शासन आपल्या दारी योजना काय आहे?

शासन आपल्या दारी योजना :

Table of Contents

Toggle

(Maharashtra Sarkar Yojana)
योजनेचे नाव-शासन आपल्या दारी योजना
कोणी सुरु केली-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
उद्दिष्ट- घरोघरी सरकारी सेवा पुरवणे

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली शासन आपल्या दारी योजना, घरोघरी सेवा मिळणार | शासन आपल्या दारी योजना 2023 मराठी सरकारी योजना आणि सेवा नागरिकांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला आहे  Shasan Aplya Dari Yojana 2023

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी योजना काय आहे?

शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा व लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा, व्यक्तींना विविध नोकरशाही प्रक्रियांमधून नेव्हिगेट करावे लागते व त्यांना हक्क असलेल्या योजनांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक कार्यालयांना भेट द्यावी लागते.

शासन आपल्या दारी म्हणजे काय?

स्थानिक लोकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच योग्य योजनेचा लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनांना दोन दिवसीय शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासन आपल्या दारी या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यामधून झाला आहे. आतापर्यंत बुलढाणा, परभणी, शिर्डी, अहमदनगर,जेजुरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे.

अशाप्रकारे जिल्हा प्रशासनांनी 2 दिवसीय शिबिरांचे आयोजन केल्यास 75,000 स्थानिक लोकांना या उपक्रमाचा फायदा घेता येईल. आतापर्यंत राज्यातील ७५ लाख लाभार्थ्यांना या अभियानाच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे.

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सुमारे 75 हजार स्थानिक रहिवाशांना लाभ देण्याच्या सूचना मुख्यमंत्रांकडून देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत शिबिरे उभारण्यासाठी कृषी, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, कौशल्य विकास, शालेय शिक्षण यासह विविध विभागांना दिलेला निधी खर्च करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे.
काय आहे शासन आपल्या दारी योजना

शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नागरिकांना विविध सरकारी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे व हा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कार्यालय, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमी अभिलेख अशा विविध विभागामार्फत येणाऱ्या सर्व सरकारी योजनेचा लाभ हा सामान्य जनतेला आणि लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. यामध्ये खालील सेवेचा समावेश असणार आहे.

शिधापत्रिका वाटप करणे

शासकीय प्रमाणपत्र

वयाचा दाखला

राष्ट्रीयत्व अधिवास

उत्पन्न दाखला

जातीचा दाखला

नॉन क्रिमिलियर दाखला

मतदार नोंदणी

आधार कार्ड नोंदणी

आधार कार्ड दुरुस्ती

संजय गांधी योजना नोंदणी

सलोखा योजना

प्रधानमंत्री मातृत्व योजना

कुटुंब कल्याण योजना

जन्ममृत्यू प्रमाणपत्र देणे

कन्या समृद्धी योजना नोंदणी

विवाह नोंदणी

कुपोषित बालकाची तपासणी करणे

जमीन मोजणी करणे

भूमापन करणे

प्रॉपर्टी कार्ड देणे

कृषी अवजाराचे वाटप करणे

बियाणे, औषधे वाटप करणे

जनावराची तपासणी शिबीर घेणे

किसान क्रेडिट कार्ड देणे

सुकन्या समृद्धी योजना नोंदणी करणे

आधार जोडणी करणे

अशा विविध शासकीय योजनेचा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे.

शासन आपल्या दारी या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की शासनाच्या विविध योजनांचा व उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य जनतेला हा त्वरित मिळावा. सर्वसामान्याचे कामे ही स्थानिक पातळीवर पूर्ण व्हावेत, तसेच सर्वसामान्य जनतेला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावेत यासाठी ही योजना थेट जनतेच्या दारात जाणार आहे. आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनता, महिला, विद्यार्थी, शेतकरी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणता 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमल बजावणी करण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा नवीन कार्यक्रम सादर केलेला आहे. या मोहिमेमुळे लोकांना एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यक्रम व कागदपत्रांचा लाभ घेता आला पाहिजे असा उद्देश आहे.

●आत्ता घरबसल्या मिळवा शासनाच्या सर्व योजनांचा लाभ

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणाकरी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा या हेतूने शासनातर्फे हाती घेण्यात आलेले ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला नागरिकांचाही चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगितले आहे . तसेच ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे काम व्यापक स्तरावर राबविण्यात येत असून यासाठी हसर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. या अभियानाच्या यशासाठी सोळा हजार योजना दूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु केलेले आहेत.

●शासन आपल्या दारी योजना लाभ प्रक्रिया

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन आपल्याला विविध योजनांची माहिती देतील.

त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतील.

या सगळ्यांची माहिती आणि त्याची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने अर्जदारांना इतरत्र कुठे जावे लागणार नाही आणि संबंधित विभागाच्या योजनेचा लाभ घेता येईल.

शासन आपल्या दारी योजनेचे उद्दिष्ट

शासन आपल्या दारी’ या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी सेवा व लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे आहे. बऱ्याचदा, एखाद्या व्यक्तीला जर सरकारी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर बऱ्याच प्रक्रियांमधून जावे लागते, अनेक कार्यालयांना भेट द्यावी लागते त्याचप्रमाणे विविध कागदपत्रे साधार करावे लागतात आणि या सर्व प्रक्रियेमध्ये बराच कालावधी जातो.

सामान्य व्यक्तीच्या या सर्व अडचणींचे निवारण करण्यासाठी या अभियानाची सुरुवात माननीय मुख्यमंत्र्यानी केली आहे. जेणेकरून त्यांना सर्व सरकारी उपक्रमांचा फायदा एकाच ठिकाणी मिळेल .
शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा हाच शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत त्यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी जाणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यात हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 75000 लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार आहे. याशिवाय शासकीय निर्धारित शुल्कात २०० पेक्षा अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. पहिल्यांदाचा सर्व प्रशासन ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तिला या योजनेची माहिती देणार आहे.

शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे वैशिष्टय

शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी वेगवान करण्यासाठी हे अभियान असणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनाशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील.

या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना शासनाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ‘शासन आपल्या दारी’ प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे. हा या अभियानाचा उद्देश आहे. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभांसाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. नागरिकांना व विद्यार्थ्यांना विविध कामांसाठीचे लागणारे आवश्यक दाखले व सेवा एकाच छताखाली ‘शासन आपल्या दारी’ शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

या अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आलेला होता. याचप्रकारचे रोजगार मेळावे राज्यात सर्व जिल्ह्यात होणार आहेत. यातून तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या अभियानात नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोफत महाआरोग्य शिबीर ’ आयोजित केले जाणार आहेत. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाची वैशिष्ट्ये –

➡राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

➡ जिल्हाधिकारी या अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील आणि इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचे ध्येय सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावे. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

➡ मंत्रालयीन स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवायच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
शासन आपल्या दारी योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत
वैशिष्ट्ये आणि फायदे

योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये व फायदे खालीलप्रमाणे आहेत:

मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाची सुरुवात सातारा जिल्ह्यापासून केली.

अधिका-यांमध्ये कार्यक्षम समन्वयाची हमी देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

आपली कामे पूर्ण करण्यासाठी अथवा दिलेल्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.

नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी 13 एप्रिल रोजी शासनाच्या सूचनेनुसार सर्व समस्या सोडविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची घोषणा केली आहे.

जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) आणि विधानसभा सदस्य लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम (MLALAD) निधी, प्रत्येकी 20 लाख रुपयांचा, दोन्ही उद्देशांसाठी वापरला जाऊ शकतो.

 

शासन आपल्या दारी योजनेचे भरपूर वैशिष्ट्य आहेत, या वैशिष्ट्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आता सर्व योजनांची माहिती एकाच छताखाली मिळणार . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत. जे सर्वसामान्य नागरिक अशिक्षित आहेत अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना एक वरदान ठरत आहे. सगळ्या योजनेची माहिती व त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कागदपत्रे लागतात ते कागदपत्रे आता एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे अर्जदाराला इतरत्र कुठेही जाऊन ती कागदपत्रे पाहण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. जर महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत पोहोचले तर सामान्य जनतेला अनेक योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विविध प्रकारचे कामे आता सहज सोपे होणार आहेत.

 

शासन आपल्या दारी योजना ऑनलाईन अर्ज Online Registration कुठे करावे

मुख्यमंत्री सचिवालयाचे यावर पूर्ण नियंत्रण आहे. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून लोकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे . या अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील csc , ‘एमएससीआयटी’ कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.
●शासन आपल्या दारी अर्ज कसा करावा?
नागरिकांना ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी शासनातर्फे भरीव निधीची तरतूद देखील करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संगितले आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

पासपोर्ट

विवाह नोंदणी

जॉब कार्ड

शिकाऊ चालक परवाना

पीएफ घरकुल योजना

ई-श्रम कार्ड

सेवानिवृत्त लाभ

भरती मेळावा

सखी किट वाटप

पीएम किसान

मनरेगा

मुलींना सायकल वाटप

नवीन मतदार नोंदणी

शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

कृषी प्रदर्शन

डिजिटल इंडिया

दिव्यांग साहित्य वाटप

●शासन आपल्या दारी अंतर्गत येणाऱ्या योजना कोणत्या? Schemes Under Shasan Aplya Dari Yojana
या अभियानाअंतर्गत महसूल, कृषी, शिक्षण आणि आरोग्य तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा समावेश असणार आहे.

●शासन आपल्या दारी उपक्रम आणि कार्यक्रम | Shasan Aplya Dari Yojana Activities and Programs

शासनतर्फे आपल्या दारीसोबतच विविध उपक्रमांचे आयोजन देखील केले जाणार आहे.

रोजगार मेळावे

आरोग्य शिबिर

रक्तदान शिबिर

दिव्यांगांना साहित्याचे वाटप

कृषी प्रदर्शन

शेतकरी ते ग्राहक थेट बाजार

यांच्या आयोजनासोबत नवीन मतदारांची नोंदणीही या ठिकाणी केली जाईल. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नागरिक अशी प्रशासन प्रणाली राबविण्यावर भर दिलेला आहे. या घोषणेचे प्रतिबिंब या अभियानात स्पष्ट दिसते आहे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयाशी आपण संपर्क साधावा हे अभियान यशस्वी करण्यास मोठ्या संख्येने आपण सहभागी असावे .

सरकारी सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे :

‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी सेवा व लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे आहे. बऱ्याचदा, व्यक्तींना विविध नोकरशाही प्रक्रियांमधून नेव्हिगेट करावे लागते व त्यांना हक्क असलेल्या योजनांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक कार्यालयांना भेट द्यावी लागते. ही नवीन मोहीम सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे .

समन्वित प्रयत्न :

उपक्रमात सहभागी अधिकाऱ्यांमध्ये कार्यक्षम समन्वय सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एक समर्पित सेल स्थापन करण्यात आलेला आहे. हा सेल अखंड संवाद साधेल व मोहिमेची अंमलबजावणी सुलभ करेल. या उपक्रमाद्वारे त्यांना सर्वसमावेशक सहाय्य देऊन जागरूकता व गैरसोयीचा अभाव यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

स्थानिक फायद्यासाठी दोन दिवसीय शिबिरे :

महाराष्ट्रभरातील जिल्हा प्रशासनांना आपापल्या कार्यक्षेत्रात 2 दिवसीय शिबिरे आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही शिबिरे केंद्रीकृत केंद्र म्हणून काम करतील जिथे नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल व आवश्यक कागदपत्रे मिळतील.

विभागीय निधीचा वापर :

शिबिरांचे आयोजन सुलभ करण्यासाठी कृषी, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, कौशल्य विकास व शालेय शिक्षण यासारख्या विविध विभागांना दिलेला निधी वापरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, विधानसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MLALAD) आणि जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) यांच्याकडील निधी देखील यासाठी वापरला जाऊ शकतो.

नागरिकांच्या सहभागाची परंपरा चालू ठेवणे :

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम नागरिकांशी जोडून घेण्याच्या उद्देशाने मागील सरकारी उपक्रमांच्या पाऊलवर पाऊल ठेवत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ‘जनता दरबार’ हा कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे मंत्री साप्ताहिक आधारावर लोकांना भेटून लोकांच्या समस्या सोडवतात.

 

शासन आपल्या दारी उपक्रम आणि कार्यक्रम | Shasan Aplya Dari Yojana Activities and Programs

शासन आपल्या दारीसोबतच विविध उपक्रमांचे देखील आयोजनही केले जाणार आहे.

रोजगार मेळावे

आरोग्य शिबिर

रक्तदान शिबिर

दिव्यांगांना साहित्याचे वाटप

कृषी प्रदर्शन

शेतकरी ते ग्राहक थेट बाजार

यांच्या आयोजनासोबत नवीन मतदारांची नोंदणीही या ठिकाणी केली जाईल. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नागरिक अशी प्रशासन प्रणाली राबविण्याकडे भर दिला आहे. या घोषणेचे प्रतिबिंब या अभियानात स्पष्टपणे दिसत आहे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयाशी आपण संपर्क साधावा हे अभियान यशस्वी करण्यास मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हाव.

 

FAQ:
1)शासन आपल्या दारी योजना 2023 साठी पात्रता काय आहे?
जर तुम्हाला शासन आपल्या दारी योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असले पाहिजे व तुम्ही कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करत असाल.

2)महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजनेचे फायदे काय आहेत?
शासन आपल्या दारी योजना या योजनेच्या मदतीने महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनां याच्यासाठी लोक अर्ज करणार आहेत.

3)महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजना म्हणजे काय?
सर्व सेवा घरोघरी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही प्रतिष्ठित योजना तयार केली आहे.

4)शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ कधी झाला?

अभियानाचा सातारा जिल्हात पाटण तालुक्यात 14 मे 2023 रोजी नुकताच शुभारंभ करण्यात आला होता.

5)शासन आपल्या दारी योजना नोंदणी पोर्टल कोणते?

महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून लोकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे.

6)शासन आपल्या दारी योजना 2023 नोंदणी करण्यासाठी कुठे जावे लागणार आहे ?

अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील CSC , ‘एमएससीआयटी’ कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

7)शासन आपल्या दारी योजना नोंदणी प्रक्रिया कश्याप्रकारे असणार आहे ?

नागरिकांना ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे

गाई-म्हशी ना कमी दूध देण्याचे कारण काय?

दही खाण्याचे फायदे कोणते आहेत ?

अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा

कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका,  अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

 

 

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring:
Exit mobile version