टोमॅटो
टोमॅटो मध्ये विटामिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे तसेच टोमॅटो या फळातील रंगद्रव्य लाल रंगांच्या टोमॅटोच्या तुलनेत नारंगी रंगाच्या टोमॅटो मध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजतेने शोषित होते. लाल रंगाच्या टोमॅटो मध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मध्ये उपलब्ध होते हे शरीरात सहजतेने अवशोषित होत नाही.
टोमॅटो फळाचे महत्त्व :
आहारदृष्ट्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
भाजी व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते. केचप, सूप, सॉस, चटणी इ. पदार्थ बनविता येतात.
टोमॅटोतील लायकोपीन या अल्कलाइड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण घटत चालते.
टोमॅटो लागवड
टोमॅटोची लागवड ही तीनही हंगामात करता येते खरीप हंगामासाठी मे ते जुन रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारीफेब्रुवारी या महिन्यामध्ये बियाणाची पेरणी करावी. अंदाजेसरळ जातीसाठी टोमॅटोचे ४०० ग्रॅम व संकरित जातीसाठी १२५ ग्रॅम बियाणे हेक्टरी पुरेसे होते.
टोमॅटो रोपांची निवड कशी करावी
टोमॅटो पीक लागवडीसाठी प्रत्येक हंगामात हंगामानुसार वेगवेगळी रोप ही आपल्याला बाजारामध्ये मिळतात.
महाराष्ट्र कृषी तज्ञांच्या मते आपल्याला जर हंगामानुसार रोप निवडायचे असेल तर आपण उन्हाळी टोमॅटो लागवड करत असाल तर तुम्ही 1057,6242,साई 25,2182 अशी वरील टोमॅटोची बियाणे तुम्ही या हंगामात लावू शकता
हवामान
टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे व कमी आद्रता असनारे व उष्ण हवामान चांगले असते.
साधारणतः १८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक उत्तम प्रमानात येते.
तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींनचे नुकसान होते.
तसेच तापमान जर १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असता पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. पिकास इजा होऊन उत्पादनात मोठी घट होते.
जास्त तापमान, कमी आर्द्रता व कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असल्यास हवामानात टोमॅटो फळांची गुणवत्ता ही चांगली असते, तर रंगदेखील आकर्षक येतो.
यानंतर जर तुम्ही पावसाळ्यामध्ये लागवड करत असाल तर तुम्ही नेत्रा,अधिक,कौस्तुभ,साई 22 अशी वरील बियाणे तुम्ही या हंगामात लावू शकता.
व यानंतर जर तुम्ही हिवाळी हंगामातील लागवड करत असाल तर विरांग,भूमि 41 अशी बियाणे घेऊन त्याची लागवड करू शकता.
शेतकरी मित्रांनो लागवडीसाठी रोपेही किमान 22 ते 25 दिवसाची असायला हवीत त्यानंतर तुम्ही लागवड करा
टोमॅटो लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी ?
लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी सर्वप्रथम रोटाव्हेटर ने रोटरनी अथवा नांगरणी करून घ्यावी.
शेतामध्ये नांगरणी झाल्यावर रोटरनी करण्याआधी एकरी ३ टन चांगले कुजलेले शेणखत त्यात ३ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळून शेतात टाकावे.
टोमॅटो लागवड २ पद्धतींनी होते –
१. पाट पाण्यावर लागवड करण्यासाठी ४ फूट खोल सरी काढावी.
२. बेड वर लागवड करण्यासाठी ३ फूट रुंद, २० सेमी उंच व शेताच्या लांबीनुसार लांब असा बेड तयार करावा.
बेड वर लागवड करण्याआधी खतांचा बेसल डोस मातीत मिसळून ठिबक संच अंथरावा नंतर मल्चिंग पेपर (२५ मायक्रॉन जाडी) पसरावा.
टोमॅटो रोपांची लागवड –
टोमॅटोची रोपे तयार झाल्यावर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्याआधी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. तसेच बेडवर लागवड करन्याच १ दिवस आधी पाण्याने चांगले भिजवून घ्यावे.
लोखंडी होल मेकर अथवा पाईपच्या मदतीने मल्चिंग पेपरवर लावणीसाठी १०० मिमी-१२० मिमी व्यासाचा छिद्र तयार करावा.
लागवड करण्यासाठी १ फूट ते १.५ फुटांवर नागमोडी पद्धतीने छिद्र पाडावी.
टोमॅटो लागवडीचे अंतर{tomato lagwad}
टोमॅटोच्या लागवडीतील अंतर साधारणत: बुटक्या ते मध्यम पसाऱ्याच्या जातीकरिता ७५ ते ९० सें. मी. सरी पाडून लागवड ३० ते ४० सें. मी. वर करावी. अधिक वाढणारे व अधिक पसारा असणाऱ्या वाणांसाठी ९० सें. मी. सरी काढून ३० सें.मी. वर लागवड करावी. अशाप्रकारे, खरीप हंगामासाठी जून-जुलै, रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर व उन्हाळी हंगामासाठी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवड करावी.
Tomato Variety:
भारतात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागले आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांची भरपूरप्रमाणात शेती करतात. टोमॅटो (Tomato Crop) हे सुध्दा एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे.
टोमॅटोसाठी महाराष्ट्रातील हवामान अनुकूल असल्याचे सांगितले जाते. खरं पाहता टोमॅटो हे उन्हाळी हंगामातील पीक म्हणून ओळखले जात असे. मात्र आता शास्त्रज्ञांनी टोमॅटोच्या प्रगत जाती (Improved Tomato Variety) विकसित केल्यामुळे टोमॅटोचे बारामाही उत्पादन (Tomato Farming) घेणे आता शक्य झाले आहे.
आपल्या राज्यात टोमॅटोची बारामाही शेती (Tomato Cultivation) केली जाते. टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Grower Farmer) या पिकातून बारामही उत्तम पैसा कमवत आहे. तसे पाहता आपल्या राज्यात टोमॅटोचे बारमाही उत्पादन घेण्यासाठी अनुकूल वातावरण आहे यामुळे टोमॅटोची शेती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) खूप फायदेशीर ठरत आहे. मात्र असे असले तरी टोमॅटोच्या पिकासाठी अधिक थंडी घातक ठरू शकते. कारण की जास्त थंडी पडली की टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते व परिणामी उत्पादनात घट घडून येते.
टोमॅटोची शेती अल्प कालावधीत शेतकऱ्यांसाठी चांगला पैसा उपलब्ध करून देत असल्याने आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी महाराष्ट्रात लागवड केल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या काही प्रगत जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. कृषी तज्ञांच्या मते कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी त्या पिकांच्या सुधारित वाणांची पेरणी करणे अथवा लागवड करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. यामुळे टोमॅटोचे शेतीतून भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी टोमॅटोच्या प्रगत वाणांची लागवड करणे अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे आज आपण महाराष्ट्रातील हवामानात अनुकूल असलेल्या टोमॅटोच्या काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील वातावरणानुसार अनुकूल असनाणाऱ्या काही टोमॅटोच्या सुधारित जाती
पुसा रुबी:- मित्रांनो पुसा रुबी ही टोमॅटोची एक सुधारित जात असून महाराष्ट्रातील हवामानासाठी अतिशय अनुकूल आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड तिन्ही हंगामात केली जाऊ शकते. या जातीच्या टोमॅटोची लागवड केल्यानंतर अंदाजे 90 दिवसांनी फळे काढण्यास येतात. फळे मध्यम आकाराची असतात शिवाय फळांचा रंग हा गडद लाल असतो. ही जात हेक्टरी 325 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. म्हणून ही जात महाराष्ट्रात लागवदिसाठी अनुकूल असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
पुसा गौरव:– मित्रांनो पुसा गौरव ही देखील एक टोमॅटोची सुधारित जात आहे. ही जात महाराष्ट्रासाठी अनुकूल असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात. या जातीचे टोमॅटो हे लांबट गोल असतात शिवाय पिकल्यावर पिवळसर लाल कलरची भासत असतात. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीचे टोमॅटो वाहतुकीसाठी योग्य असतात. पुसा गौरव जातीचे टोमॅटो हेक्टरी 400 क्विंटल पीक देण्याचा दावा करते.
पुसा शीतल:– पुसा शीतल हीदेखील टोमॅटोची एक सुधारित जात आहे व महाराष्ट्रात लागवड करण्यासाठी योग्य आहे. या जातीच्या नावावरूनच आपल्याला समजते की ही जात हिवाळ्यात लागवड करण्यासाठी उत्तम आहे. या जातीचे टोमॅटो चपटे गोल व मध्यम आकाराचे असतात आणि लाल असत्यात. पुसा शीतल हे टोमॅटोचे वाण हेक्टरी साडेतीनशे क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.
अर्का गौरव:- ही देखील टोमॅटोची एक प्रगत जात आहे. शिवाय महाराष्ट्रात लागवड करण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. या जातीचे टोमॅटोचे फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात. या जातीच्या टोमॅटो पिकापासून हेक्टरी 350 क्विंटल पर्यंत उत्पादन सहज मिळतं असल्याचा दावा केला जातो.
रोमा:- रोमा ही देखील टोमॅटोची एक सुधारित जात आहे. या जातीची महाराष्ट्रात लागवड केली जाऊ शकते. या जातीचे झाडे लहान व झुडपाळ असातात व फळे आकाराने लांबट असतात. या जातीची सर्वात मोठी विशेषता अशी आहेकी टोमॅटोची जाड साल असल्याने वाहतुकीस उत्तम आहे. या जातीपासून हेक्टरी 25 टन पीक घेतले जाऊ शकते. निश्चितच ही देखील जातं शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे.
जाती :
भाग्यश्री ः या जातीच्या फळांत लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असून, बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची अधिक गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे अंदाजे उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते.
धनश्री ः फळे मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाची असतात. या जातीचे अंदाजे उत्पन्न ५० ते ६० टन प्रतिहेक्टर आहे. ही जात स्पॉटेड विल्ट व लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
राजश्री ः फळे नारंगी लाल रंगाची असतात व या संकरीत वाणाचे पीक ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगाशीसहसा बळी पडत नाही.
फुले राजा ः फळे नारंगी, लाल रंगाची असतात. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगाशी कमी बळी पडते. उत्पादन ५५-६० टन प्रतिहेक्टर मिळते.
खत व्यवस्थापन :
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावेत.
अ) सेंद्रिय खते :
प्रतिहेक्टर २० टन शेणखत आणि २०० किलो निंबोळी पेंड.
ब) रासायनिक खते ः
मध्यम पद्धतीचा जमिनीस संकरीत वाणासाठी हेक्टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद व १५० किलो पालाश घेणे.
तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश घेणे.
याशिवाय संकरीत व सुधारीत व सरळ वाणासाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २५ किलो मॅगनीज सल्फेट, ५ किलो बोरॅक्स व २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.
क) जैविक खते ः
एकरी २ किलो ॲझोटोबॅक्टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जीवाणू हे सगळं १ टन शेणखतात मिक्स करून द्यावे.
खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी सारख्या हप्त्यांनी विभागून बांगडी प्रकारे झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावेत.
पाणी व्यवस्थापन :
पाणी व्यवस्थापनेवेळी जमिनीचा मगदूर व वातावरण या गाष्टिंचा विचार करावा.
हलक्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या अधिक द्याव्यात व त्यानुसार चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.
लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.
पिकांच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ अधिक होते. त्यामुळे लागवडीपासून ते फुलोरा येईपर्यंत अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी नियोजनाने द्यावे.
ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची रोजची पाण्याची गरज ठरवून तेवढेच पाणी मोजून द्यावे.
फुले लागण्याच्या काळात पाण्याचा प्रभाव पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या परिशाणी निर्माण होतात.
पाणी सतत व जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी होतात व उत्त्पनात घट होते.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या कालवधीत पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या कालावधीत पाणी द्यावे.
पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एचएनपीव्ही) विषाणूजन्य कीटकनाशक २०० मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.
नागअळी : ह्या अळ्या पानांच्या पापुद्र्यामध्ये शिरून त्यामधला हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. पापुद्र् नियंत्रण ः रोपांची लागवड करतेवेळी अशी पाने काढावी. ४ टक्के निंबोळी आकराच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्टीन ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.
टोमॅटोच्या फळ अळीची संख्या तीव्र असल्यास, प्रभावी नैसर्गिक कीटकनाशकांमध्ये बॅसिलस थुरिंगिएन्सिस, स्पिनोसॅड व पायरेथ्रिन यांचा समावेश होतो. शक्य असेल तेव्हा नैसर्गिक कीटकनाशकाची लिक्विड स्प्रे आवृत्ती निवडा – द्रव फवारण्यांमध्ये कीटकनाशकाच्या धूळ-स्वरूपापेक्षा चांगले कव्हरेज असते.
टोमॅटो जाती
त्यासाठी जमीन तयार करून खतांच्या मात्रा दिल्या. त्यात प्रामुख्याने कोंबडीखत ८ क्विंटल, जैविक खते २०० किलो, १०ः२६ः२६ व १५:१५:१५ प्रत्येकी १०० किलो प्रति एकर प्रमाणात मात्रा दिली.
लागवडीसाठी ४ फुटांचे बेड तयार करून ठिबकच्या नळ्या टाकून घेतल्या. त्यावर २५ मायक्रॉन जाडीचा ४ फूट रुंदीचा पेपर अंथरूण घेतला आहे.
लागवडीकरता रोपवाटिकेतून रोपांची १ रुपये प्रति रोप या दराने खरेदी केली. लागवडीसाठी एकरी ५ हजार रोपे लागली आहेत.
लागवड ४ फुटांच्या बेडवर झिगझॅग पद्धतीने दोन ओळींत दीड फूट तर दोन रोपांत १ फूट अंतर राखत केली आहे. त्यानुसार तयार रोपांची १२ जानेवारीला २ एकरावर लागवड केली. संपूर्ण लागवड पॉलिमल्चिंगवर केली आहे.
टोमॅटो वाढण्यास किती वेळ लागतो?
टोमॅटोची लागवड झाल्यावर साधारणपणे १ ते १.५ महिन्यानंतर झाडांवर फळे वाढू लागल्यावर वजनामुळे झाडाच्या फांद्या जमिनीवर टेकतात, काही फळांचा जमिनीशी संपर्क होतो. त्यामुळे झाडांवर किडी व रोगाचा प्रदुर्भाव होतो. फळे खराब होन्यास सूर्वात होते, वरच्या बाजूची फळे उघडी होतात. यासाठी झाडांना आधार देणे महत्वाचे आहे.
टोमॅटोची माहिती आणि फ़ायदे –
टोमॅटो ही कोणत्याही साध्याशा भाजीचीही चव वाढवते. टोमॅटोमध्ये असे खूप पोषक घटक (Surprising Health Benefits Of Tomato) आढळतात जे आरोग्यासाठी चांगलेच फायदेशीर मानले जातात. व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट व कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक टोमॅटोमध्ये आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
Tomatoes: टोमॅटो हा भारतीय स्वयंपाक घरातील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. भारतीय स्वयंपाकघर टोमॅटोशिवाय अपूर्ण आहे. ही एक भाजी आहे जी बहुतेक घरात दररोज वापरली जाते. टोमॅटो ही कोणत्याही साध्याशा भाजीचीही चव वाढवते. टोमॅटोमध्ये असे भरपूर पोषक घटक (Surprising Health Benefits Of Tomato) आढळतात जे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरवले जातात. व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट व कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक टोमॅटोमध्ये आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
लठ्ठपणा
टोमॅटोमध्ये फायबरचे गुणधर्म असतात. टोमॅटोच्या सेवनाने वजन कमी करता येऊ शकते. एवढेच नाही तर आतडे निरोगी ठेवण्याचेही काम करते. टोमॅटो सॅलड खाल्ल्याने एनर्जी वाढवता येते.
हाडे
टोमॅटोचे सेवन हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन के व कॅल्शियम शरीरातील हाडे व दात मजबूत करण्यास मदत करतात.
रोगप्रतिकार शक्ती
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, लाइकोपीन व बीटा-कॅरोटीन आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतात. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
टोमॅटोला कमीतकमी हजार रुपये प्रति क्विंटल, तर अंदाजे १७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळावा.
टोमॅटो हे फळ किंवा भाजी आहे?
टोमॅटो हे फुलांच्या रोपाच्या पिकलेल्या अंडाशय असतात आण त्यात बिया असतात, त्यामुळे वनस्पतिदृष्ट्या ते फळ आहेत.
हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?
कडबा कुटी मशीन अनुदान योजना 2024
अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा
कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका, अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत