उत्पन्न आणि चारा यासाठी उन्हाळी बाजरी लागवड कशी करावी?

उन्हाळी बाजरी लागवड

उन्हाळ्यामध्ये बाजरी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवल्या जाते . त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे.खरीप हंगामातील बाजरी पिकापासून येणाऱ्या उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजरी लागवडीच्या माध्यमातून भरपूर उत्पादन मिळते
सध्या महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमूग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी हंगामात हे पीक घेण्याची प्रमुख कारणे खलीलप्रमाणे.

भुईमुगाच्या तुलनेत बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते.

उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर व गरजेनुसार पाणी तसेच कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त र्मिळते.

उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर जनावरांसाठी चार्‍याचा प्रश्न सोडविला जातो.

●बाजरी पिकाचे आहारातील महत्व

आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीमध्ये असणा-या पौष्ट्रेिक घटकांचा विचार करता 360 किलो कॅलरी प्रती 100 ग्रॅम धान्य एवढ़ी ऊर्जा देणारे एकमेव धान्य आहे. विकसनशील देशांमध्ये अन्न, चारा व इंधन पुरविणारे हे प्रमुख पीक आहे. बाजरी धान्यामध्ये प्रथिने १o.६g टक्के , पेिष्टमय पदार्थ ७१.६ %, स्निग्ध पदार्थ ५.0 टक्के व तंतुमय पदार्थ १.३ %असतात. खनिज पदार्थ : कॅल्शियम ३८.g मिलेिग्रॅम, पोटॅशियम ३७0 मिलिग्रंम, मॅग्रेशियम १o६ मिलिंग्रॅम, लोह ८ मिलिंग्रॅम आणि जस्त ५ मिलिग्रॅम प्रती १00 ग्रॅम धान्यामध्ये आढ्ळून येतात. त्याचप्रमाणे सल्फरयुक्त अमायनो अॅसिडस्र आढळतात. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी या धान्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.

●बाजरी भाकरी कडू लागू नये म्हणून काय करावे?

बाजरीचे धान्य वाळल्यानंतर लायपेज नावाच्या घटकामुळे पीठ कडू होते आणि दीर्घकाळ वापरण्याच्या अवस्थेत राहू शकत नाही. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर ग्राहकांना पीठपुरवठा करण्यास अडचणी येतात. त्यासाठी धान्य दळण्यापूर्वी ८० अंश सें.ग्रे. तापमानाला ८० सेकंद कालावधीसाठी उकळत्या पाण्यामधून काढून वाळविल्यानंतर दळल्यास पीठ वापरण्याचा कालावधी वाढविता येतो. या तंत्रज्ञानामुळे बाजरी पिठाचा पुरवठा ग्राहकांना करणे सोपे होईल.

●बाजरी पिकावरील प्रक्रिया / मालाची निर्मिती

बाजरी धान्याचा उपयोग भाकरी, ख्रिचर्डी, घाटा, नुडल्स, आंबील, लाह्या आणि इडली या विविध स्वरुपात करता येतो. शिवाय ५0 % गव्हाचे पीठ मिसळून बेिस्कोट्स बनवता येतात. त्याचप्रमाणे बाजरी धान्यापासून मद्यनिर्मिती होऊ शकते.

पशुधन व कुक्कुटपालनातील पशुखाद्य निर्मितीसाठी बाजरी वापरता येते. बाजरीच्या चार्‍यात विषारी पदार्थ नसल्यामुळे हिरवा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त ठरतो. बाजरी पिकाच्या चा-यात ८.७ % प्रथिनांचे प्रमाण असते.

●प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान

बाजरीचे धान्य दळल्यानंतर लायपेज नावाच्या घटकामुळे पीठ कडू होते आणि दीर्घकाळ वापरण्याच्या अवस्थेत राहू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्याना पीठपुरवठा करायला खूप अडचणी येतात. त्यासाठी बाजरी दळताना 80 अंश सें ग्रे तापमानाला उकळून बाजरी दळली तर पीठ कडू होत नाही.

●उन्हाळी बाजरी लागवड कधी करावी?

बाजरी पिकाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते. – पेरणीस उशीर झाल्यास पीक जात अथवा वाणाप्रमाणे 50-55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान 42 अंश से. पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात आणि उत्पादनात घट होण्याची शक्‍यता असते.
तत्वावर ग्राहकांना पीठ पुरवठा करण्यास अडचणी येतात. त्यासाठी धान्य दळण्यापूर्वी ८० अंश सें.ग्रे. तापमानाला ८o सेकंद कालावधीसाठी उकळत्या पाण्यातून काढून वाळविल्यानंतर दळल्यास पीठ वापरण्याचा कालावधी वाढविता येतो. या तंत्रज्ञानामुळे बाजरी पिठाचा पुरवठा ग्राहकांना करणे सोपे होईल.
अलीकडच्या काळात बेकरी पदार्थाचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केल्यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यासारखे आजार बळावलेले आढळतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, आहारात गव्हाचा सातत्याने वापर केल्यास उद्भवणा-या ग्लुटेन अॅलर्जीक परिस्थितीला टाळण्यासाठी आहारात बाजरीचा वापर करणे खूपच हिताचे ठरते.

●बाजरी पिकासाठी जमीन

उन्हाळी बाजरी लागवडीकरिता जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.

●पूर्वमशागत

लोखंडी नागराने जमेिनीचीं १५ सें.मी. खोल नागरट करावों. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे आणि काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कुळवणीच्या आधी हेक्टरी १२ ते १५ बैलगाड्या शेणखत अथवा कंपोट खत पसरवून टाकावे, म्हणजे ते जमिनीत सम प्रमाणात मिसळले जाते.

●हवामान

बाजरी या पिकास उष्ण आणि कोरडे हवामान (१0 ते ४५ अंश सें.ग्रे.) मानवते तसेच हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.उन्हाळी हंगामामध्ये पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळुवार होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा १o – १५ दिवसांनी उशिरा काढणीस येते.

●पेरणीची वेळ

उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या तारखेपर्यत करावी, कारण जानेवारी महिन्यात तापमान १0 अंश सें.ग्रे. पेक्षा खाली गेलेले असल्यास त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. या परिस्थितीत पेरणी ही थंडी कमी झाल्यावर करावी. मात्र उन्हाळी बाजरीची लागवड १५ फेब्रुवारी नंतर करू नाही , कारण पीक पुढील उष्ण हवामानात सापडण्याची शक्यता असल्याने कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते.त्यामुळे उत्पादनात घट येते.

●संकरित व सुधारित वाण

प्रोअॅग्रो ९४४४ आणि ८६एम ६४ या संकरित वाणांची लागवड करावी. कारण हे वाण जास्त उत्पादन (धान्य व चारा) देणारे असून केवडा रोगास प्रतिकारक्षम आहेत. तर सुधारित वाणामध्ये धनशक्ती (आय.सी.टी.पी८२o३, लोह १o-२) आणि आय.सी.एम.व्ही. २२१ या वाणाची लागवड करावी.
पेरणीसाठी वाण श्रद्धा, सबुरी, जी.एच.बी-५५८, ए.एच.बी-१६६६, ए.आय.एम.पी-९२९०१ (समृद्धी), शांती खत व्यवस्थापन हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी नत्राची अर्धी मात्रा व संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी द्यावे.
हेक्टरी ४ ते ५ किलो बियाणे पेरणीसाठी पुरेसे आहे.

जमीन ओलावून वाफसा आल्यानंतर दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. दोन ओळींत ४५ सेंमी व दोन झाडांत १०-१२ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणी २ ते ३ सेंमीपेक्षा जास्त खोलीवर करू नये.

●पाणी व्यवस्थापन

उन्हाळी हंगामात बाजरी पिकास एकूण ३५ ते ४० सें.मी. पाण्याची गरज असते. पेरणीनंतर पिकास 4 दिवशी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार १० – १२ दिवसांच्या अंतराने ५ – ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेमध्येच पाणी द्यावे. पेरणीनंतर पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी, दुसरे पाणी पीक पोटरीत असताना व तिसरे पाणी दाणे भरण्याच्या वेळी द्यावे.

●पीक संरक्षण

उन्हाळी हंगामात कोड आणि रोगाचा अत्यल्प प्रादुर्भाव आढळून येतो.

●रोग

गोसावी (केवडा) : या रोगाचा प्रादुर्भाव उगवण्यापासून ते दाणे भरेपर्यंत दिसून येतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोप लहान असताना पाने पिवळी पडून त्याच्या खालच्या बाजूस पांढरी बुरशीची वाढ होते. त्यामुळे रोपे मरून जातात अथवा त्यावर चट्टे पडून पान तपकिरी बनते. अशा झाडांची वाखुटते व अनेक फुटवे फुटतात. कणसातील फुलाचे रूपांतर पर्णपत्रात होऊन कणसात दाणे भरत नाही. कणीस बुवाच्या विस्कटलेल्या केसासारखे दिसते. या रोगाचे बिजाणू झाडाच्या रोगट भागात जमिनीत ३ – ५ वर्ष राहू शकतात. असा हा एक भयंकर रोग आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणापुर्वी बियाण्यास ६ गॅम मेटॅलॅक्झिल MZ ७२ हे बुरशीनाशक प्रती किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी; रोगट झाडे गोळा करून जाळून टाकावी. पेरणीनंतर २० दिवसांनी पिकावर ०.४ टक्के मेटॅलॅक्झिल एम झेड ७२ पाण्यात मिसळून फवारणी/ फवारण्या कराव्यात. तसेच उपलब्ध रोगप्रतिबंधक वाणांची पेरणी करावी.

●लागवडीचे अंतर

उन्हाळी बाजरी करताना दोन ओळींतील अंतर 30 ते 40 सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सेंटी मीटर ठेवावे. नंतर गरजेप्रमाणे खुरपणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.

●उत्पादन

उन्हाळी बाजरीचे पीक ओलिताखाली असल्यामुळे तसेच हवामान कोरडे असल्यामुळे धान्याचे हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल.उत्पन्न आणि चाऱ्याचे ७ ते ८ टन उत्पादन मिळते.

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?

कडबा कुटी मशीन अनुदान योजना 2024

अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा

कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका,  अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: