक्के पीक मिळते. शेंगाची लांबी १.५ ते २ फुट असते व शेंगा त्रिकोणी आकाताच्या असतात. संपूर्ण वाढलेल्या झाडापासुन सरासरी ३५ ते ४० शेंगा मिळतात.
4)भाग्या (के.डी.एम.०१) :
कर्नाटक राज्यातील बागलकोट कृषि विध्यापीठाद्वारे हि जात प्रसारित केली असुन हि जात बारमाही उत्पादन देणारी आहे. ४ ते ५ महिण्यात फलधारणा होत असुन शेंगाची चव उत्तम आहे. प्रति झाड २०० ते २५० शेंगा प्रति वर्ष मिळतात.
५) ओडिसी : हा वाण सुध्दा तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला असून हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतरपीक शेवगा शेतीत आहे.
६) पी के. एम.१ :
हे वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आहे. हा वाण चवदार आहे. शेंगा लवकर येतात. शेंगा दोन ते अडीच फुट लाम, पोपटी रंगाच्या भरपूर, चविष्ट गराच्या असल्याने देशांतर्गत निर्यातीसाठी भरपूर मागणी आहे. या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत.
◆रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात.
◆शेंगा ४० ते ४५ सेंटीमीटर लांब असतात.
◆या वाणाचे महाराष्ट्रातील वातावरणात वर्षांतून २ वेळा उत्पन्न मिळते.
◆शेंगा वजनदार व चविष्ट असता, मात्र बी मोठे होत नाही.
◆या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच वाढतात.
◆दोन्ही हंगामातील मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
◆ही जात अशा लागवड पध्दतीसाठी योग्य ठरते. शेवग्याची छाटणी केल्यानंतर त्याच्या फांद्या पाने जमिनीवर नैसर्गिक आच्छादन म्हणुन टाकले जातात. अशा प्रकारच्या नैसर्गिक आच्छादनामुळे जमिनीची धुप थांबविण्यात मदत मिळते, पाणी बाष्पीभवनाव्दारे उडुन जाण्याचे प्रमाण कमी होते, कालांतराने जमिनीत नैसर्गिक असे सेंद्रियखत देखिल मिसळले जाते.
७)पी .के. एम .२
हे वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केले आहे. हे वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतरपीक शेवगा शेतीत आहे.
◆शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच झाली आहे.
◆भारतात आज माहित असलेल्या सर्व शेवगा वाणात हे वाण मोठ्या उत्पादन देते. दोन हंगामात ओलीताखाली, छाटणी व खतव्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात.
◆या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत.
◆सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सेंटीमीटर लांब येतात.
◆लांब व वजनदार शेंग यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जास्त मिळतो.
◆एका झाडाला एका हंगामात २१९० शेंगा मिळण्याचा विक्रम या वाणाने केला.
◆या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही.
बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्याकरीता याच वाणाला प्राधान्य दिल्या जाते.
◆सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.
★थोडक्यात पी .के. एम २ हा वाण लावणे, वाढविणे, जोपासणे योग्य व महत्वाचे आहे. यावरील वाणानंतर शेवगा उत्तपणाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवड ओडिसी व पी .के. एम २ ची आहे. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम, चव, लांबी या दृष्टीने पी .के. एम .२ सर्वश्रेष्ठ आहे.
१) दत्त शेवगा कोल्हापूर,
२) शबनम शेवगा,
३) जी.के.व्ही.के. १
४) जी.के.व्ही ३,
५) चेन मुरिंगा,
६) चावा काचेरी,
७) कोईमतूर, इ. मात्र ज्यादा उत्पादन २ वेळा हंगाम, चव व लांबी या दृष्टीने ओडिसी सर्वोतमआहे.
पाणी व्यवस्थापन
◆साधारणतः महिन्यातुन एकदा पाणी दिले तरी सुद्धा हे पिक उत्पादन देण्यास परिपूर्ण आहे. तसे शेवगा हे कमी पाण्यात येणारे पिक आहे. ज्यावेळेस पिकाची लागवड हि संरक्षित पाणी उपलब्ध असतांना ड्रिप इरिगेशन चा वापरन करता केली जाते तेव्हा पिकास पाऊस नसतांनाच्या काळात महिन्यातुन एकदा पाणी दिले गेले त्यावेळेस १६.८६ मे.टन इतके उत्पादन प्रती एकर मिळाले (एन आर सी एस २००२) थंबुराज (२००१) यांच्या मते पिकास १० ते १५ दिवसांतुन एकदा पाणी दिले तरी पुरेसे होते.
◆ड्रिप इरिगेशन असतानी उन्हाळाच्या काळात ८ ते १० लि. पाणी प्रती दिवस ( २ लि. क्षमतेचे ड्रिपर ४ तास) व ईतर काळात त्याच्या नअर्धे म्हणजेच ४ ते ५ लि. पाणी प्रती दिवस (२ लि. क्षमतेचे ड्रिपर २ तास) दिल्यास पिकापासुन उत्तम उत्पादन मिळते.
●शेवगा छाटणी
◆शेवगा पिकाची २.५ x२.५ मीटरवर लागवड केल्यावर एकरी ६४० रोप लावली जाता. (१६०० रोप प्रती हेक्टर) लागवड करण्याआधी ४५ x ४५ x ४५ से.मी. आकाराचे खड्डे घेवुन त्यात शेणखत, गांडुळखत, मॅन्कोझेब, सिंगल सुपर फॉस्फेट मातीत टाकुन त्यानंतर खड्डे भरुन लागवड करावी.
◆शेवगा लागवड झाल्या नंतर ७० ते ७५ दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास अधिक प्रमाणात फांद्या मिळुन फळांची संख्या वाढविण्यात मदत होते. ६० ते ७५ दिवसांत केलेल्या शेंडा खुडणे या क्रियेमुळे जास्तीत जास्त फांद्या मिळतात, त्यानंतर केलेल्या अशा प्रक्रियेमुळे मात्र हव्या त्या प्रमाणात जास्त फांद्या मिळत नाहीत. एका रोपास ६ ते १० फांद्या असणे उत्तम ठरते.
◆शेवग्याचे रोप लावल्यानंतर झाडाची उंची ४ फूट झाल्यावर ३ फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून जुलैत लागवड केली असता जानेवारी फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीकरीता फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील संपूर्न भाग छाटून टाकावा.
ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे पीक मिळते. खर्च वजा केला असता ३० ते ५० हजार रुपये नफा होतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे पीक मिळते ६० ते ८० हजार रुपयांचा नफा होतो. शेवगा शेतीचे उत्तम व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायती शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंतचे पीक मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे, मुंबई बाजारात उत्तम दर मिळतात.
◆शेवग्याच्या स्वतंत्र लागवडी बरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ व आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे उत्तमथरते. वरील फळझाडांचा नफा मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो, फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगाची झाडे कमी केली तरी चालतात.
●शेवगा औषधी उपयोग काय आहेत?
तज्ञांच्या नुसार शेवगा वनस्पति मध्ये संत्र्यापेक्षा ७ पट अधिक विटामीन C, गाजरापेक्षा १० पट अधिक विटामीन A, दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम, दह्याच्या ९ पट जास्त प्रोटीन, केळी पेक्षा १५ पट जास्त पोटॅशियम आणि २५ पट जास्त आयर्न आढळते.”
महाराष्ट्रात जास्त करून या झाडाच्या शेंगा वापरल्या जातात. याची भाजी करून अगदी आवडीने खाल्ली जाते. या शेंगांना immature pods असे इंग्लिश मध्ये म्हणले जाते.
शेवग्याचे आयुर्वेदिक /औषधीय गुणधर्म गुणधर्म –
१. हाडे मजबूत व निरोगी राहण्याकरिता शेवग्याची भाजी नियमित खावी.
२. वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगाचे सूप बनवून प्यावे. नियमित पिल्यास चरबीचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच नियमित व्यायाम देखील करावा.
३. शारीरिक कमजोर असल्यास शेवग्याच्या शेंगा नियमित आहारात घ्याव्यात.
४. तसेच या शेंगानी संधिवात, नेत्ररोग, स्नायूंची कमजोरी या व्याधी देखील दूर होतात.
५. शेवगा हा गरम आहे म्हणून त्याचा वात व कफ या प्रकारच्या आजारांवर उत्तम उपयोग होतो.
६. शेवगा हा उत्तम पाचक आहे. पोटातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन रक्तप्रवाह सुधारतो.
●शेवगा बाजार भाव काय आहेत?
ताज्या बाजार दरांनुसार, महाराष्ट्र मध्ये शेवगा बाजारभाव ₹4000 प्रति क्विंटल आहे.
किमान किंमत- ₹2000
कमाल किंमत- ₹6000
●शेवगा पाने औषधी उपयोग काय?
शेवगा पाने
पोटॅशियम (potassium) हे उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशन सारख्ये आजार कमी करण्यास उपुक्तत ठरते. हेच हायपरटेंशन ह्रदयविकार व ईतर गंभीर ह्रदय संबंधितचा आजारचे कारण ठरते.
शेवगा शेंगाच्या बियांमद्धे ओलिक ऍसिड (oleic acid) नावाचे ऍसिड असते. हे एक फॅटी ऍसिड चा प्रकार आहे जो ह्रदयसाठी आरोग्यदायी ठरतो.
शेवगा ची पाने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यामुळे ह्रदयविकार सारखे आजार शरीरापासून दूर होता.
●शेवगा शेंग
शेवगा चे झाड तसे दुर्मिळ नाही. अगदी सहज उपलब्ध होत. तसेच भरपूर ठिकाणी दिसणारे व लागवड करायला देखील सोपे आहे.
या शेवगा झाडाचे विशेषता म्हणजे याचे सर्व भाग हे पोषक घटकांनी भरपूर आहेत व औषधी म्हणून उपयोगी आहेत. जसे की या झाडाची साल, पाने, फुले, फळे आणि शेंगा.
शेवगा मध्ये अधिक प्रमाणात विटामीन (मुख्य करून विटामीन C), minerals, ओलिक ऍसिड (oleic acid) जे ह्रदयासाठी आरोग्यदायी मानले जाते व फायबर असतात. या सोबत ह्रदयविकार व मधुमेह यांना नियंत्रणात ठेवणारे काही अँटिऑक्सिडंट्स व अँटीइंफ्लेमेटरी घटक ही शेवगा मध्ये आढळतात.
●शेवगा भाजी रेसिपी मराठी
शेवग्याची भाजी मृग नक्षत्रात खाल्ली जाते. मात्र, मृग नक्षत्र झाले, की ही भाजी वर्षभर खाल्ली जात नाही. शेवग्याची शेंग जशी वर्षभर खाऊ शकता, तशाच पद्धतीने पानांची भाजीही पावसाळा व हिवाळ्यात खाल्ली पाहिजे. पानांत अनेक महत्त्वाचे घटक आहेत, जे आरोग्य सुदृढ करतात. शेवग्याची फुले, पाने, शेंगांचा पाककृतीक वापर होतो. तुरट असूनही चवीला असलेला शेवगा ३०० विकारांवर मात करणारा, कुपोषण थांबविणारा आहे.
●शेवगा खाण्याचे फायदे कोणते?
प्रतिकारशक्ती वाढवणे
स्टोन बाहेर काढणे
कमी कोलेस्ट्रॉल
रक्तदाब सामान्य ठेवणे
पचन सुधारणे
कॅव्हिटीपासून दातांचे संरक्षण करणे
पोटातील जंत दूर करणे
सायटिका, सांधेदुखीमध्ये फायदेशीर
●शेवगा लागवड योजना काय आहे?
केंद्र शासनाने सन 2022-23 या वर्षापासून पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान National Live Stock Mission 2022 योजनेस मंजूरी प्रदान केली आहे.
या योजनेंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उतपन्न या योजनांकरीता 50% अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अनुदानाची अधिकतम मर्यादा वैरण विकास या घटकास प्रकल्पानुसार रु. 50 लक्ष अशी आहे.
याच योजनेअंतर्गत शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता शेतकऱ्यांना वैरणी साठी शेवग्याची लागवड करण्याकरिता प्रती हेक्टरी 30 हजार रुपये प्रती लाभार्थी अशा प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदाना अंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा बियाणे (पीकेएम-1) दिले जाते. ज्यात बियाणाची किंमत रु. 6 हजार 750 तर उर्वरित अनुदान रु. 23 हजार 250 हे दोन टप्प्यांनअंतर्गत शेतकऱ्यांना Dbt द्वारे वितरीत करण्यात येते.
● शेवगा पाला पावडर उपयोग काय?
शेवगाचा शेंगा जशा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहेत तशाच शेवगाची पाने देखील मधुमेह करीता उपयोगी ठरतात.
एका संशोधनात ३० महिलांनी नियमित तीन महिन्यांसाठी रोज १.५ चमचा शेवग्याच्या पानाची पाऊडर घेतली. यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १३.५ टक्क्याने कमी झाल्याचे दिसले.
दुसऱ्या एका अभ्यासात ६ लोकांनी काही दिवसांसाठी त्यांच्या आहारात रोज ५० मीली ग्रॅम शेवग्याच्या पानांचा समावेश केला असता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी २१ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले.
शेवग्याच्या पानांमध्ये आढळणारे आयसोथियोसायनेट (Isothiocyanates) हे घटक मधुमेह विरुद्ध काम करतात तसेच अँटिऑक्सिडेंट म्हणून देखील काम करतात.
शेंगांमद्धे आढळणारे क्लोरोजेनिक ऍसिड हे शेवग्याच्या पानांमध्ये देखील मिळते. हे देखील मधुमेह विरुद्ध काम करणारे एक कंपाऊंड आहे
खूप छान माहिती आहे , सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवड व खत व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती पाठवा
माहिती छान आहे सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवड व खत व्यवस्थापन याची माहिती पाठवा
Pkm 1 seed कुठे मिळेल