बाजरी (millets)
बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्या बरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापना मध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य होईल .
बाजरी हे भरड धान्य आहे. याची लागवड प्रामुख्याने राजस्थान-हरियाणा- उत्तर प्रदेश- गुजरात आणि मध्य प्रदेशात केली जाते. याचा वापर भाकरी, खिचडी आणि इतर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय जनावरांच्या चाऱ्यासाठीही याचा उपयोग होतो. परदेशात बाजरीची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल या लागवडीकडे वाढत आहे.
बाजरीच्या सुधारित आणि संकरित वाणांची जमिनीच्या मगदुराप्रमाणे, नैसर्गिक हवामान व पाऊस यांचा एकत्रित विचार करुन निवड करावी. हलक्या जमिनीमध्ये व कमी आणि अनियमित पावसाच्या क्षेत्रात सुधारित वाणांची लागवड करावी. मध्यम जमिनीत आणि समाधानकारक पर्जन्यमान विभागात संकरित वाण भरपूर उत्पादन देऊ शकतात.
बाजरी पिकांचे महत्त्व
पाऊस उशिरा, अनिश्चित व कमी प्रमाणात झाला तरी देखील इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे.
आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे.
हे कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात.
सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्र कृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो.
बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्यक कोलेस्टेरॉलचे (LDL) प्रमाण हे मक्यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते.
पेरणीसाठी हेक्टरी ३ – ४ किलो चांगले निरोगी बियाणे वापरावे. अरगट व गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे. अ) २0 %मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी) बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० % मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १o लिटर पाण्यात दोन किलो मिठ विरघळावे.
पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा आणि तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करुन पाण्याने २ ते ३ ब) मेटॅलॅक्झील ३५ एसडी याची बीजप्रक्रिया (गोसावी रोगासाठी) पेरणीपूर्वी बियाण्यास ६ गॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी प्रत्येक किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी. क) अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया पंचवीस ग्रॅम अझोस्पिरीलम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० – २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच स्फुरदमध्ये विरघळविणा-या जिवाणूची २५ गॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
बाजरी सुधारित वाण कोणते?
बाजरी पिकापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हवामानानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना वाणांची माहिती असली पाहिजे, कोणते वाण कोणत्या क्षेत्रासाठी चांगले आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
अ) संकरित वाण
१. शांती
८० ते ८५ सरासरी ३० मध्यम उंची, टपोरे व राखी रंगाचे, भाकरी चवीला चांगली आणि गोसावी रोगास प्रतिकारक्षम
२. आदिशक्ती
८० ते ८५ सरासरी ३० – ३२ मध्यम कालावधी, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, घट्ट कणीस, ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे दाणे, बिजोत्पोदकासाठी फायदेशीर.
ब) सुधारित वाण
१ धनशक्ती
७४ ते ७८ सरासरी १९ ते २२ कणीस घट्ट, दाणे टपोरे व राखी रंगाचे, लोहाचे प्रमाण अधिक, गोसावी रोगास प्रतिकारक्षम
संकरित बाजरीच्या ‘श्रद्धा’ बी के ५६०. एमएच १४३, एमएच १६९, एमएच १७९ या जाती आहेत. सुधारित वाणात डब्ल्यूसीसी ७५, आयसीटीपी ८२०३, आयसीएमव्ही ८७९०१, आरएचएर १ इत्यादींचा समावेश होतो.
एम एच 169 (पूसा-23)
या जातीतील झाडे 165 सेमी उंच आणि पाने चमकदार असतात.
या जातीला घट्ट पट्टी असते आणि परागकण पिवळ्या रंगाचे असते.
ही जात ८० ते ८५ दिवसात पक्व होते.
ही जात 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य देते.
ही जात महारोग प्रतिरोधक असून मध्यम दुष्काळ सहन करण्याची क्षमता असणारी आहे.
आर एच बी 121
बाजरीच्या या जातीच्या वनस्पतींची उंची 165 ते 175 सें.मी.
ही जात महारोग प्रतिरोधक असून मध्यम दुष्काळ सहन करण्याची क्षमता असणारी आहे.
ही जात ७५ ते ७८ दिवसांत पक्व होते.
या जातीचे सरासरी उत्पादन 22 ते 25 क्विंटल आणि चारा उत्पादन 26 ते 29 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
एच एच बी 67-2
ही जात 62 ते 65 दिवसांत परिपक्व होते.
या जातीच्या वनस्पतींची उंची १६० ते १८० सें.मी.
या जातीचे बाजऱ्याचे सिटे कडक, केसाळ आणि 22 ते 25 सेमी लांब आणि पिवळ्या रंगाचे असतात.
ही जात महारोग प्रतिरोधक असून मध्यम दुष्काळ सहन करण्याची क्षमता असणारी आहे.
एचएचबी 67 च्या तुलनेत या जातीमध्ये चारा आणि चाऱ्याचे सरासरी उत्पादन 22 ते 25 टक्के जास्त आहे.
एएचबी 1200 :
हा संकरीत वाणांपैकी एक आहे.
ही जात खरीप हंगामात लागवडीसाठी योग्य आहे.
या जातीमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.
हरियाणा, राजस्थान, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथे प्रामुख्याने त्याची लागवड केली जाते.
या जातीची लागवड केल्यावर एकरी २८ क्विंटल कोरडा चारा मिळतो.
ही जात ७५ ते ७८ दिवसांत पक्व होते.
एम बी एच 151
या जातीमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याची क्षमता सामान्य बाजरीपेक्षा जास्त असते.
त्यामुळे त्याचे सेवन हृदयरोग्यांसाठी चांगले असते.
या जातीचे सरासरी उत्पादन 50 क्विंटल आणि कोरड्या चाऱ्याचे सरासरी उत्पादन 90 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
याशिवाय आपल्या देशात बाजरीच्या इतरही अनेक जातींची लागवड केली जाते. ज्यामध्ये जी.एच.बी 719, आर.एस.बी 177, एम.पी.एम.एच 21, बी.डी- 111, बी.जे- 104, एच.बी 2, एच.बी 3, एम.बी.एच 15 इत्यादी जातींचा समावेश आहे.
बाजरी (millets) पेरणीची पद्धत
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी व 2 ओळीत ४५ सें.मी. आणि दोन रोपामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवावे (हेक्टरी सुमारे १.५० लाख प्रोपे). पेरणी ३ ते ४ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करु नये.
बाजरी(millets) सुधारित वाण
अ. क्र. वाणाचे नाव पिकाचा कालावधी उत्पादनक्षमता (क्विंटल / हे) आणि वाणांची वैशिष्ट्ये
अ) संकरित वाण
१ शांती
८० – ८५ सरासरी ३० मध्यम उंची, टपोरे व राखी रंगाचे, भाकरी चवीला चांगली आणि गोसावी रोगास प्रतिकारक्षम
२ आदिशक्ती
८० – ८५ सरासरी ३० – ३२ मध्यम कालावधी, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, घट्ट कणीस, ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे दाणे, बिजोत्पोदकासाठी फायदेशीर.
ब) सुधारित वाण
१ धनशक्ती
७४ ते ७८ सरासरी १९ – २२ कणीस घट्ट, दाणे टपोरे व राखी रंगाचे, लोहाचे प्रमाण अधिक, गोसावी रोगास प्रतिकारक्षम
संकरित बाजरीच्या ‘श्रद्धा’ बी के ५६०. एमएच १४३, एमएच १६९, एमएच १७९ ह्या जाती आहेत. सुधारित वाणात डब्ल्यूसीसी ७५, आयसीटीपी ८२०३, आयसीएमव्ही ८७९०१, आरएचएर १ इत्यादींचा समावेश देखील होतो.
बाजरी (millets) भरघोस पिक घेण्यासाठी ही पद्धत वापरा
बाजरी पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने ते कोरडवाहु जमिनीतही चांगले येते.
बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी व मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ७.७ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी – वरंबा पद्धत फायदेशीर ठरू शकते . पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब पिकासाठी योग्य त-हेने उपयोग करुन घेण्यासाठी कमी आणि अनियमित पाऊस पडणा-या प्रदेशात अतिशय हलक्या व हलक्या ते मध्यम उताराच्या जमिनीवर अथवा समपातळीवर नसलेल्या जमिनीवर बाजरीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सरी-वरंबा पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.
बाजरी (millets) खत
अ) सेंद्रिय खते : ५ टन शेणखत / हे. अथवा ३.५ टन उसाची मळी किंवा २.५ टन गांडुळ खत द्यावे.
ब) रासायनिक खते : ५० : २५ : २५ नत्र, स्फुरद आणि पालाश कि. / हे. द्यावीत.
क) जीवाणू खते :
१. अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅ.एक किलो बियाण्यासाठी.
२. स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५ ग्रॅम 1 किलो बियाण्यासाठी.
खते देण्याची वेळ
• सेंद्रिय खते – पंधरा दिवस पेरणी आगोदर द्यावीत.
• रासायनिक खते – ५० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उर्वरीत ५०% नत्र एक महिन्याने द्यावे.
• जीवाणू खते – पेरणीच्या वेळी बियाण्यास लावावी.
रासायनिक खताचा वापर
माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत. मध्यम जमिनीसाठी हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश व हलक्या जमिनीसाठी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश खतांचा अवलंब करावा. पेरणीच्यावेळी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. तदनंतर २५ ते ३o दिवसांनी जमिनीत ओलावा असताना अथवा पाऊस पडल्यानंतर अर्धे नत्र द्यावे.
बाजरी पिक पाणी व्यवस्थापन
बाजरी हे कोरडवाहूचे पीक आहे. खरीप बाजरी पिकास २५ ते ३० सें.मी. इतकी पाण्याची गरज असते. परंतु पाण्याचा ताण पडल्यास आणि पाणी उपलब्ध असल्यास खालील संवेधनक्षसंवेधनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० – २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ -४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरते वेळी (पेरणीनंतर ६० – ६५ दिवसांनी) द्यावे.
हवामान
400 ते 500 मी.मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतले जाते .
उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले असते .
पिकाची उगवण व वाढ 23 – 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते.
पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
जमीन व पूर्वमशागत
अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम किंवा भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू pH 6.5 – 7.5 च्या दरम्यान असावा.
चांगल्या उगवणीसाठी शेत भुसभुशीत, ढेकळे विरहित व दाबून घट्ट केलेली असावी. यासाठी अर्धा फूट खोल नांगरट करून 2 ते ३ वखराच्या पाळ्या देऊन शेवटच्या वखरणीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी म्हणजे पेरणीनंतरच्या जोरदार पावसामुळे बी टोचून उगवणीवर विपरीत परिणाम होणार नाही.
बियाणे व बीजप्रक्रिया
भरघोस उत्पादनासाठी स्थानिक वाणाऐवजी बाजरीचे सुधारित किंवा संकरित वाणांचे बियाणे हेक्टरी 3 – 3.5 किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरावे. अरगट व गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे. बियाणे पेरणीपूर्वी 20 टक्के मिठाच्या द्रावणात (10 लिटर पाणी + 2 किलो मीठ) टाकावे. त्यावर तरंगणाऱ्या बुरशी पेशी व हलके बी काढून त्याचा नाश करावा, राहिलेले बी स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. या सर्व प्रक्रियेनंतर ऍझोस्पिरिलम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक 20 ते 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात (250 ग्रॅम गूळ + 1 लिटर पाणी) एकत्र करून बियाण्यास चोळावे व सावलीत सुकवून 4 ते 5 तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.
पेरणी
पावसाळा सुरू झाल्यानंतर 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यास पेरणी करावी. खरीप बाजरीची पेरणी 15 जून पासून 15 जुलै या कालावधीत जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींत 45 सें.मी. तर दोन रोपांत 12 ते 15 सें.मी. अंतर राहील अशा बेताने करावी. पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या तिफणीने करावी म्हणजे रासायनिक खते बियाण्यासोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढून चांगले उत्पादन मिळते. बाजरीची पेरणी दोन ते तीन सें.मी. पेक्षा जास्त खोल करू नये. अन्यथा, यापेक्षा जास्त खोलीवर केल्यास उगवण कमी प्रमाणात होते. यासाठी पाभरीच्या फणास टोकाकडे कापडाची चुंबळ बांधावी म्हणजे तिफणीचे फण जमिनीत जास्त खोल जाणार नाहीत व बियाणे अपेक्षित खोलीवर पेरले जाईल.
खत व्यवस्थापन
अधिक उत्पादनासाठी 10 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास पिकास कॅल्शिअम व सल्फर अशी अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात. (माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत.)
आंतरमशागत
पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे तोडे भरण्यास वापरता येतात. 30 ते 40 दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना शेतात चांगली ओल असणे गरजेचे आहे.
हंगाम – मध्यान्ह – उपाययोजना
चांगल्या उगवणी नंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करतावेळी डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो.
पाणी व्यवस्थापन
पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना शेतात पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. ह्या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे.
आंतरपीक
अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2:1 (बाजरीः तूर) किंवा 4:2 ठेवावे. याचप्रमाणे बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4:2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात. हलक्या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2:1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा.
तणनाशकाचा वापर
गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्वी (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 – 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 – 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्चात तणनाशक हेक्टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा.
बाजरी (millets) पिकासाठी तणनाशक
जरी प्रोसो बाजरी हे नेब्रास्का पॅनहँडल आणि ईशान्य कोलोरॅडोमधील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक असले तरी राष्ट्रीय स्तरावर याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. खरं तर, प्रोसो बाजरीमध्ये वापरण्यासाठी फक्त चार तणनाशकांना लेबल केले आहे: 2,4 डी अमाइन, Aim™, Clarity™ आणि Peak™ .
प्रत्येकाने नियमित आहारात समाविष्ट केलेल्या 5 बाजरी (millets) प्रकार काय आहेत ?
1) फिंगर बाजरी:
फिंगर ज्वारी अथवा नाचणी ही जगभरात सर्वाधिक खपलेली बाजरी आहे. ग्लूटेन-मुक्त बाजरी हा गहू आणि तांदूळसाठी आरोग्यदायी पर्याय आहे. भरपूर लोह आणि इतर खनिज घटकांसह, नाचणी ही फिटनेस लोकांची आवडती बाजरी आहे.
2) ज्वारीची बाजरी
ज्वारीची बाजरी बहुतेक भारतात ज्वारी म्हणून ओळखली जाते, आणि महाराष्ट्र व कर्नाटक सारखी राज्ये तिचे सर्वाधिक उत्पादक आहेत. चवीला किंचित गोड, ज्वारी बाजरी लोह, प्रथिने व फायबरचा चांगला स्रोत आहे.
3) मोती बाजरी
मोती बाजरी, ज्याला बाजरी देखील म्हणतात, पराठा, खिचडी आणि इतरांसारखे विविध पारंपारिक पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी बाजरी ही खूप परिचित आहे. मोती बाजरीमध्ये फायबर, लोह, प्रथिने, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात.
4. फ़ॉक्सटेल बाजरी
भारतातील फॉक्सटेल बाजरी अथवा कांगी हे अर्ध-शुष्क प्रदेशात घेतले जाते आणि हंगाम खूपच लहान असतो.
5)बकव्हीट बाजरी
बकव्हीट, प्रामुख्याने भारतात कुट्टू म्हणून ओळखले जाते, जे नवरात्रीच्या उपवासात वापरले जाते. ही मधुमेहासाठी अनुकूल बाजरी रक्तदाब पातळी राखण्यासाठी देखील प्रभावित करते. हे जादुई बाजरीचे पीक हृदयाच्या आरोग्याकरिता वरदान आहे आणि नियमित सेवनाने अतिरिक्त वजन ही कमी करू शकते. बकव्हीट बाजरीमध्ये कर्करोगविरोधी वैशिष्ट्ये देखील आहेत.
बाजरी उष्ण आहे की थंड
बाजरी प्रकृतीने उष्ण, पचायला हलकी, चवीला रुचकर आणि पौष्टिक असते. यात कर्बोदके, प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असते.
बाजरी(millets) खाण्याचे फायदे
हृदय निरोगी राहण्यासाठीMillet Bhakri For Healthy Heart: बाजरीच्या भाकरीमध्ये अनेक पोषक तत्व असून अत्यंत फायदेशीर मानली जाते. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते, जे शरीरासाठी आपल्या हृदयालासुद्धा निरोगी राहण्यासाठी मदत करते आणि अधिक चांगले ठरते.
बाजरी (millets) भाकरी खाण्याचे फायदे
बाजरी रब्बी पिक आहे. बाजरी ही डायबिटीससाठी उपयोगी मानली जाते. बाजरीत असणारे पोषक तत्व हे मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी वरदान ठरते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करून घ्यायला पाहिजे .
बाजरी भाकरी (Bajrichi Bhakri) For PCOD:
ज्या महिलांना PCOD ची समस्या आहे त्या महिलांसाठी बाजरीची भाकरी नक्कीच वरदान ठरते. मासिक पाळीच्या दिवसात किंवा नियमित बाजरीचे सेवन केल्यामुळे पोटातील दुखणे कमी होते. याशिवाय बाजरीचा फायदा PCOD ची समस्या कमी करण्यासाठीही होतो. यामधील विटामिन शरीराला उर्जा देऊन नसांची प्रक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते.
FAQ:
1)बाजरी कधी खावी?
उत्तर-हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी खातो त्यामुळे हिवाळ्यात बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी व तिळाचे कूट असा आहार घेतो. बाजरी प्रकृतीने उष्ण, पचायला हलकी, चवीला रुचकर व पौष्टिक आहे . यात कर्बोदके, प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असते.
2)बाजरीचे किती प्रकार आहेत ?
उत्तर-भारतात मोती बाजरी, ज्वारी, फिंगर बाजरी, फॉक्सटेल, कोडो, बार्नयार्ड, प्रोसो, लिटिल बाजरी आणि छद्म बाजरी यांसारख्या अनेक जातींचे उत्पादन केले जाते जसे की बकव्हीट आणि राजगिरा
3)बाजरीचे पीठ ग्लूटेन मुक्त आहे का?
उत्तर-बाजरी हे नैसर्गिकरित्या ग्लुटेन-मुक्त धान्य आहे जे संपूर्ण बियाणे म्हणून वापरले जाऊ शकते.
4)बाजरी कशी वाढते?
उत्तर-बाजरी उष्ण हवामानात उत्तम वाढते, परंतु दमट हवामानात आवश्यक नसते आणि त्यासाठी पूर्ण सूर्य आणि ओलसर, तटस्थ माती आवश्यक असते.
5)बाजरीच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती आवश्यक आहे बाजरी म्हणजे काय?
उत्तर-वालुकामय व मऊ रंगाची गोराडू माती बाजरीसाठी योग्य आहे.
FAQ
5 लाख विमा आयुष्यमान भारत कार्डमुळे होतो तुम्हालाही होतो का हा फायदा?
सार्वजनिक वितरण प्रणाली(Public Distribution System) पारदर्शक कशी बनवता येईल?
रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया
शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !
100% बहुगुणी पीक सोयाबीन,शेतकऱ्यांना करतो मालामाल