उन्हाळी मिरची लागवड कशी करावी संपूर्ण माहिती

मिरची

मिरची हा आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाचा घटक आहे. हिरव्या मिरची या पिकाला वर्षभर मागणी असते. भावही चांगला मिळतो .
मिरची लागवड आपण उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतुत करू शकतो.
मिरची लागवड कशी करावी? कोणत्या महिन्यात करावी? सुधारित जाती कोणत्या? याविषयी या लेखात आपण माहिती बघणार आहोत.

●मिरची लागवडीसाठी पूर्वमशागत कशी करावी?

जमीन नांगरून तयार करावी. दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून जमीन तयार करावी.

हवामान: मिरची पिकाला उष्ण व दमट हवामान लागते. मिरची पिक 18 ते 27 अंश सेल्शियस तापमानावर चांगले येते.

जमीन:

मिरची लागवड मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. हलक्या जमिनीत सेंद्रिय खते वापरून आपण चांगले पिक घेवू शकतो.

हंगाम:

फेब्रूवारी ते मार्च महिन्यात मिरची लागवड करावी.

●मिरची लागवड वाण /जाती कोणत्या आहेत?

मिरची लागवडीसाठी पूसा, ज्वाला, सदाबहार, फुले मुक्ता, परभणी टॉल, अग्निरेखा, कोकण क्रांती, मुसाळवाडी या जातीची लागवड करावी.
सितारा, आरमोर मिरची एफ1,

मिरची लागवडीसाठी बियाणे कोणते वापरावे?

साधरणतः हेक्टरी एक ते दीड किलो बियाणे वापरावे.
●मिरची लागवड किती फुटावर करावी?
आठ ते दहा सेमी अंतरावर मिरची लागवड करावी.
बियाणे उगवण होईपर्यंत वाफ्याना झारीने पाणी दया.
मिरची लागवडी नन्तर 20 ते 25 दिवसांनी खुरपणी करा.

●मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी?

उन्हाळी मिरची लागवड जानेवारी ते डिसेंबर महिन्यातच करावी.
●मिरची वाढण्यास किती काळ लागतो?
मिरची परिपक्व होण्यासाठी साधरणतः 100 किंवा अधिक दिवस लागतात. हे पिक वेळेत सुरु करणे गरजेचे आहे.

मिरची व्हरायटी मिरची कोणती लावावी ?

पिकाडोर, शिमला, बलराम, ज्वलरी, तेजा

●काळी व तिखट मिरची लागवड फायदा कोणता?

काळी व तिखट मिरची लागवड करताना निवडा. बाजारात खुप मागणी आहे.

●मिरची उपयोग कोणते?

1)शरीरातील अतिरिक्त अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन करावे. परंतु त्याचवेळी लाल मिरचीचे सेवन आहारातून कमी कमी करत जावे.
2)हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल गुण चेहऱ्यावरील मुरूम आणि इतर समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो.
3)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची खुप फायदेशीर ठरते. हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त आढळते .ज्यामुळे एक विशेष प्रकारचे अँटीऑक्सिडंट म्हणून उपयोग होतो.
4)हिरवी मिरची ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानलली जाते. दिवसभरात एक मिरची खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत असते.
5)हिरव्या मिरचीचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मिरचीचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होत असते. हिरवी मिरची ट्रायग्लिसराईड नियंत्रित करण्यातही मदत करते. ज्यामुळे एथेरोस्लोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होत जातो.

मिरची रोग नियंत्रण:

chilli leaf curl virus या रोगाची लक्षणे कोणती आहेत?
1. पानांच्या कडा वरच्या दिशेने मुडपत जातात.
2. शिरा पिवळ्या पडत असतात
3. पानांचा आकार कमी कमी होतो.
4. झाडांची वाढ खुंटत जाते
5. जुनी पाने खरबडीत आणि जाड होतात.
6. फळांची गुच्छे लहान आकाराची होत जातात.
प्रादुर्भाव –
1. मिरचीवरील चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव सर्वात आधी रोपवाटिकेत होतो.
2. या रोपांची आपल्या शेतात लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसात म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये प्रादुर्भावास सुरुवात होते.
3. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हा रोग सर्वत्र पसरतो.
रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचे नियंत्रण होत नसल्याने अनेक शेतक-यांना पीक घेता येत नाही.

●व्हायरस चे स्वरूप कसे आहे–(chilli leaf curl virus)

1. या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात फुलकिडे,मावा, तुडतुडे,पांढरी माशी इत्यादी रसशोषक किडी मार्फत होत असतो.
2. किडींचा प्रादुर्भाव मिरचीच्या झाडावर झाला की विषाणू रसासोबत किडींचा शरीरात प्रवेश होतो.
3. पुढे निरोगी वनस्पतीवर या किडी रस शोषण करताना हा विषाणू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो.
●मिरची वरील व्हायरस नियंत्रण कसे करावे? त्यावरील उपाय:
1. मिरची लागवड करण्यापूर्वी तयार रोपांच्या निर्मिती करिता वापरण्यात येणारे बियाणे खात्रीशीर व दर्जेदार असल्याची खात्री करून घ्यावी.
2. रोपवाटिकेच्या चौफेर नेट किंवा कपडा बांधून घ्यावे जेणेकरून बाहेरील रसशोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये येऊ शकणार नाहीत.
3. या रोगाचा प्रसार रसशोषक किडींमार्फत होत असतो. त्यामुळे आपण शेतात 10 निळे चिकट सापळे लावावेत व 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
4. जास्त पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा वापर टाळावा.
5. शेताच्या चौफेर किंवा मिरची पिकात तीन ओळींनंतर मका,ज्वारी,चवळी इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी.
6. लागवडीकरिता प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी होते.
7. मिरची पिकामध्ये तणव्यवस्थापन काढून स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे.
8. सुरुवातीला रोपे लहान अवस्थेमध्ये नीमतेलाची 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

●मिरची फवारणी वेळापत्रक

मिरचीच्चे पिक कोरडवाहू असेल तर दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताचे पिक दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश दयावे यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडी साठी आवश्यक आहे.

●मिरचीवर फवारणी करताना कोणती  काळजी घ्यावी ?

1. फवारणी ही सकाळी 11 च्या आगोदर किंवा सायंकाळी 4 च्या नंतरच करावी.
2. फवारणी साठी योग्य पीएच चे म्हणजेच 6.5 ते 7.5 ph चे पानी वापरावे.
3. फवारणी करताना जमिनीत ओलावा असावा याची काळजी घ्यावी.
4. वारे जोरात वेगाने वाहत असताना फवारणी घेऊ नये.
5. फवारणी द्रावण तयार करताना एकएक घटक पाण्यात टाकून पानी 2 मिनिट चांगले ढवळावे व नंतर दूसरा घटक मिसळावा.
6. म्हणजेच एकदम सर्व घटक पाण्यात मिसळू नका.
7. फवारणी करताना स्टीकर चावापर करणे गरजेचे आहे.

●मिरची पिकाला एकरी खर्च किती येतो?

1) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी 80 ते 100 क्विंटल उत्‍पादन होते
2) वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन 9 ते 10 क्विंटल उत्पादन होते तर
3) कोरडवाहू जमिनीत मिरचीचे उत्‍पादन 6 ते 7 क्विंटल उत्पादन होते.

FAQ

1) भारतातील सर्वात मोठी मिर्ची मार्केट कोणती आहे?
उत्तर- आंध्र प्रदेशच्या कडक उन्हात गुंटूर वसले आहे, जिथे लाल मिरचीचा वारसा तेजस्वीपणे जळतो. या भारतीय मसाल्याच्या बाजारपेठेने आशियातील सर्वात मोठे लाल मिरची बाजारपेठ म्हणून आपली भूमिका स्वीकारली आहे आणि ‘भारताची मिरची राजधानी’ अशी मान मिळवला आहे.

2)जगातील सर्वात मोठी मिरची कोणती आहे?
बिग जिम चिलीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी चिली मिरची म्हणून नोंद केली आहे,

3)सर्वाधिक उत्पादन देणारे हिरव्या मिरचीचे वाण कोणते आहे?
उत्तर- अग्निरेखा
1)हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे.
2) हेक्टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे.
• भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: