Bandhkam kamgar yojana 2023 बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र

Bandhkam kamgar yojana 2023 बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र

काय आहे बांधकाम कामगार योजना (What is Bandhkam Kamgar Yojana )
महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांचे भविष्य उज्वल होण्याकरिता महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारच्या योजना काढल्या आहेत आणि त्या योजनामध्ये बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. या योजने मार्फत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षणाकरिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजने मार्फत सुरू केल्या आहेत. बांधकाम कामगार योजने मार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिल्या जातात.

बांधकाम कामगार योजना नोंदणी
बांधकाम कामगार योजना नोंदणी

 

योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारासाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालीलप्रमाणे आहे.

मंडळाकडील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. १.५० लाख अनुदान महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर अनुज्ञेय असणारे रु. १८,०००/- तसेच स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रू.१२,०००/- असे एकूण रु. ३००००/- अनुदान रु. १.५० लाखामध्ये समाविष्ट असल्याने संबधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही

 

बांधकाम कामगार नोंदणी कुठे करावी?

Step 1: Mahabocw.in या अधिकृत पोर्टलवर जा. ‘वर्कर्स’ टॅब अंतर्गत ‘कामगार नोंदणी’ वर क्लिक करावे .
Step 2: ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष आणि कागदपत्रे तपासा.
Step 3: पुढील पृष्ठावर, महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म प्रदर्शित केला जाईल.

बांधकाम कामगार योजना फायदे कोणते?

●नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी ३०,०००/- रूपये अनुदान दिले जाते.
● नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास मोफत मध्यान्ह भोजन सुविधा दिली जाते. ●नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
बांधकाम कामगार योजना नोंदणी फॉर्म पीडीएफ
●बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय

◆बांधकाम कामगार योजनेची उद्दीष्टे

Bandhkam Kamgar Vibhag Yojana Maharashtra Purpose
●महाराष्ट्र राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबविणे हे बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
●नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
“●बांधकाम कामगारापर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचणे व त्यांच्याकडून विविध माहिती गोळा करणे.
●राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारणे
●योजनेच्या लाभा साठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत अधिक सुलभपणा आणणे.
●कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
●योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
●बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
●प्रत्येक बांधकाम कामगाराला नोंदणी क्रमांक देणे.
●कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
●योजनेअंतर्गत लाभार्थ्यास योजनेचा त्वरित लाभ देणे.
●कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
●नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया
●कामगारांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
●कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण
●राज्यातील कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे.

बांधकाम कामगार योजनेचे वैशिष्ट्ये

Bandhkam Kamgar Yojana Features

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली कामगारांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना आहे.
●या योजने अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगार सशक्त आणि आत्मनिर्भर होण्यास तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
●या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारास आणि त्याच्या कुटुंबास विविध प्रकारचे लाभ दिले जातात.
●बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारास मिळणारे आर्थिक सहाय्य त्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केले जातात.
●या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक सहाय्य तसेच आर्थिक सहाय्य केले जाते.
●या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रकिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतात त्यामुळे अर्जदार कामगारास अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती आपल्या मोबाईल च्या सहाय्याने वेळोवेळी माहिती मिळते
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना चे लाभार्थी .
Maharashtra Kamgar Yojana Beneficiary
बांधकाम कामगार योजनेचा लाभ नवीन इमारत बांधण्यापासून ते इमारत पूर्ण होईपर्यंत जे मजूर त्यामध्ये काम करतात अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेऊ शकतात .

व्हिडिओ बघा

कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी खालील प्रमाणे आहे

Badhkam Kamgar Yojana Marathi
इमारती,
रस्त्यावर,
रस्ते,
रेल्वे,
ट्रामवेज
एअरफील्ड,
सिंचन,
ड्रेनेज,
तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
निर्मिती,
पारेषण आणि पॉवर वितरण,
पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
तेल आणि गॅसची स्थापना,
इलेक्ट्रिक लाईन्स,
वायरलेस,
रेडिओ,
दूरदर्शन,
दूरध्वनी,
टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
डॅम
नद्या,
रक्षक,
पाणीपुरवठा,
टनेल,
पुल,
पदवीधर,
जलविद्युत,
पाइपलाइन,
टावर्स,
कूलिंग टॉवर्स,
ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
दगड कापणे, फोडणे आणि दगडाचा बारीक चुरा करणे.,
लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
गटार व नळजोडणीची कामे.,
वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
लोखंडाच्या अथवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत काम.
काच कापणे आणि काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा आणि छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.
सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
स्वयंपाक खोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
सिमेन्ट काँक्रिटच्या वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ आणि मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा बांधणे किंवा उभारणे.,
रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.

बांधकाम कामगार योजना फायदे
Bandhkam Vibhag Kamgar Yojana Benefits

●सामाजिक सुरक्षा
●नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी ३०,०००/- रूपये अनुदान दिले जाते. (विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक / प्रथम विवाह असल्याचे शपथपत्र)
●नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास मोफत मध्यान्ह भोजन सुविधा दिली जाते.
●नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. (पाल्याचे शाळेचे ओळखपत्र आवश्यक)
●महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब ५०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते. (अवजारे खरेदी करणार असल्याचे कामगारांचे हमीपत्र)
●नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
●बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारास पूर्व शिक्षण आणि ओळख प्रशिक्षण दिले जाते
●बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरविले जातात.
●या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारास अत्यावश्यक संच पुरविले जातात.
दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सवर् नोंदीत बांधकाम कामगाराना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी प्रति कामगार ३०.०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
शैक्षणिक सहाय्य्य
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १ली ते ७वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास २५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ८वी ते १०वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी ५०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११वी व इयत्ता १२वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (इयत्ता १०वी व १२वी ची गुणपत्रिका)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता ६०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी २००००/- रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
■संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते. ( MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा शुल्क पावती)
■नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात येईल.
■आरोग्यविषयक सहाय्य्य
नोंदणी केलेल्या स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारांस तसेच नोंदणी केलेल्या पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस २ जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके)
■लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ दिला जातो. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे)
■कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेव चा लाभ दिला जाईल. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबनियोजन शास्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र व अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र)
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस ७५ % किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जाईल. (७५ टक्के अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी किंवा मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके)
●नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो .
●नोंदणीकृत कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. (शासकीय किंवा निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र)
आर्थिक सहाय्य्य
■नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला किंवा बांधकाम कामगार kamavar असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा)
■नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचं कायदेशीर वारसास २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकऱ्यानी दिलेला मृत्यू दाखला)
●नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास शहरी अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.
■नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
■घर बांधणीसाठी ४.५ लाख रुपये अर्थसहाय्य (केंद्र शासन २ लाख रुपये व कल्याणकारी मंडळ २.५ लाख रुपये) दिले जातील .
नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १०.०००/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
●नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी किंवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त ५ वर्षांपर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
●घरखरेदी किंवा घरबांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाईल. (राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा किंवा कर्ज विम्याची पावती किंवा घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास रु६,०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते

 

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप
Bandhkam Kamgar Yojana 2023

इमारत आणि इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते.
त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दिनांक २७.१०.२०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला.
गृहपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे
गृहपयोगी संचातील वस्तूनगनग
1ताट042वाटया083पाण्याचे ग्लास044पातेले झाकणासह015मोठा चमचा016(भात वाटपाकरीता)017मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)018पाण्याचा जग (२ लीटर)019मसाला डब्बा (०७ भाग)0110डब्बा झाकणासह (१४ इंच)0111डब्बा झाकणासह (१६ इंच)0112डब्बा झाकणासह (१८ इंच)0113परात0114प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील)0115कढई (स्टील)0116स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह01एकूण29

■बांधकाम कामगार योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य
Bandhkam Kamgar Yojana Financial assistance

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) मंडळा मार्फत राबविण्यास आणि त्यासाठी रु. १,५०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्याबाबत दिनांक १४ जानेवारी,२०१९ च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)ह्या योजनेत लाभार्थ्याकडे जमिन असणे आवश्यक आहे.
सदर लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर तदनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येईल.
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे, असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी आणि घरबांधणीच्या अनुषंगीक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रति पूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा कडून रु.५०,०००/- पर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येईल.हे मंजर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल.

.

लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे
१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणी कृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एका वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
२. नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावेत . तशाप्रकारचे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
३. नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या / पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.
४. बांधकाम कामगारानी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा किंवा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणा पत्र/शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
5.अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्र्तेक कुटुंबासाठी आहे.
६. एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार परत या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
७. नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसायला पाहिजे .

आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ( (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी विहीत अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे
सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेली ओळखपत्राची प्रत
आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डाची प्रत.
सातबारा चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ग्रामपंचायती मधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
लाभधारकाचे स्वत:च्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची प्रत

ऊस उत्पादनाचे गणित काय आहे? लागवडीपासून कापणीपर्यंत काळजी घ्या आणि भरपूर पीक घ्या

दही खाण्याचे फायदे कोणते आहेत ?

अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा

कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका,  अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

 

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: