गवार लागवड कशी करावी संपूर्ण माहिती.

गवार लागवड कशी करावी?

गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्याला खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र व ६० किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पूर्ण होइपर्यत नियमित पाणी द्यावे.

गवार लागवड कशी करावी?

१)गवार लागवड टोचून,फेकून पेरून या पद्धतीने लावतात
२)गवार हे पिक उन्हाळी व हिवाळी दोन्ही हगामात लावतात.
3)गवार लागवड जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात करावी.
गवार हे पिक शेंगवर्गीय भाजीपिक आहे. महाराष्ट्रातील सर्व भागात हे पिक घेतले जाते राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात हे पिक घेवून भरपूर पैसा कमवता येतो.

गुलाब लागवड कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती

गवार लागवड जमीन कशी असावी?

हलक्या जमिनीत गवार झाडे खुरटी होवून लवकर शेंगा येतात.गाळाची जमीन असेल तर शेंगा उत्तम प्रतीच्या येतात खताची सुद्धा गरज जाणवत नाही.

गवार भाजी कशी करावी?

गवार स्वच्छ धुवावा.
कढईत तेल घाला, गरम झाले की राई, जिर आणि हिंगाची फोडणी द्या, हळद घाला. धुतलेली कट केलेली गवार टाका, झाकण लावुन मंद ॲाचेवर दहा मि. शिजु द्या, नंतर लाल तिखट, धना पावडर, शेंगदाण्याचा कुट, तिळाचा कुट, मीठ टाकुन छान परतुन घ्या, पुन्हा पाच मि. वाफेवर शिजु द्या
शेवटी कोथिंबीर टाकुन सऱ्ह्र करा, पोळी व भाकरी सोबत खाण्यास तयार आहे आपली गवारीच्या शेंगाची भाजी

तुर विकण्याची योग्य वेळ कोणती?

●गवार खाण्याचे फायदे कोणते?

शरीराच्या अनेक समस्यांवर गुणकारी ‘गवार’, या भाजीचे फायदे…
• पोटाच्या समस्यांपासून मिळते मुक्ती.
• वजन कमी होते.
• मधुमेह
• मजबूत हाडे
• गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
• त्वचेच्या समस्या दूर करण्यात लाभदायी
• रक्तदाब नियंत्रण
• गवार ही मूलतः मधुर, थंड, पित्तहारक, पौष्टिक, सारक, रुक्ष, जड, कफ आणि वायुकारक आहे.
• शरीराला कंड सुटत असल्यास गवारीच्या पानांचा आणि लसुणाचा एकत्रित रस काढून शरीरावर चोळावा.
• गवारीच्या पानांचा रस जखमेच्या व्रणावर लावल्यास जखम न पिकता लवकर भरून निघते .

हुरडा बिझनेस कसा करता येईल याविषयी संपूर्ण माहिती

●गवार खाण्याचे नुकसान कोणते?

• गवारीच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे रातांधळेपणा दूर होतो.
• दुभत्या गुरांना गवार खाऊ घातल्यास गुरे भरपूर दूध देतात तसेच बैलांना शक्ती प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा त्यांना गवारीचा खुराक देतात . गवारीचा उपयोग डिंक बनवण्यासाठीही होतो.
• गरोदर स्त्रिया आणि वातूळ प्रकृतीच्या माणसांनी गवारीची भाजी खाणे टाळावे. जून झालेल्या गवारीची भाजी खाल्ली तर पोटात कळ येऊन चक्कर आल्यासारखे वाटते. क्वचित चक्करही येते.

●गवार जाती कोणत्या?

पुसा सदाबहार, पुसा मोसमी, पुसा नवबहार, फुले गवार. ह्या जाती आहेत.
गवारीचे विविध वाण

पुसा सदाबहार : ही सरळ आणि उंच वाढणारी जात असून, उन्हाळी आणि खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा 12 ते १५ सें. मी. लांब असून, शेंगा हिरव्या रंगाच्या असतात. शेंगाची काढणी ४५ – ५५ दिवसांनी सुरू होते.

पुसा नवबहार : ही जात उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. शेंगा १५ सें. मी. लांब कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात. झाडांची सरळ वाढ होते. पानाच्या बोचक्यात शेंगाचा घोस असतो.

सुरती गवार : झाडास फांद्या अधिक असतात. ऑक्टोबरनंतर आणि उन्हाळ्यात घेतली जात असून तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालते. शेंगा जास्त पातळ, लांब, जाडसर आणि फताडी असून अधिक गुळचट व उभी लव असते. गुच्छ लागत नाहीत.

देशी (गावरान ) गवार : पुसा जातीचे शोध लागण्या अगोदर चाळीस वर्षापूर्वी गावोगाव देशी गवारीचे ‘बी’ प्रचलित होते. ही गवार आखूड, निबर, बीजयुक्त आणि केसाळ खाजविणारी परंतु चविष्ट असून, खेडेगावांमध्ये चवीने खाल्ली जाते. सोलापूरसारख्या जिल्ह्यामधील खेड्यात व शहरात या गवारीला खूप मागणी आहे.

नंदिनी (एनसीबी 12) : ही संकरीत जात असून ती निर्मल सिडस् कंपनीची गावारण गवारीसारखी जात आहे. याच्या शेंगा आखूड व कोवळ्या, मऊ असतात. विशेषत: याची चव चांगली असल्याने याला बाजारात चांगलीच मागणी असते. झाड लहान असल्यापासून पानाच्या बोचक्यात भरपूर शेंगा येतात. ही जात रोगप्रतिकारक्षम असल्याने व्यापारी लागवडीसाठी फायद्याची ठरते.
पुसा मोसमी – ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीच्या शेंगा १० – १२ सेंमी लांब असून ही जात ७५ – ८० दिवसात काढणीस सुरु होते

नाचणी भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?

●गावरान गवार कसा असतो?

गावरान गवार आखुड असतो.बारीक काटे असतात त्यावर. खूप जास्त हिरवा रंग असतो.

●गवार किड खते व्यवस्थापन

गवारीवरील कीड व रोग

मावा आणि तुडतुडे : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक १.५ मिली अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूसी अथवा मिथिलडिमेटॉन २५ ईसी दोन मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुरी : हा बुरशीजन्य रोग असून, पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होतात. हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो. याच्या नियंत्रणासाठी ५० % ताम्रयुक्त औषध कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात.

मर : हा बुरशीजन्य रोग असून ते या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते. प्रथमत: झाड पिवळे पडते व बुंध्याजवळ अशक्त बनते. याच्या नियंत्रणासाठी बियाणास प्रति किलो चार ग्रॅम थायरम चोळावे. रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतीने तम्ब्रयुक्त औषधाचे द्रावण आठ ते दहा सें.मी. खोल माती भिजेल असे ओतावे.
रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतिने तम्ब्रयुक्त औषधाचे द्रावण ८ – १० सेंमी खोल माती भिजेल असे ओतावे. कीड – या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो. उपाय – या किडीच्या नियत्रनासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक १. ५ मिली अथवा मोनोक्रोटोफाँस ३६ डब्लूसी अथवा मिथिलडिमेटाँन २५ ईसी २ मिली प्रतिलिटरपाण्यात मिसळून फावरावे.

गवार लागवड तंत्रज्ञान

गवार लागवड अंतर किती असावे?
पूर्वमशागत जमिनीची प्रत आणि हवामानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी ठेवावे व झाडातील अंतर २० ते ३० सेंमी ठेवावे.

भारतातील गवारचे सर्वात जास्त उत्पादन कोणते राज्य आहे?
पश्चिम भारतातील राजस्थान हे प्रमुख गवार उत्पादक राज्य आहे , जे उत्पादनात 70% आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातही गवारचे पीक घेतले जाते. भारतातील उत्पादन: गवार बियाणे – 8,50,000 टन प्रतिवर्ष (अंदाजे)

गवारीची भाजी सुरीने गवार कापून केली तर तिची चव आणि हाताने तुकडे करून केली तर तिची चव यात फरक का पडतो?
उत्तर-हो गवार सुरीने कापून केला तर शेंगाच्या काठाला एक तार असतो तो निघत नाही त्यामुळे भाजी चांगली लागत नाह

पावसाळी गवार लागवड कशी करावी ?

गवारीची पेरणी करण्यापूर्वी बी चांगले दोन-अडीच तास पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर सावलीत सुकवून मग पेरणी केल्यास उगवण अधिक होते. जमिनीला आधी पाणी देऊन वाफेवर आणून पेरणी केल्यासही त्याचे परिणाम चांगले निघतात. पेरणीनंतर थोडे पाणी द्यावे.

●उन्हाळी गवार लागवड कशी करावी?

गवार हे उष्ण हवामानातील पीक असून, सरासरी १८ – ३० अंश सेल्सिअस तापमानास हे पीक उत्तम येते. गवारीची लागवड खरीप व उन्हाळी अशी दोन्ही हंगामात केली जाते. उन्हाळी पीक शेंग भाजीसाठी घेतात. दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक आहे; अशा ठिकाणी गवार ‘बी’ उत्पादनात भरपूर वाव आहे.

गवारीच्या शेंगामध्ये फॉस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्वे बर्‍याच प्रमाणात असतात. त्यामुळे आहारदृष्ट्या गवार अतिशय लोकप्रिय भाजी आहे. त्यामुळे बाजारामध्ये गवारीच्या शेंगांना चांगलीच मागणी असते.

गवार भाजी आरोग्यासाठी चांगली आहे का?

गवार फली हा आहारातील फायबर, प्रथिने आणि खनिजांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि त्यात कॅलरीज देखील कमी आहेत . भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि जस्त यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यात अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स देखील आहेत ज्यांचा अनेक आरोग्य फायद्यांशी संबंध आहे.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: