मिरची भावात तेजी, मिरची लावा आणि लखपती व्हा

मिरची

भारतीय संस्कृतित मिरची शिवाय दररोज स्वयं पाक होऊ शकणार नाही.मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे असे मानले जाते. याची चव तिखट असते. हे फळ रंगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क व ई विटामिन्स असतात. तसेच यामध्ये कैल्शियम, फॉस्फरस ही खनिजे असतात. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.

मिरची लागवड

मिरची जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार करतात . गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून व कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 – 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद आणि 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत व अर्धा किलो सुफला मिसळावे.
बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यामध्‍ये 10 टक्‍के% फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्‍यावे. त्‍यानंतर या ओळीमध्‍ये 2 सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी आणि बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे. बी पेरल्‍यानंतर 30 – 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

मिरची भावात तेजी, मिरची लावा आणि लखपती व्हा
मिरची लागवड

उंच व पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर व बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 x 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्‍के% प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 80 टक्‍के% मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

मिरची कांडप मशीन

मिरची कांडप मशीन कुटुंबाला स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांनी घरगुती उद्योग सुरू करावा यासाठी त्यांना मिरची कांडप यंत्र उपयोगी आहे. यातून त्यांना नक्कीच उत्पन्नाचा मार्ग निघेल.

मिरची उपयोग :

भारतीय जेवणात चव हिरव्या मिरचीमुळे जास्त येते. जेवणामध्ये तडका, तिखटपणा आणण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. मिरची जशी जेवणाची चव वाढवते. तशीच ती अनेक आजारांवरही रामबाण उपाय आहे. जर तुम्ही रोज मिरचीचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन बी 6 असते. याशिवाय त्यात कॅप्सेसिन, कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन व झेक्सॅन्थिन सारखे अँटी-ऑक्सिडंट असतात जे फुफ्फुस व हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करतात. अमीनो ऍसिड, फॉलिक ऍसिड व ऍस्कॉर्बिक ऍसिड असतात जे पाचक एन्झाईम वाढवतात व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

1)’हाय बीपी :

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते, म्हणूनच ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे. याबरोबरच मिरचीतील सायट्रिक अॅसिड रक्त पातळ करण्याचे काम करते, त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित राहते.

2)त्वचेसाठी फायदेशीर :

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते त्वचेला अधिक कोलेजन तयार करण्यास मदत करते. हिरवी मिरची त्वचा निरोगी व चमकदार बनविण्यात मदत करते.

3)लोहाची कमतरता दूर करते :

हिरव्या मिरचीमध्ये लोह भरपूर असते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्या लोकांना थकवा जाणवतो. अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश केला पाहिजे .

4)डोळ्यांसाठी फायदेशीर :

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक आढळतात, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे वृद्धत्वापासून संरक्षण करते व मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी करते.

5)सांधेदुखीमध्ये फायदेशीर :

हिरव्या मिरचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. संधिवात व ऑस्टियोआर्थराइटिसच्या रुग्णांसाठी याचा वापर खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे हाडांची सूज व वेदना कमी होतात.

6)रक्ताभिसरण सुधारते :

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते ज्यामुळे ती तिखट लागते. मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते व नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो. हिरव्या मिरच्यांचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण संतुलित राहण्यास मदत होते

7)पचन सुधारते :

हिरवी मिरची अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, हिरव्या मिरचीमध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

मिरची भाव आजचा

मिरची आजचा बाजारभाव कमीत कमी 3500
जास्तीत जास्त 5000 आहे.

मिरची फवारणी

रोग
1)मर :

हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज व मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग व मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के% मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे अथवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.

2)फळे कुजणे व फांद्या वाळणे :

( फ्रूट रॉट अॅड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या अथवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात व फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात व गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर व फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.

उपाय :

या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे तोडून त्‍यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 अथवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

3)भुरी ( पावडरी मिल्‍डयू ) :

भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या व खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात.

उपाय :

भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक अथवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

4)किड फूलकिडे :

हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे एक मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रसाचे शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते आणि पानांची गळ होते.

उपाय :

रोपलावणीपासून तीन आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

5)मावा :

हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने व शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.

मिरची लिंबू लोणचे

लोणचे बनविण्याची कृती

१. सगळ्यात आधी तर लिंबू व मिरच्या दोन्हीही चांगले धुवून घ्या व स्वच्छ कपड्याने पुसून एकदम कोरडे करून घ्या. लिंबू व मिरची जराशीही ओलसर राहिली, तरी लोणचे खराब होण्याची शक्यता असते. २. यानंतर लिंबू चिरून घ्या. एका लिंबाच्या आठ फोडी कराव्यात. यामुळे सगळ्या फोडी अगदी एकसारख्या होतात. लिंबाच्या बिया काढून टाकाव्यात.

३. मिरचीचा आकार पाहून तुम्हाला जसे आवडतात तसे मिरचीचे काप करून घ्या. साधारण एका मध्यम लांबीच्या मिरचीचे 2 ते 3 तुकडे करावेत.

४. लिंबाच्या फोडी व मिरचीचे काप एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये मीठ, मोहरी डाळ, हळद घालून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या. स्वच्छ बरणीत भरून ठेवा.

५. १० ते १२ दिवस हे लोणचे दररोज हलवावे. अन्यथा ते बुरशी लागून खराब होऊ शकते.

६. जर तुम्हाला आवडत असेल तर लोणचे मुरल्यावर त्यात तेल गरम करून घालावे.

लिंबू मिरचीचे लोणचे खाण्याचे फायदे

१. आजारातून उठलेल्या व्यक्तीला हे लोणचे खायला दिल्यास अन्न वरील उडालेली वासना काही अंशी कमी होते व तोंडाला चव येते.

२. लिंबाच्या लोणच्यामुळे पचनक्रिया सुधारते.

३. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्तीही सुधारते.

मिरची खत व्यवस्थापन

मिरची च्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद व ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद व पालाश यांची पूर्ण मात्रा व नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत.
3)सर्वाधिक उत्पादन देणारे हिरव्या मिरचीचे वाण कोणते आहे?

1)अग्निरेखा–

हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात खूप उपयुक्त आहे
हेक्‍टरी सरासरी उत्पादन 25 – 26 क्विंटल आहे.
भुरी आणि मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.

2)फुले ज्योती–

मसाला करण्यासाठी हि जात मोठे प्रमाणात वापरली जाते.
वाळलेल्या मिरचीचे 28 – 30 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते.
ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे व पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते.

3)ब्याडगी–

लाल मिरचीसाठी हि जात वापरली जाते.
साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो.
फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे.
फळांची साल जाड असते.

4)ज्वाला –

हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे.
तिखटपणा जास्त आहे.

5)पंत सी-1 –

ही जात हिरवी आणि लाल मिरचीसाठी चांगली आहे.
तिखटपणा जास्त आहे.

6)फुले सई –

वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो.
तिखटपणा मध्यम आहे.

FAQ:
1)अमावस्या व पौर्णिमेला लोक गाडी धुऊन त्यांची पूजा करतात अथवा लिंबू मिरची बांधतात …
उत्तर-ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात, लिंबू व मिरची अशा गोष्टी शोषून घेतात त्यामुळे गाडीला अपघात होण्याचा धोका कमी होतो, अशी सर्व साधारण श्रद्धा आहे.

2)मिरचीमध्ये कोणते ऍसिड असते?
उत्तर-एस्कोर्बिक एसिड, फोलिक एसिड, कैप्सेसिन एसिड और कैप्सीसिन एसिड

सार्वजनिक वितरण प्रणाली(Public Distribution System) पारदर्शक कशी बनवता येईल?

रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया

शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !

100% बहुगुणी पीक सोयाबीन,शेतकऱ्यांना करतो मालामाल

काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या

 

 

 

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: