काकडी लागवडीतील समस्यावर उपाययोजना

काकडी

काकडी हे भारतीय पिक असल्यामुळे संपूर्ण भारतात काकडीची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अति पाऊस प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन घेता येते. उन्हाळ्यात काकडीला खुप मागणी असते.
काकडी हे एक पित्ताला कमी करते. काकडी स्वादिष्ट व उष्णतेचा त्रास खुप कमी करते व तहान शमवते जेवणात बरेच लोक याचा उपयोग करतात
जेवणात सलाद सर्वाना प्रिय असतात. काकडीला सलादच्या व्यतिरिक्त उपवासात फराळात उपयोग करतात.काकडीपासून मिठाई बनवतात. तसेच पोटामधील तक्रार आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधिच्या रूपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणामध्ये फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक ठरते . याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. लघवीत होणारी जळजळ, थांबुन होणे किंवा मधुमेह मध्ये पण लाभदायक आहे.काकडीच्या चकत्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी, जेवनामध्ये काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे.

 

काकडी लागवड

●काकडी हवामान व जमीन

काकडी हे उष्‍ण व कोरडया हवामानात येणारे पीक आहे. पाण्‍याचा निचरा होणारी मध्‍यम ते भारी जमीन या पिकास योग्‍य आहे.
●लागवडीचा हंगाम
काकडीची लागवड खरीप व उन्‍हाळी हंगामात होते. खरीप हंगामात काकडीची लागवड जून ते जूलै महिन्‍यात व उन्‍हाळी हंगामामध्‍ये साधरणतः जानेवारी महिन्‍यात करतात. जमिनीत योग्य प्रमाणात शेणखत मिसळून काकडी लागवड करतात.

उन्हाळी मिरची लागवड कशी करावी संपूर्ण माहिती

●काकडी लागवड पद्धत

पूर्वमशागत व लागवड –
१. उभी आणि आडवी ढेकळे फोडून नांगरणी करावी.
२. चांगले कुजलेले ३० – ४० गाड्या शेणखत मातीत मिसळावेत.
३. त्यानंतर एक वखरणी करावी.
४. उन्हाळी हंगामात ६० – ७५ सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पडून घ्याव्यात.

●खते व पाणी व्यवस्थापन –

१. लागवडीपूर्वी काकडी पिकास “50 किलो नत्र , 50 किलो पालाश , 50 किलो स्फुरद द्यावे.
२. लागवडीनंतर १ महिन्याने नत्राचा दुसरा हफ्ता 50 किलोचाचा द्यावा.
३. पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
४. उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अतंराने पाणी द्यावे

●आंतरमशागत –

१. महाराष्ट्रात काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते. त्यामुळे लागवडींनंतर 25 – 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावेत.
२. फळे मातीला लागून खराब होवू नये म्हणून खाली काटक्या टाकाव्यात.

●काकडी काढणी व उत्पादन कसे होते?

१. काकडी फळे कोवळी असल्यास तोडावेत जेणेकरून बाजारात योग्य भाव मिळतो.
२. काकडीची तोडणी दार २ – ३ दिवसांनी करावी लागते.
३. हंगाम व जातीनुसार प्रति हेक्टरी २०० ते ३०० क्विंटल पर्यंत काकडी उत्पन्न मिळते.

PM विश्वकर्मा योजना: PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा

● काकडीच्या जाती

शीतल वाण – ही जात डोंगर उताराच्‍या हलक्‍या किंवा जास्‍त पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. …

पुना खिरा – या जातीमध्‍ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे 2 प्रकारचे बियाणे बाजारामध्ये मिळते.

प्रिया – ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी आणि सरळ असतात. …

पुसा संयोग – ही लवकर येणारी जात असून त्याची फळे हिरव्‍या रंगाची असतात.

●काकडी खाण्याचे फायदे

1)काकडीमध्ये असतात अनेक पोषक तत्वं

आहार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीमध्ये पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशिअम सारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असता.

याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए व ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळू शकतात. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून anti – oxidents शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

उन्हाळी तीळ लागवड कशी करावी संपूर्ण माहिती.

 

2)अनेक आजारांमध्ये काकडी खाल्याने होतो फायदा

संशोधकांना असे दिसले आहे की, मधुमेह असलेल्या लोकांसाठी काकडी खाणे हा एक उत्तम आहारातील पर्याय असू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यापासून होणारा धोका रोखण्यात काकडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

यात असे पदार्थ आहेत जे रक्तातील साखरचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करू शकतात. त्याशिवाय काकडीमध्ये पोटॅशिअम व मॅग्नेशिअम असल्यामुळे ती हृदयरोगाच्या रुग्णांकरिता लाभदायक ठरते.

काकडी तोटे:

1)अधिक प्रमाणात काकडी खाल्याने रक्त गोठू शकते

संशोधकांच्या माहितीनुसार, काकडीमध्ये व्हिटॅमिन- K असणे हे खूप महत्त्वाचे असते. मात्र जास्त प्रमाणात काकडी खाल्यामुळे व्हिटॅमिन –K चे शरीरातील प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

जे लोक रक्त पातळ होण्यासाठी औषधे घेतात , त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अधिक प्रमाणात काकडी खाऊ नये
2)होऊ शकते ॲलर्जी

काकडी जास्त प्रमाणात खाल्यामुळे काही लोकांनी ॲलर्जी झाल्याचे दिसून आले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला आधीपासूनच जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत काकडीचे जास्त सेवन धोकादायक ठरू शकते.

काकडी नेहमी ठराविक प्रमाणात खावी. त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकत

●काकडी पिक तिन्ही ऋतुत येते.

•काकडी लागवड उन्हाळी

दैनंदिन जीवनात काकडीची गरज ही खूप जास्त असते. काकडीचा दर हा बाजारांमधील मागणी व आवक यानुसार ठरतो. बाजारामध्ये जास्त आवक असेल तर दर कमी व कमी आवक असेल तर दर हा जास्त असतो.

•पावसाळी काकडी:

काळात उत्पादन चांगले मिळते व दरही चांगला मिळतो. काकडीला मार्केट मधील मागणी या काळात मध्यम असते. या काळामध्ये काकडीला कीड व रोग त्रास देतात. कीड रोग व्यवस्थापन चांगले केल्यास या काळात काकडी परवडू शकते.

•हिवाळी काकडी

या काळात उत्पादन कमी प्रमाणात मिळते. काकडीला मार्केट मधील मागणी या काळात कमी जास्त असते. दरही कमी जास्त असू शकतो. हिवाळी लागवडीत दराची शाश्वती नसते. – या काळात काकडीवर रसशोषक किडीं सोबत भुरी या रोगाचा जास्त त्रास होतो.

●काकडी बियाणे किंमत

शीतल वाण – ही काकडीची जात डोंगर उताराच्‍या हलक्‍या आणि अधिक पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे रंगांनी हिरवी व मध्‍यम रंगाची असतात कोवळया फळांचे वजन 200 – 250 ग्रॅम असते हेक्‍टरी उत्‍पादन 30 – 35 टन मिळते.

पुना खिरा – या जातीमध्‍ये हिरवे व पिवळट तांबडी फळे येणारे 2 प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्‍हाळी हंगामात चांगली असून हेक्‍टरी उत्‍पादन 13 – 15 टन मिळते.

प्रिया – ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी अथवा सरळ असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 30 – 35 टन मिळते.

पुसा संयोग – ही जात लवकर येणारी जात असून फळे हिरव्‍या रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 25 ते 30 टन मिळते. या शिवाय पॉंइंट सेट, हिमांगी व फुले शुभांगी यासारख्‍या जाती लागवडीस योग्‍य आहेत.

●काकडीचे थालीपीठ

1.काकडी स्वच्छ धुऊन साले काढून किसून घ्यावी
2.पीठ चाळून घ्यावीत. कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावी.
3.किसलेल्या काकडीत पीठ घालून त्यात जिरें,आले, लसूण, मिरची पेस्ट, हळद, मीठ घालून पीठ मळून घ्यावे. पाणी अजीबात घालू नये
4.प्लॅशटिक च्या पेपरवर किंवा कापडावर थालीपीठ थापून गॅसवर मध्यम आचेवर तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूनी तांबूस रंग होई पर्यंत भाजून घ्यावे.
5.काकडीचे खुसखुशीत थालीपीठ तयार. दही,लोणच्या बरोबर सर्व्ह करावे.

●काकडी बाजार भाव

काकडी क्विंटल 800 ते 815 रुपये आहेत.

FAQ:

1)रोज काकडी खाल्ल्यास काय होते?

काकडी खाल्ल्याने वजन कमी होणे, संतुलित हायड्रेशन, पचन नियमितता व रक्तातील साखरेची पातळी कमी करणे यासह अनेक संभाव्य आरोग्य फायदे होऊ शकतात.

2)काकडीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत?
काकडी पोटॅशियम, मॅग्नेशियम व आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे. हे पोषक रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो . उच्चरक्तदाब असलेल्या वृद्ध लोकांमध्ये काकडीच्या रसाचे नियमित सेवन रक्तदाब कमी करण्यास मदत करते हेही संशोधनात सिद्ध झाले आहे

3)काकडी किती दिवसात येते?

बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात.

4)उपवासात काकडी खाऊ शकतो का?

होय, उपवासासाठी काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, पाण्याचे प्रमाण जास्त असते व आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यांचे हायड्रेटिंग गुणधर्म उपवासाच्या काळात हायड्रेशन राखण्यास मदत करतात.

5)काकडीचे उत्पादन कुठे होते?

जगभरात काकडीचे उत्पादन केले जाते व अमेरिका हा चीन, भारत व रशिया नंतर चौथा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यूएस मध्ये, देशभरातील अनेक राज्यांमध्ये काकडीचे उत्पादन केले जाते

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: