अक्कलकाढा
अक्कलकाढा म्हणजेच अक्कलकारा ही एक औषधी वनस्पती आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये या वनस्पतीच्या उपयांबाबत उल्लेख केला जातो.अक्कलकाढा ही एक बहुउपयोगी आयुर्वेदिक वनस्पती आहे.
याला इंग्लिश मध्ये tooth ache प्लांट पण म्हणतेत . अक्कलकाढा digestion साठी खूप महत्त्वाची वनस्पती आहे . याचे बोण्ड खाल्यावर आपल्या तोंडात saliva चा प्रमाण खूप वाढता व काही वेळा तर अक्षरशः 5 ते 10 मिनिट बोलता येत नाही . या कारना मुळे याने व्यक्ती ची पचनशक्ती चमत्कारिक रित्या सुधारते . अक्कलकाढा हे बुद्धि वर्धक असून सगळ्या नर्व्हस ला activate करतो .
अक्कलकाढा हवामान व जमीन-
ही वनस्पती समशीतोष्ण वातावरणामध्ये चांगली वाढते. पाण्याचा उत्तम निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हि वनस्पती चांगली वाढते. मध्यम व खोल जमीन या पिकासाठी चांगली असती.
अक्कलकाढा लागवड:
अक्कलकाढा लागवड खुप सोपी आहे. परिपक्व झालेला अक्कलकाढा जमिनीत चुरगाळाला तर त्यापासुन खुप सारी रोपे मिळतात. त्यानन्तर अशी रोपे उगवून सरिवर लावावी.बियापासून रोपे तयार करून लागवड करावी. नियमित हलकेच झारीने पाणी द्यावे. दहा दिवसानंतर बियाणाची उगवण दिसून येते. ५० – ६० दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात.
अक्कलकाढा खते-
भरपूर प्रमाणात शेणखत व सेंद्रिय खते द्यावीत. रासायनिक खतांचा उपयोग करू नये.
अक्कलकाढा काढणी-
अक्कलकाढा हे वार्षिक झुडुप आहे. फुले पक्व झाल्यावर पिवळसर व नंतर पांढर्या रंगाची होतात. अशा वेळेस फुलांची देठविरहीत तोडणी करून सावलीमध्ये सुकवावी.
फेब्रुवारी, मार्च मध्ये फुलांचा आकार लहान होण्यासाठी सुरुवात होते. तेव्हा पाणी देणे बंद करून झाडे सुकू द्यावी. अर्धवट सुकल्यावर पाणी देवून झाडे उपटून टाकावी व सुकवून फुलांची प्रतवारी करावी.
उत्पन्न- हेक्टरी 6 ते १० क्विंटल उत्पादन मिळतात. संपूर्ण झाडाची ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. सध्या फुलाचा दर ५०० – १००० रुपये किलो व पंचाग १५ ते ४० रु. किलो असे आहे. चूर्ण ८०० – १४०० रु. प्रतिकिलो जातो. लागवड मजुरीचा खर्च उत्पदंनांच्या ५० टक्के आहे.
लहान पोरांच्या तोत्र्या पणा वर हे खूप गुणकारी व सिद्ध औषध आहे वाढत्या वया मध्ये जर पोरांना हे रेग्युलरली दिला तर त्यांची बुद्धी ची क्षमता वाढते व त्याचा त्यांना भविष्यात खूप फायदा होतो। याला खाल्याने दंतरोगां मध्ये खूप फायदा होतो . बऱ्याच वेळी महिला वर्ग ला pregnancy मध्ये अक्कलदाढ खूप त्रास देते त्यावेळेस त्यांना गोळ्या खाता येत नाही, या स्तिथी मध्ये अक्कलकाढा खाऊन इन्स्टंट रिलीफ मिळते .
याचा वापर सर्दी खोकल्या वर पण आपण उपयोग करू शकतो .
दातांशी संबंधित आजारांवर अक्कलकाढा गुणकारी आहे. अक्कलकाढा ही वनस्पती शारीरिक शक्ती वाढवणारी व नपुंसकता दूर करणारी असल्याने दुर्गम भागातील काही आदिवासी याचा वापर करतात. अक्कलकराचे वनस्पतिक नाव हे स्पाईलेन्थस ओलेरेसिया असे आहे.
अक्कलकाढा आयुर्वेदिक फायदे:
वनस्पतीच्या काही घरगुती उपायांची माहिती व उपाय एक अक्कलकाढाची फुले, मुळांचा काढा घेतल्यास शारीरिक कमजोरी दूर होते. अक्कलकराचा काढा दररोज चार ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास नपुंसकता दूर होते.
अक्कलकाढा खाण्याने काय फायदा होतो?
1) 3 वर्षानन्तर बाळ बोलत नसेल तर करा हा उपायदररोज ४ ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास बाळ बोलते.
२ )अश्वगंधा, पुनर्नवा व अक्कलकरा समान मात्रेमध्ये घ्या. या मिश्रणाचे दिवसातून दोन वेळेस सेवन केल्यास शारीरिक कमजोरी दूर होण्यास मदत होते.
३)अक्कलकाढा व कापूर समान मात्रेत घेऊन मंजन तयार करा. या मंजनाने दात घासल्यावर दातदुखी दूर होते.
४ )मुल तोतरे, बोबडे बोलत असेल तर अक्कलकाढाच्या सुकलेल्या फुलांचे २५० मि. ग्रॅम. चूर्ण मधासोबत दिवसातून 2 वेळेस द्यावे.
५) अक्कलकाढाचे चूर्ण घेतल्यास अन्न चांगले पचन होते. पोटात गॅस होत नाहीत. ६ फिट्स येत असल्यास १०० ग्रॅम अक्कलकरा लिंबू सत्वामध्ये एकजीव करून या मिश्रणामध्ये १०० ग्रॅम मध मिसळावे. हे मिश्रण पाच ग्रॅम या प्रमाणात दररोज सकाळी घ्यावे.
६)अकरकाढा दातांसाठी फायदेशीर – दातांसाठी अकरकाचे फायदे त्याचा वापर दातांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. अकरकरा मुळाच्या चूर्णाने कापूर मिसळून दातांना मसाज केल्याने दातदुखी दूर होते. दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काळी मिरी, खुरासानी सेलेरी (हायसिमस नायजर) व एम्बेलिया राईब्स यांचे मिश्रण करूनही याचा वापर केला जाऊ शकतो.
७)अक्कलकाढाच्या मुळाचे चूर्ण काळी मिरी व पिंपळीसोबत घेतल्याने आराम मिळतो.अकरकरामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात, त्यामुळे फ्लूची लक्षणे कमी होण्यास तसेच अडवलेले नाक साफ होण्यास मदत होते.
८)आयुर्वेदात अपस्मार व फेफरे नियंत्रित करण्यासाठी अकरकरा रूटचा वापर केला जातो. काही अभ्यासांनुसार, त्याच्या मुळांच्या अर्कामध्ये संरक्षणात्मक गुणधर्म आहेत, म्हणून ते दौरे टाळण्यास मदत करू शकतात.
९)हवामानातील बदलामुळे अनेकांना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो, यासाठी अकरकरा ही अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. २ ग्रॅम अकरकरा व १ ग्रॅम सुंठ एकत्र करून त्याचा उष्टा तयार करा व १० ते २० मिली सकाळ संध्याकाळ घ्यावा, खोकला बरा होईल.
१०)ऑफिसमध्ये एकाच स्थितीत बसल्यामुळे बहुतेक लोकांना खोलीतील थकवा येतो. यासाठी अक्रोडाच्या तेलात अकरकरा रूट पावडर मिसळून कंबरेला नियमित मसाज करा. यामुळे पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल किंवा ज्यांना सायटीकाची समस्या आहे.
११)चुकीच्या दैनंदिन दिनचर्येमुळे अनेकांना सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अकरकरा औषधी वनस्पती अतिशय गुणकारी आहे. सांधेदुखी बरी होण्यासाठी अकरकरा मुळाची पेस्ट सांध्यांवर लावा व नंतर लावा. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळेल.
१२)अक्कलकाढा हे अर्धांगवायूच्या उपचारातही महत्त्वाचे औषध आहे. अकरकाची मुळं बारीक करून त्यात तिळाच्या तेलात मिसळून त्याची नियमित मालिश केल्यास अर्धांगवायूच्या रुग्णाला फायदा होतो. अक्कलकाढाच्या मुळाचे चूर्ण १ ग्रॅम मधासोबत सकाळ संध्याकाळ चाटल्याने अर्धांगवायूमध्ये आराम मिळतो.
अक्कलकाढा खाण्याचे नुकसान:
1)अक्कलकाढा जास्त प्रमाणात सेवन केल्याने लाळेचे प्रमाण वाढते.
जास्त सेवन केल्याने तोंडात व्रण होऊ शकतात (जेव्हा एकटे वापरतात). यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
2)छातीत जळजळ
3)पोटात गॅस
अक्कलकाढा वनस्पती:
अक्कलकाढा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला असे आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका आणि फिलिपीन्स या देशांत आढळते. बागेतही ही वनस्पती लावतात.
अक्कलकाढा वनस्पती साधारणपणे 20 – 50 सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी आणि देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर पासून डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी आणि मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.
फुलांना झोंबणारा वास असून त्यांची चव तिखट असल्यामुळे चघळल्यावर लाळ सुटते. जिभेच्या विकारावर ही फुले उपयुक्त आहेत. काही ठिकाणी स्त्रियांना प्रसूतीनंतर देतात. पुरळ उठून खाज सुटल्यास पाने अंगास चोळतात. तोंडास कोरड पडल्यास बिया चघळतात. अनेक देशांमध्ये आमांशावर औषध म्हणून ही वनस्पती पाण्यात उकळून देतात. रेचक म्हणून मुळाचा काढा देतात. पानांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) आहे. याच्या काढ्यामध्ये मुतखडा विरघळतो, असे मानतात. संधिवात आणि त्वचारोग बरा करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात. फुलांचा अर्क दाढदुखीवर उपाय म्हणून लावतात.
खरा अक्कलकाढा अल्जेरिया आणि अफ्रिकेतील छोटय़ा देशातून सर्वत्र निर्यात होतो.
अक्कलकाढा किड नियंत्रण:
१)जैविक कीडनाशकाचा वापर करणे
२)गांडूळ खताचा वापर करणे
३) शेणखताचा वापर मात्र चांगले कुजलेले .
४)जैविक खताचा वापर करणे
५)हिरवळीच्या खतांचा वापर वाढविणे
अळी व किडीच्या बंदोबस्तासाठी
६)पक्षी थांबे
७)पिकामध्ये सापळे लावणे
अक्कलकाढा तीन प्रकार पडतात
नरसापळा, चिकट सापळा, फळमाशी सापळा
यामधील आपण पक्षी थांबे यावर सविस्तर जाणून घेणार आहोत.
आपण अन्नसाखळी चा विचार करायला गेलो तर एक जीव दुसऱ्या जीवावर जगत असतो .त्याच नियमाचा प्रभावी वापर आपल्याला आपल्या पिकाच्या संरक्षणा साठी करायचा आहे. जेणेकरून आपल्या पिकातील अळी नियंत्रण असो अथवा किडी नियंत्रण असो त्यासाठी आवर्जुन पक्षी थांबे चा उपयोग आपल्या पिकामध्ये करायचा आहे.
अक्कलकाढा पावडर भाव:
Akkalakarra Powder (अक्कलकाढा पावडर)
10 g = 80 ₹
25 g = 200 ₹
50 g = 350 ₹
100 g = 650 ₹
250 g = 1400 ₹
500 g = 2750 ₹
1000 g = 5400 ₹
5 लाख विमा आयुष्यमान भारत कार्डमुळे होतो तुम्हालाही होतो का हा फायदा?
सार्वजनिक वितरण प्रणाली(Public Distribution System) पारदर्शक कशी बनवता येईल?
रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया
शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !