टरबूज / कलिंगड लागवडीविषयी संपूर्ण माहिती

●टरबूज

टरबूज हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक, व्याधीशामक व स्वदिष्ट असून जाम –जेली, सौस निर्मितीत उपयोगी पडते. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी व पौष्टिक असतात. त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्राद्यानच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत

●टरबूज लागवड कोणत्या महिन्यात करावी?

या पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते.

●टरबूज लागवड पद्धत | kalingad lagwad method –

टरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड पुढील प्रमाने केली जाते.

1. आळे पद्धत – ठराविक अंतराणे आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी 3-4 बिया टोकतात.
2. सरी वरंबा पद्धत – 2 X 0.5 मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी 1 X 0.5 मीटर अंतरावर 3 ते 4 बिया टोकून लावाव्यात
3. रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतिची लागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेल गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येत नाही व खराब होत नाहीत. यासाठी 3 ते 4 मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना 1 ते 1.5 मी. अंतरावर 3 ते 4 बिया टाकाव्यात.

टरबूज / कलिंगड लागवडीविषयी संपूर्ण माहिती
टरबूज / कलिंगड

●टरबूज बियाणे

अर्का ज्योती – ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकराचे पातळ हिरव्यारंगाचे व गडद हिरवे पट्टेअसलेले असून गडदगुलाबी व गोड असते. ही जात साठवणूकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ८०० क्विंटल मिळते.

अर्का माणिक – या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती ,साल पातळ हिरव्या रंगाची असून गडद हिरव्यारंगाचे पट्टे असतात. फळाचे वजन ६ किलो पर्यंत असते. हेक्टरी उत्पादन ६०० क्विंटल मिळते.

आशियाई यामाटो – ही जपानी जात असून मध्यम कालावधीत तयार होते. फळांचे सरासरी वजन ७ ते ८ किलो भरते. फळ फिकट रंगचे व गडद पट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो.

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?

शुगर बेबी – ही जात महारष्ट्रात लोकप्रिय आहे. फळ मध्यम आकाराचे ४ ते ५ किलो इतके असून फळाचा रंग कळपात हिराव व गर लाल रंगाचा अत्यंत गोड असून बिया लहान असतात.

न्यू हँम्प शायर – ह्या फळांचीजात लवकर येणारी असून फळ अंडाकृती व साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर गडद हिरवे पट्टे असणारी व गर गडद लाल व गोड असतो.

या शिवाय दुर्गापुर केसर, अर्का माणिक व पुसा बेदाणा या जाती लागवडीस उत्तम आहेत.

पुसा शरबती – या जातीची फळांचा आकार गोल,किंचित लांबट ,साल खडबडीत जाळीयुक्त व मधून मधून हिरवे पट्टे ,गर नारंगी रंगाचा व जाड असतो.

हरा मधु – ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट हिरव्या रंगाचा व गोड असतो,

अर्का राजहंस – ही लवकर येणारी जात आहे फळ मध्यम ते मोठया आकाराचे १ त्ये १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवनुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.

दुर्गापूर मधु – मध्यम कालावधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असते साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धारी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.

अर्का जीत – ही लवकर येणारी जात असून फळाचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल, आकर्षक व पिवळ्या रंगाचे असतात.
या शिवाय लखनऊ सफेदा, खारीधारी, फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस उत्तम आहेत.

अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा

●टरबूज कापणीनंतर घ्यावयाची काळजी

लागवडीच्या अवस्थेपासून बाजारपेठेची परिपक्वता गाठण्यासाठी कलिंगडाला अनुक्रमे ६५, ७५ आणि ९५ दिवस लागतात. तर

टरबूज कापणीचा परिपक्वता निर्देशांक हा गराचा रंग (७५% लाल) व एकूण विद्रव्य घटक १०% ह्यावर अवलंबून असतो.

काढणीपश्चात हाताळणीच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होऊन शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. टरबुजाच्या रसाची बिघाड हि कॅन्डिडा स्यूडोट्रोपलिसिस, कॅन्डीडा ट्रोपिकलिस, सॅचरोमायसेस सेरेविसिया, ट्रायकोस्पोरन, सेरटिया प्रजाती व स्टेफिलोकोकस सॅप्रोफिटिकस ह्या सूक्ष्मजीवांमुळे होते. कलिंगड हे फळ शीत कक्षात १०-१५ डिग्री सेल्सिअस तापमान व सापेक्ष आर्द्रता ९०% पर्यंत ठेऊन १४-२१ दिवस जतन केले जाऊ शकते.

कडबा कुटी मशीन अनुदान योजना 2024

टरबुज धुणे आवश्यक नसते परंतु जेव्हा जास्त प्रमाणात माती लागलेली असते तेव्हा अशा परिस्थितीत स्वच्छ पाणी वापरले पाहिजे. कलिंगडाचे वर्गीकरण कलिंगडाच्या शारीरिक स्वरुपावर आधारित असते. काढणीपश्चात हाताळणी दरम्यान, फळांची ओरखडे टाळली पाहिजे व रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगग्रस्त फळे इतर चांगल्या फळांतून काढून टाकावे.

टरबुजावर सामान्य बुरशीजन्य आजार हा फ्यूशेरियम, ब्लॅक रॉट, स्टेम एंड रॉट व अँथ्रॅकोनोझ यामुळे होऊन ज्याचा परिणाम काढणीपश्चात आयुष्यात होतो. मऊ रॉट हा सर्वात सामान्य जीवाणूजन्य रोग आहे त्यामुळे वरील आवरणाचा नाश होतो. कलिंगडावर परिणाम करणारे पोस्टहारवेस्ट डिसऑर्डर यांत्रिक जखम, शीतकरण इजा व इथिलीन नुकसान हे आहेत.

फळ व भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी असेप्टिक पॅकेजिंग, क्रायोजेनिक फ्रीझिंग, डीप फ्रीझिंग, श्रिंक रॅपिंग व नियंत्रित वातावरणात साठवण यासारख्या आधुनिक तंत्रांवर भर देण्यात यावा. कलिंगडाच्या कापलेल्या फोडीचे आयुष्य हे २ दिवस असते. तथापि हे ओझोन ट्रीटमेंट व पॉलिथिलीन पॅकेजिंगमध्ये ४ डिग्री सेल्सियस तापमानावर ७ दिवस पर्यंत वाढविल्या जाते. ओझोन ट्रीटमेंट सूक्ष्मजीव भार कमी करते.

कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका,  अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत

कापणीनंतर टरबुजामध्ये अंतर्गत साखर वाढ अथवा रंगाचा विकास होत नाही, यामुळे  कलिंगडाची पूर्ण वाढ झाल्यावरच काढणी केली पाहिजे. टरबुजावर आढळून येणारी सामान्य विकृती म्हणजे यांत्रिक जखम होय ज्याचे मुख्य कारण योग्य पोस्टहार्वेस्ट हाताळणीची कमतरता, १० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात साठवणुकीमुळे शीतकरण इजा, इथिलीन संपर्कात येण्यामुळे इथिलीनचे नुकसान व आतील पोकळपणा.

सूक्ष्मजीव टरबुजाच्या बाह्य पृष्ठभागावर आढळतात त्यात मुख्य स्यूडोमोनस, ई. कोलाई व एन्टरोबॅक्टर यांचा समावेश असतो. हेच सूक्ष्मजीव ताजे कापलेल्या कलिंगडाच्या पृष्ठभागावर आढळतात व यामुळे कलिंगड काप लवकर खराब होते. रंग बदल, चव तसेच घट्टपणा कमी होणे हे सूक्ष्मजीवाच्या क्रियामुळे होत असते.

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

●टरबूज खत व्यवस्थापन कसे करावे?

25 किलो खत दहा दिवसांमध्ये संपवायचे आहे.
– पण याचेही पाच पाच किलोचे टप्पे करत दोन दिवसाच्या अंतराने द्यायचे आहे.
– व सोबतच मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे.
– तर हे देखील 15 किलो दहा दिवसांमध्ये द्यायचे आहे.
– याचेही तीन किलोचे टप्पे करून दोन दिवसांच्या अंतराने द्यायचे आहे.

6. टरबुज पिक ३५ दिवसाच्या कालावधीत असताना ( खताचा तिसरा टप्पा )

– टरबुज पिकाचा 35 व्या दिवशी योग्य खत दिले पाहिजे.
– व ते योग्य खत म्हणजे कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन तर हे फक्त पाच किलो कॅल्शियम नायट्रेट व एक किलो बोरॉन प्रति एकर द्यायचे आहे

टरबूज एकरी उत्पादन किती होते?

हेक्टरी उत्पादन ६०० क्विंटल मिळते.

●टरबूज फायदे कोणते?

टरबूज बी खाण्याचे फायदे कोणते?
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. कलिंगडमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए व बीटा-कॅरोटीनची पातळी त्वचा निरोगी ठेवते व केसांच्या वाढीस मदत करते. शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असल्यास टरबुज त्यापासून आराम देते

●टरबूज खाण्याचे तोटे कोणते?

टरबुज खाताना या गोष्टी लक्षात ठेवारात्री टरबुज खाणे टाळावे. रात्री टरबुज खाल्ल्याने पचन बिघडू शकते, पोट खराब होऊ शकते व वजन वाढू शकते.

●उन्हाळी टरबूज लागवड

महाराष्ट्रात टरबूज हे पिक उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या टरबुजाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. टरबुजा च्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते.

FAQ

1) टरबूज किती दिवसाचे पीक आहे?
टरबुजाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व संकरीत अशा अनेक जाती आहेत. त्यातली शुगर बेबी हि २-२ किलो वजनाची फळे देणारी, अतिशय गोड, लाल व बारीक बियांची ११ ते १३ टक्के साखरउतारा असणारी हि जात विक्रीयोग्य आहे. फक्त ७५ ते ८० दिवसात हे फळं तयार होते.

2) टरबूज कधी लावावे?
काही ठिकाणी टरबुज लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो. एक एकर टरबुज लागवडीसाठी 250 ते 500 ग्रॅम संकरित बियाणे वापरावे.

3) टरबूज परिपक्व होण्याची लक्षणे कोणती असतात?
उत्तर-टरबूजावर साधारणतः पिवळसर गोल डाग पडला की ते परिपक्व झाले असे समजतात.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: