सोयाबीन:
सोयाबीनवर ‘पिवळा मोझॅक’ रोगाचे आक्रमण; ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका आहे.
सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो, या रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशीमुळे डाळ वर्गीय कडधान्ये पिके मुंग,उडीद, चवळी,मटकी, वाल ,सोयाबीन या पिकांवर होतो. ह्या रोगामुळे पिकाचे 70 ते 90% पर्यंत नुकसान होऊ शकते.
सोयाबीन पिवळा मोझॅक विषाणूची लागण कधी होते?
विषाणूजन्य रोग खूप झपाट्याने पसरतो पेरणी नंतर 25 व्या दिवशीच याची लक्षणे दिसायला लागतात.
पेरणी केल्यानंतर वीस दिवस पावसाचा खंड पडला व नंतर पाऊस पडला तर सोयाबीनचे पीक पिवळे दिसायला लागते, म्हणजे येलो मोझॅकची लक्षणे दिसायला लागतात.
सोयाबीन या पिकांवर पेरणी केल्यानंतर 20 दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाय करणे फायद्याचे ठरते.
सोयाबीन पिवळा मोझॅक वायरस लक्षणे –
1. अगोदर रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज, पिवळे ठिपके दिसतात.
2. कालांतराने ठिपक्यांच्या आकारमानात वाढ होऊन पूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे डॉट दिसतात.
3. रोगग्रस्त soybean yellow mosaic virus झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होऊन त्यांचा आकार छोटा होतो.
4. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात छोटे आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट होतात आणि पर्यायाने उत्पादनात खुप घट येते.
सोयाबीन पिवळा मोझॅक वायरस प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार –
1 ) Yellow mosaic virus in soybean हारोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.
2. सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडयाद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
3. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पिकांवर जिवंत राहून सोयाबीन पिकावर पसरतो.
4. या रोगास बळी पडणा-या जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस 335 हा वाण यारोगास बळी पडतो.
सोयाबीनवर एलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला तर कसा कराल प्रतिबंध?
: दरवर्षी मराठवाडा आणि विदर्भात खुप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाचे (soybean crop) उत्पादन घेतले जाते. मात्र, हे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना खुप मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी तर कधी पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सोयाबीनवर दुहेरी संकट आलं आहे. एकीकडं शंखी गोगलगायीमुळं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असतानाच आता दुसरीकडं सोयाबीन पिकावर एलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायी आणि एलो मोझॅक व्हायरसचे दुहेरी संकट आलं आहे. शंखी गोगलगायी आख्ख पीक खाऊन टाकत आहेत. तर दुसरीकडं एलोमोझॅक व्हायरसमुळं सोयाबीनचे पिकं पिवळे पडून पूर्णपणे जळून जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. नेमका हा घातक एलो मोझॅक व्हायरस आहेत तरी काय? त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय करायला हवेत? याबाबतची माहिती परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिली आहे.
एलो मोझॅक व्हायरस पांढरी माशी किडीमार्फत पसरला जातो.
आपल्याकडे सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. अगोदरच्या पावसाच्या कालावधीमध्ये सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पिवळेपणा दिसून आला. त्याला बरेच शेतकरी त्याला सोयाबीनचा एलो मोझॅक व्हायरस असल्याचे म्हटले. परंतू अति पावसामुळं सोयाबीन पिवळे पडले होते. मात्र, आता सोयाबीनवर पिवळेपणा पडत आहे, तो प्रकार हा एलो मोझॅक व्हायरसचा असल्याची माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिली. यामध्ये पानावर हिरवे पिवळे चट्टे दिसत आहेत. हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग रस शोशन करणाऱ्या पांढरी माशी किडीमार्फत पसरला जातो. यात साधा मोझॅक हा एक प्रकार आहे. यामध्ये पाने पिवळी पडत नाही तर पाने आखुड होतात. पाने हिरवीच राहतात, हा रोग मावा किडीमुळं प्रसारीत होतो.
एलो मोझॅक व्हायरसवर प्रतिबंध काय कराल?
एलो मोझॅक व्हायरस हा पांढरी माशी किडयामार्फत पसरला जातो. तर साधा मोझॅक हा मावा किडयामुळं प्रसारीत होतो. हे दोन्हीही रस शोसन करणारे किडे आहेत. एकदा हा रोग आला की त्याचे नियंत्रण आपण करु शकत नाही. त्यामुळं हारोग येऊ नये म्हणून, आपल्याला किडींचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात जर काही झाडांमध्ये एलोमोझॅक व्हायरस आढळला तर ती झाडे तत्काळ उपटून टाकावीत आणि नष्ट करावीत असे मत कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी व्यक्त केले. त्यानंतर केंद्रीय सोयाबीन संशोधन इंदौरच्या शिफारशीनुसार, थायामेथोक्सम (Thiamethoxam) 25 टक्के हे किटकनाशक जवळपास 40 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर या किडीचा बंदोबस्त होतो. या रोगापासून प्रसार होत नाही. त्यामुळं बी फवारणी करावी असं आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी केलं आहे.
एकात्मिक व्यवस्थापन yellow mosaic virus in soybean control सोयाबीन पिवळी पडली तर उपाय –
1. पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा.
2. सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूरही आंतरपिके घ्यावीत.
3. शेत तणमुक्त ठेवावे.
4. शेतात या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
5. पिवळा मोझॅक यारोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
6. एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
7. बीजप्रक्रिया – थायोमिथोक्साम 30 टक्के एफ.एस या किंटकनाशकाची 10 मिली + पाणी 10 ते 20 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावी.
8. पीक पेरणीनंतर 20 दिवसांनी जैपैक (थियामेथोक्सम + लैम्ब्डा साइहलोथ्रिन) 10 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
9. दुसरी फवारणी 35 दिवसांनी कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल) 10 मिली + आईएफसी नीम (10000 पीपीएम) 25 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव असल्यास धानुका ईएम 1 (एमेमेक्टिन बेंजोएट 5% एसजी) 10 ग्राम प्रति पंप मिसळावे.
10. सोयाबीन पिकात 60 दिवसानंतर चक्री भुंगा आढळतो. हा भुंगा खोडाच्या आत घुसून मुळापर्यंत खोड पोखरतो, वरील दोनवेळेस फवारणी जर वेळेवर केल्या तर चक्री भुंग्यावरही नियंत्रण मिळवता येते.
सोयाबीन पिवळा मोझॅक वायरस हा पांढरी माशीमुळे पसरणारा विषाणूजन्य रोग आहे.
सोयाबीन रोगाची लक्षणे
पेरणी पासून 20 दिवसांनी दिसू लागत. या रोगाच्या नियंत्रणासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण होणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिबंधात्मक नियोजन करताना एकरी दहा पिवळे चिकट सापळे लावावे.
सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. मोझॅक व्हायरस रोग कशामुळे होतो?
उत्तर – सोयाबीन पिकातील मोझॅक व्हायरस हा पांढरी माशीमुळे पसरणारा विषाणू जन्य रोग आहे.
2. मोझॅक व्हायरस रोगाचे लक्षणे काय आहेत?
उत्तर – रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडी वाकडी होऊन त्यांचा आकार छोटा होतो. पानावर पिवळे ठिपके तयार होतात. नंतर संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा नाश होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे डॉट दिसतात.
3. रोगाची लागण कधी होते?
उत्तर – पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोगाची लागण होते.
4. मोझॅक व्हायरस रोग कोणत्या पिकामध्ये उद्भवतो?
उत्तर – विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इ पिकांवर लागण होते.
5. रोगाची लागण होऊ नये म्हणून काय करावे?
उत्तर – पिवळे चिकट सापळे दहा प्रति एकरी लावावे आणि पहिल्या दोन फवारणी मध्ये निम तेला चा वापर करावा.
5 लाख विमा आयुष्यमान भारत कार्डमुळे होतो तुम्हालाही होतो का हा फायदा?
सार्वजनिक वितरण प्रणाली(Public Distribution System) पारदर्शक कशी बनवता येईल?
रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया
शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !
100% बहुगुणी पीक सोयाबीन,शेतकऱ्यांना करतो मालामाल