नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्राची अजुनही सुरूवात झाली नाही.

आतापर्यंत नाफेड तर्फे हरभरा खरेदी सुरु नाही

यावर्षी हारभऱ्याला साध्या बाजारपेठेत 4500 ते 5000 क्विंटल भाव मिळत आहे. पण अजुन पर्यंत नाफेड मार्फत केली जाणारी खरेदी प्रक्रिया मात्र सुरु झाली नाही.

दरवर्षी रब्बी पिकातील हरभरा खरेदी साठी नाव नोंदणी करताना हरभरा खरेदी केली गेला.

मागच्या वर्षी ही नोंदणी करताना हरभरा खरेदी केली गेली. पण यावर्षी तर नाव नोंदणी करण्याचे आदेश आलेले नाहीत.

हमीभाव इतका हरभरा विकला जात असल्याने ही प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

या वर्षी रब्बी हंगामातिल हरभरा काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बाजारात हरभरा आवक वाढली आहे.

किमान 4800 ते कमाल 5500 प्रति क्विटल हरभरा विकला जात आहे.

हमीभाव व खुला बाजारभावात जास्त तफावत जास्त नसल्यामुळे सदया नाफेड केन्द्राची मागणी होत नसल्याचे अधिकारी सांगत आहे.

हरभरा खरेदीच्या नाफेडकडे खरेदी केन्द्राची यादी पाठविल्याचे पणन महासंघाकडून सांगण्यात आले आहे. येत्या आठवड्यात मंजुरीची शक्यता आहे.

परंतु बाजारात (msp) हमीभावा एवढा दर मिळत आहे त्यामुळे शेतकरऱ्याकडून केन्द्राची मागणी होत नसल्याचे सांगण्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: