एक शेतकरी एक DP योजना 2023

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता एक शेतकरी एक DP योजना सुरू झाली आहे. तर या अंतर्गत प्रत्येकी शेतकऱ्याला एक डीपी दिली जाणार आहे. एक शेतकरी एक डीपी योजना म्हणजे नेमकी काय आहे? या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे? या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत? कागदपत्रे कोणकोणती लागणार? पात्रता काय असणार आहे? संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यां करिता ही योजना सुरू केलेली आहे. तरी या योजनेअंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर याठिकाणी दिले जाणार आहे. राज्यामधील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना हाय व्होल्टेज वितरण लाईन साठी वीज कनेक्शन दिले जाणार आहे. अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करेल शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कनेक्शन मिळावे म्हणून शासनाने कृषी संकल्प योजना सुरू केलेली आहे, यामध्ये सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना 7000 रुपये खर्च करावा लागणार आहे. 

एक शेतकरी एक DP योजना अनुदान त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर अर्थातच एक डीपी बसवण्यासाठी प्रति अश्वशक्ती म्हणजेच प्रति एचपी 5000 रुपये असे खर्च करावे लागणार आहेत आणि उर्वरित भार हा राज्य सरकार उचलणार आहे. या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत चे सर्व शासन निर्णय आपल्याला ह्या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहेत 

या योजनेची माहिती देतांना वीज कंपनीचे कार्यकारी अधिकारी अभियंता डीबी ठाकरे यांच्या माहितीनुसार 2 हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना वीज दिल्यानंतर त्याच्या शेतात एक ट्रान्सफर प्रती HP 7000 रुपये SC , ST वर्गातील शेतकर्‍यांना 5 हजार रुपये भरल्यानंतर मिळेल. तसेच  पाच हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 11 हजार रुपये द्यावे लागतील तर उर्वरित रक्कम कंपनीला अनुदान म्हणून सरकार देईल. योजनेअंतर्गत 2 हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गाच्या शेतकऱ्याला 3 HP कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्याला प्रती Hp 7 हजार रुपये दराने असे 21 हजार रुपये भारावे लागणार आहे.

एक शेतकरी एक ट्रांसफार्मर योजनेचे उद्दिष्टे 

लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे विद्युत पुरवठ्यात  वारंवार बिघाड होऊन शेतकऱ्यांना वीजपुरवठा खंडित होणे तांत्रिक वीज व वाढणे रोहित्र बिघाड होण्याची प्रमाणामध्ये वाढ विद्युत अपघात लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी करणे या प्रकारचे गंभीर समस्यांना शेतकरी सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात तर ह्या समस्या निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणाली द्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे उचला वितरण प्रणाली मुळ्या खंडित व शास्वत वीज पुरवठा होण्यास विद्युत अपघात आणि रोहित या तीनही बाबी मध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून अनधिकृत वीज जोडणी होणार नाही व  या सर्वांचा विचार करता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक DP आत्ताच एक शेतकरी एक डीपी योजना आम्ही सुरू केली आहे.

शेतकऱ्यांची 2 हेक्‍टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपये द्यावे लागतील.

शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना कागदपत्रे

स्कीम साठी  लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबर शेताचे आतच सात-बारा आणि आठ अ उतारा जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर आवश्यक प्ले बँक खाते पासबुक

एक शेतकरी योजना तक्रार हेल्पलाईन

तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निराकरण करू शकता. 

महावितरण टोल-फ्री :- १८००-१०२-३४

राष्ट्रीय टोल-फ्री :- १९१२ / १९१२०

एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाईन अर्ज

एक शेतकरी एक DP  योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मोबाईल नंबर, सातबारा, आठ अ उतारा, अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील लाभार्थीं असाल, तर त्यासाठी जातीचा दाखला कागदपत्रे ही आपल्याला आवश्यक आहेत. त्याचबरोबर आपले बँकेचे खाते, पासबुक आवश्यक आहे

एक शेतकरी एक DP योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा: https://mahadiscom.in/

2) या पेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा त्यावर नवीन वीज  कनेक्शन साठी अर्ज भरा या पर्यायावर क्लिक करा. 

3) त्यानंतर ॲग्रीकल्चर (agriculture) वर क्लिक करा.

4) पुढे हॉर्स पावर म्हणजे एचपी निवडा. दिलेल्या बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिट करा.

5) पुढे तुमच्यासमोर  नवीन फॉर्म उघडेल त्यावर तुमची सर्व माहिती भरा व सबमिट करा.

6) फॉर्म सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.

7) त्यानंतर E-mail  मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे सबमिट करा. शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाऊनलोड करा.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: