सोयाबीन पिक
आपण सोयाबीन पिकवतो; पण हे पीक किती गुणकारी आहे व त्यापासून किती प्रकारच्या पदार्थांची निर्मिती होते, याची आपणाला माहिती नाही… त्या पार्श्वभूमीवर, जगभरातील सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग व भारतासाठी असलेल्या संधींबाबतची आपण आज माहिती घेणार आहोत…
सोयाबीन हे तेलबिया वर्गीय धान्यपीक असून, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, आरोग्यास हितकारक असलेले फायटो केमिकल्स यांचा प्रमुख स्रोत म्हणून त्याच्या कडे पाहिले जाते. सोयाबीन हे पर्यावरणपूरक पीक असून, हवेतील नत्रयुक्त पदार्थ स्थिर करण्यास त्याची मदत होते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य किंवा जमिनीची बहुतेक रासायनिक व जैविक सुपीकता राखण्यास मदत होते. जगामध्ये सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होण्याची कारणे म्हणजे सोयाबीनमधील पोषक अन्नघटक, आरोग्यदायी व औषधी गुणधर्म व त्याचा औद्योगिक कारणांसाठी वाढता वापर.
आपल्या देशात सोयाबीनचा वापर मुख्यत्वेकरून खाद्यतेल निर्मितीसाठी केला जातो. यातून उत्पदित होणाऱ्या सोयामिलपैकी 65 – 70 टक्के सोयामिल निर्यात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांनी दुग्धजन्य व मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणून सोया आधारित एकशे तीस पदार्थ जगाच्या बाजारपेठेत आणलेले आहेत. सोयबिनयुक्त आणि सोयाबिन आधारित पदार्थांच्या माध्यमातून हजारो कोटींची बाजारपेठ वरील कंपन्यांनी काबीज केलेली आहे. सोयाबिन आधारित पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड वाव आहे. प्रथिनयुक्त सोया प्रोटिन्स सोयामिलच्या दहापट जास्त किंमत देऊन आपण आयात करतो किंवा सोयामिलपासून सोया प्रोटिन्स करण्यास भरपूर वाव आहे.
अमेरिका, युरोप, चीन, रशिया आणि बाल्टीक देश इत्यादी ठिकाणी सोयाबीन युक्त पदार्थांचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात होत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ यांस पर्याय म्हणून सोयबिनयुक्त पदार्थांचा वापर केला जात आहे. दूध पवाडरचा वापर अनेक दुग्धजन्य पदार्थांत तसेच प्रथिनांचा स्रोत म्हणून वापर केला जातो. अलीकडच्या काळात जागतिक बाजारपेठेत दूध भुकटी महाग झाल्याने त्याची जागा सोया प्रोटिनने घेतलेली आहे.
अशी करा सोयाबीन पीकाची लागवड:
सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत ७५ – १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करुनच करावी. पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन बियाणे सावलीमध्ये वाळवून घेऊन योग्य वेळी पेरणी करावी.
सोयाबीन पीकाची उत्पादनक्षमता कशी वाढवावी? उगवणशक्ती कमी होण्याची कारणे
1)सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर साठवणूककेलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.
2)कडक उन्हात बियाणे वाळवून ते साठवल्यास उगवणशक्ती कमी होते.
3) मळणीयंत्राची गती ४००. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो आणि त्याचा परिणाम सोयाबीन उगवण शक्तीवर होतो.
4)साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी.
सोयाबीन च्या सुधारित जाती कोणत्या?
जे.एस. ३३५, फुले आग्रणी, फुले कल्याणी, एम.ए.सी.एस. ११८८, जे.एस. ९३-०५, के.एस.एल. ४४१, एम.ए.यु.एस ७१, एम.ए.यु.एस. ८१.
सोयाबीन खाण्याचे फायदे कोणते?
सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे; कर्करोगाचा धोका कमी होतो आणि वजनही राहते नियंत्रणात
सोयाबीनला शाकाहारी मांस असेही म्हणतात. हे त्याच्या उत्कृष्ट चव व पोत साठी जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. सोयाबीन हे पौष्टिकतेचे पॉवरहाऊस आहे व वनस्पती प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रथिने व इतर जीवनसत्त्वे यांचा हा सर्वोत्तम स्रोत आहे.
या एक प्रकारच्या शेंगा आहे ज्याची लागवड आशियाच्या पूर्वेकडील भागात सुरूवातीला केली गेली. या शेंगा आशियाई आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत व हजारो वर्षांपासून वापरल्या जात आहेत. सोयाबीनची सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे ते बहुमुखी आहेत. याचा अर्थ तुम्ही ते तुमच्या आहारात अनेक प्रकारे वापरू शकता, जसे की सोया पीठ, सोया प्रोटीन, टोफू, सोया दूध किंवा सोया सॉस.
सोयाबीन आजचे भाव/ दर
बाजार समिती जात/प्रत सर्वसाधारण दर
राहूरी-वांबोरी— हायब्रीड 4275
तुळजापूर— 4450
राहता— 4350
पिंपळगाव(ब) हायब्रीड 4475
– पालखेड
सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख
स्पोडोप्टेरा लिट्युरा
किडीची ओळख
2) हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा
3) उंट अळी
4) पाने पोखरणारी अळी
5) चक्री भुंगा
6) खोड माशी
सोयाबीन हे खरिफ हंगामधील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रामध्ये सोयबीनची लागवड मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागवडी खालील क्षेत्र कमी आहे. सोयाबीन पिकाची लागवड करताना बियाणे, पेरणीमधील अंतर, खत – पाणी आणि कीड – रोग व्यवस्थापन या घटका व्यतिरिक्त तण व्यवस्थापन soybean tan nashak हा महत्वाचा मुद्दा आहे. तण व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यास मुख्य पिकामध्ये व तनामध्ये हवा, अन्नद्रव्ये,सूर्यप्रकाश, जागा इ. मध्ये प्रतिस्पर्धा तयार होते परिणामी उत्पादनामध्ये घट येते म्हणूनच योग्य वेळी योग्य पद्धतीने तण नियंत्रण soybean herbicide करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात सोयाबीन तन नाशक बद्दल माहिती best herbicide for soybean.
सोयाबीन पिकामध्ये दोन पद्धतीने तण नियंत्रण करता येते. । सोयाबीन तन नाशक औषध
अ. उगवणीपूर्व सोयाबीन तन नाशक
ब. उगवणींनंतर सोयाबीन तन नाशक
अ. उगवणीपूर्व तणनाशक । pre emergence herbicide for soybean –
उगवणीपूर्वचे तणनाशक हे पेरणीनंतर ४८ तासाच्या आता फवारणी करणे गरजेचे आहे. तणनाशक फवारणी करताना बियाणे हे मातीमध्ये झाकलेले असावे तसेच जमीन ओलसर असावी.
1. पेंडिमेथालिन 38.7% CS
व्यापारी नाव – दोस्त सुपर (यु.पी.एल.), धनुटोप सुपर (धानुका)
प्रमाण – 700 मिली प्रति एकरी
कधी वापरावे – पेरणीनंतर 48 तासाच्या आता
2. डायक्लोसुलाम 84% WDG
व्यापारी नाव – स्ट्रॉंग आर्म (कोर्टेवा एग्रीसाइंस)
प्रमाण – 12.4 ग्राम प्रति एकरी
कधी वापरावे – पेरणीनंतर 48 तासाच्या आता
3. पेंडीमेथिलिन 30% + इमाझेथापीर 2% EC
व्यापारी नाव – वेलर 32 (सिजेंटा)
प्रमाण – 1 लिटर प्रति एकर
कधी वापरावे – पेरणी नंतर लगेच अथवा 72 तासाच्या आत.
4. सुलफेंट्रझोन 28 % + क्लोमेझॉन 30 % WP
व्यापारी नाव – ऑथॉरिटी नेक्स्ट (FMC)
प्रमाण – 500 ग्राम प्रति एकर
कधी वापरावे – पेरणीनंतर लगेचच किंवा पेरणीनंतर 48 तासाच्या आत.
ब. उगवणींनंतर तणनाशक –
उगवणींनंतरचे तणनाशक हे तण 3 – 4 पानाचे असताना म्हणजेच पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी .
1. प्रोपॅक्वीझ्याफोप 10% EC
व्यापारी नाव – अजिल (आदामा)
प्रमाण – 300 मिली प्रति एकरी
कधी वापरावे – तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना.
2. फ्लूझीफोप पी बूटील
व्यापारी नाव – फूजीफ्लेक्स (सिजेंटा)
प्रमाण – 400 मिली प्रति एकरी
कधी वापरावे – तण 3 ते 4 पानांचे असताना.
3. इमेजेथापायर 35% + इमाज़मॉक्स 35% डब्ल्यूजी
व्यापारी नाव – ओडिसी (बी ए एस एफ)
प्रमाण – 40 ग्राम प्रति एकरी
कधी वापरावे – तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना.
4. प्रोपॅक्यूझाफॉप 2.5 % + इमेझाथापर 3.75 % E.C.
व्यापारी नाव – शाकेड (आदामा)
प्रमाण – 800 मिली प्रति एकरी
कधी वापरावे – तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना.
5. इमेझाथापर 10 % SL
व्यापारी नाव – परसूट (बी ए एस एफ)
प्रमाण – 400 मिली प्रति एकरी
कधी वापरावे – तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना.
■ भारतात सोयाबीनचे भाव का कमी होतात
गेल्या एका वर्षात भारतात आयात केलेल्या कच्च्या सूर्यफूल व सोयाबीन तेलाच्या किमती ४६-५७% नी घसरल्या आहेत.
सोयाबीन भाव वाढणार का?
होय,नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव 6 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन व सोयापेंडच्या दरातील सुधारणा कायम राहिल्यास देशातही दर सुधारू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला.
सोयातेलाचे (Soyaoil) भाव काय राहतात? यावर सोयाबीनचा बाजार अवलंबून आहे. सोयाबीनला सरासरी ५२०० ते ५५०० रुपये दर मिळतोय. हा दर मागील एक महिन्यापासून आहे. त्यामुळं शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत.
जानेवारीच्या मध्यापर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची आवक जास्त असते. त्यामुळं दरही सर्वात कमी असतात. पण यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केल्यानं दर जास्त तुटले नाहीत. पण दबावात मात्र आले. सोयाबीन दर कमी झाल्यानं सोयापेंडचे भावसुद्धा कमी होऊन सोयापेंड निर्यात वाढली. तसंच सौदेही वाढले. भारतीय सोयापेंडला जानेवारी महिन्यात चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. तसंच खाद्यतेलालाही आधार मिळू शकतो. त्यामुळं सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
1)सोयाबीन ची दुसरी फवारणी कधी करावी?
सोयाबीन ची दुसरी फवारणी 35 – 40 दिवसाच्या दरम्यान करावी.
2)सोयामध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त आहे का?
सरासरी, 9.0 मिग्रॅ. प्रति किलो ग्लायफोसेट आढळले …
सोयाबीनपासून कोणते पदार्थ बनतात?
बाजारपेठेच्या मागणीनुसार दही, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, योगर्ट, आइस्क्रीम, पनीर, टोफू-पराठा, पुलाव, पनीर पकोडा, कटलेट, सॅंडविच, पॅटीस, ब्रेडरोल, मटार पनीर, पालक पनीर यासारखे पदार्थ तयार करता येते