हुरडा बिझनेस कसा करता येईल याविषयी संपूर्ण माहिती

हुरडा

हुरडा म्हणजे ज्वारी, वाणी, गव्हाचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यावर साधारणत: ३० ते ४० दिवसातील दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे हिरव्या रंगाचे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसरसित असतात. ज्वारीचे कणीस हे जाळावर अथवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून चोळून हे दाणे कणसापासून बाहेर काढले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित आहे. गार झाल्यावर हे दाण्यांना कडकपणा येतो. असे सगळ्यांनी एकत्र बसून कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. त्या पार्टीत हुरडा म्हणजे मुख्य असतो. त्याशिवाय वांगे भाजी भाकरी, चटनी, दही असा मेनू असतो. हे जेवणातले पदार्थ विभागा प्रमाणे बदलतात. सिंहगडच्या परिसरात त्यासोबत दही देण्याची पद्धत आहे

नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान दररोज सकाळी या गावांमधील शेतशिवारात कीर्तन, अभंगाच्या नादात तल्लीन होत शेतकरी हुरड्याच्या कणसाची कापणी करताना दिसतात.

सकाळी 5.30 वाजता या शेतकऱ्यांचा दिवस सुरू होतो. हातात धारदार विळा घेऊन व कमरेला मोठा रुमाल बांधून शेतकरी हुरड्याच्या कणसांची कापणी सुरू करतात.
कापलेलं कणीस पोत्यावर चोळल जातं व नंतर ते वाऱ्यावर उफणतात. पुढे त्याचं वजन करुन ते पॅक केलं जातं व हुरडा विक्रीसाठी सज्ज केला जातो. पण, याची सुरुवात होते ती ऑगस्ट महिन्यापासून.

“हुरडाचा लागवडीचा पहिला टप्पा येथील शेतकरी 1 ऑगस्टला चालू करता. त्याच्यानंतर पंधरा-पंधरा दिवसांनी बाकी सगळे टप्पे चालू करतो. लावल्यानंतर 3 महिन्यांनी हुरडा कापणीला सुरुवात होते.”
शेतकरी गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्याकडील 30 एकर क्षेत्रावर हुरडा लागवड करत आहेत. आधी ते ज्वारी व बाजरीचं पिक घेत होते.

हुरडा पिक का महत्वाचे:

“ज्वारी 3 ते 4 हजार रुपये क्विंटल विकलिजाते. हुरड्याचा दर आम्हाला 200, 120 रु. प्रती किलो मिळतो. त्याच्यामुळे आम्ही हुरड्यातच विकून टाकतो. ज्वारीचा प्रकार अलग व हा सुरती हुरड्याचा प्रकार अलग. ज्वारी म्हणजे शाळू जवारी आली व हा आहे वाणीचा हुरडा, ही व्हरायटी अलग आली.”
नरसापूर, सारंगपूर गावातील शेतकरी सुरती व गुळभेंडी या हुरड्याच्या वाणाची लागवड गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. हे हुरड्याचं पारंपरिक वाण आहे.

शेतात कापणीला आलेल्या सुरती हुरड्याच्या कणीस मी हातात घेऊन बघितलं ते एकदम मऊ जाणवलं. ज्यावेळेस मी हे कणीस हातने मळलं तेव्हा एकही दाणा कणसाला शिल्लक उरला नाही.

याशिवाय सुरती व गुळभेंडी हुरड्याचं वाण हे ज्वारीपेक्षा भिन्न आहे. याचा वापर पीठासाठी करता येत नाही. कणीस कापणीला आलं तर त्याचा उपयोग फक्त हुरड्यासाठीच करता येतो.

‘कापसापेक्षा हुरडा परवडला’

सारंगपूर येथील काही शेतकरी  यांनी कापूस पिकाबरोबर हुरड्याचीही लागवड केली आहे. हुरड्यातून 3 महिन्यांच्या कालावधीत एकरी लाखभर रुपयांचं उत्तन्न ते काढतात.

बीबीसी मराठी सारंगपूर गावात पोहोचलं तेव्हा संतोष व कुटुंबीय त्यांच्या शेतात कणसाची मळणी करत होते.
शेतकरी म्हणाले,“हुरडा हे नगदी उत्पन्न आहे व शेतकरीच याचा बाजारभाव ठरवू शकता. तसं कापसाचं नाही, कापसाचं सगळं व्यापाऱ्यावर निर्धारित आहे. कापसाला चार ते पाच फवारण्या कराव्या लागतात व डीएपीचे दोन-तीस डोस द्यावे लागते. तसा हुरड्याल एवढा खर्च नाहीये.

“नफ्याच्या बाबतीत विचार केला तर कापसापेक्षा दोन पट उत्पन्न आहे. वातावरण चांगल असल, तर एका एकरात 700 ते 800 किलो हुरडा निघतो. त्याच्यातून कधी एक लाखाचं तर कधी दीड लाखाचं उत्पन्न मिळतं. परंतु बाजारभाव कमी झाला तर एकरी 70 ते 80 हजार रुपये मिळतात.”

इतर गावांतही हुरडा उत्पादन

सारंगपूर, नरसापूर इथल्या शेतकऱ्यांचं हुरडा पिकातून मिळणारं उत्पन्न पाहून शेजारील मुरमी, दहेगाव बंगला येथील शेतकरीही हुरडा शेतीकडे वळाले आहेत.

आम्ही दिवसाच्या वेळी या गावांत गेलो असता कुणीही गावात दिसलं नाही. सगळ्या घरांना कुलूप लावलेलं असतं. सगळे हुरडा काढन्यासाठी शेतात गेलेत, असं इथल्या एक आजीबाई सांगत होत्या.

या गावांमधील शेतकरी औरंगाबाद-पुणे हायवेवर जागोजागी स्टॉल लावून हुरड्याची विक्री करताना दिसतात.
आम्ही औरंगाबाद-पुणे हायवेवर आलो असता रस्त्यावर जागोजागी स्टॉल दिसत होते. यापैकी एक स्टॉल होता मुरमी गावातील कांताबाई पारधे यांचा.

त्या म्हणाल्या,“सकाळी 6 वाजता आम्ही शेतात जातो. हुरडा काढतो व मग इथं विकायला आणतो. दिवसातन कधी 20 किलो, तर कधी 25 किलो तर कधी 10 किलो इतका विकतो. चांगला भाव असला तर हुरडा 250 रुपये किलोनं जातो. कमी असला तर 100 रुपये किलोनं जातो. यातून मग कधी हजार रुपये, तर कधी 500 रुपये घरी नेतो.”

‘2 गावांचा 10 कोटींचा टर्नओव्हर’

अण्णासाहेब रिंढे स्वत: हुरडा पिकवतातच, पण त्याशिवाय इतर शेतकऱ्यांचाही हुरडा विकत घेतात आणि तो पुणे, अमरावती या ठिकाणी सप्लाय करतात. त्यांचा स्वत:चा वार्षिक टर्नओव्हर 25 ते 30 लाख रुपये एवढा आहे.
आमची दोन्ही गावं सारंगपूर व नरसापूर मिळून हजार, ते अकराशे एकरमध्ये हुरडा असतो. आमच्या गावामधून रोजचा 8 ते 10 लाख रुपयांचा मालाची विक्री होते. वर्षातून म्हणाल तर चार महिन्याचं हे सीझन असतं आमचं. दोन गाव व सगळे शेतकरी मिळून 8 ते 10 कोटींचा टर्नओव्हर घेतो,” अण्णासाहेब सांगतनी म्हणाले.

हुरड्याच्या कडब्यातूनही आर्थिक कमाई

हुरडा काढल्यानंतर उरलेला कडबाही इथल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक कमाईचा मार्ग झालाय. आम्ही या गावांमध्ये जात असताना काही तरुणी बुरड्याचा कडबा (चारा) एका ठिकाणी जमा करताना दिसून आल्या.

“हुरड्याचे पैसे तर आम्हाला भेटतातच पण त्याचं जे वैरण आहे त्याचेही बऱ्यचप्रमानात पैसे आम्हाला भेटतात. जनावरासाठी चाऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी झालं. कापसाला भाव असल्यामुळे शाळू-ज्वारी आता कुणी घेत नाही. याच्यात आमचे हुरड्याचे पण पैसे होतातच पण पंधराशे-सोळाशे रुपये शेकडा चारा देखील विकला जातो. म्हणजे चाऱ्याचे देखील आम्हाला चांगले पैसे मिळतात,” अण्णासाहेब सांगत होते.

आता हुरड्याला प्रतीक्षा संशोधनाची!

हुरड्याची शेती ही मराठवाड्यातील या शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात व कमी कालावधीत, जास्त उत्पादन देणारी शेती ठरलीय. पण, हुरड्याचं आयुष्य हे या शेतीसमोरचं मोठं आव्हान आहे.

हुरड्याचं आयुष्य वाढल्यास त्याला कायमस्वरुपी बाजारपेठ मिळेल आणित्याचा थेट फायदा इथल्या हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना होईल.

त्यामुळे हुरड्याचं लाईफ वाढवण्यासाठी त्यावर संशोधन व्हायला हवं, अशी अपेक्षा इथले शेतकरी व्यक्त करतात.

हुरडा पीक हे सरासरी 1100 एकर वर घेतले जाते. या पिकाला फक्त 1 दिवसाचं आयुष्य आहे ते आयुष्य वाढवण्यासाठी फ्रॉझोन तंत्रज्ञान उपयोग केला जातो.

“यासाठी आत्माच्या सहायाने गुजरात येथील वाडीलाल इंडस्ट्री सोबत बोलणी सुरू आहे. हे तंत्रज्ञान आपल्याकडे वापरल्यास हुरडा दोन ते चार महिने टिकवता येऊ दर स्थिर राहण्यास मदत होईल.”

 

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?

कडबा कुटी मशीन अनुदान योजना 2024

अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा

कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका,  अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: