मृत जमीन जीवंत व सुपीक करण्यासाठी सरकारमान्य व दर्जेदार जीवाणु युक्त खते

मृत जमीन जीवंत व सुपीक करण्यासाठी जीवाणु युक्त खते

भारत हा कृषिप्रधान देश आहे. पुरातन काळा पासून इथे शेती केली जाते. अन्नाची गरज भागवण्यासाठी उपजाऊ जमीन म्हणजेच माती महत्वाची ठरते.पृथ्वीवरची सगळीच माती अथवा जमिनीपासून खोलवर ची सगळी माती म्हणजे मृदा नव्हे.माती व मृदा हे शब्द भाषेमध्ये समानार्थी मानले जात असले तरी विज्ञानाच्या अथवा भूगोलाच्या संदर्भात ‘मृदा’ शब्दाला विशेष अर्थ आहे.

वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने जमिनीच्या पृष्ठभागालगत असलेला मातीचा थर महत्वाचा ठरतो.त्या थरांतील कणांचा आकार, पोषक द्रव्यांचे प्रमाण ओलावा इत्यादी गोष्टी तेथे वाढणाऱ्या वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी महत्वाच्या ठरतात.त्यावरच तेथील जमिनीच्या सुपीकपणा ठरतो.हा थर जमिनीमध्ये फार खोलवर नसतो.म्हणूनच पृष्ठभागालगतचा हा थर नष्ट होणार नाही.वाऱ्याने अथवा पावसाने त्याची धूप होणार याची काळजी घ्यावी लागते.पाण्याच्या अतिवापराने या थरातील क्षारांचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढणे रासायनिक खतांच्या वापरामुळे या थरातील काही उपयुक्त सजीव नष्ट होण्याने मातीचा कस अथवा पोत बिघडणे यासारखे दुष्परिणाम होणार नाहीत.यासाठीही नेहमी जागरूक रहावे लागते.

मृत जमीन जीवंत व सुपीक करण्यासाठी जीवाणु युक्त खते

विटा,मातीची भांडी, यांच्या निर्मितीसाठी ही मातीचा वापर होतो.मोठ्या प्रमाणात विस्तारत चाललेली शहरे , अनेक ठिकाणी होत असलेली इमारतींची बांधकामे व शहरांच्या आसपास असलेल्या वीटभट्ट्यांची संख्या पाहीली तरी फक्त वीट निर्मितीसाठी सुध्दा किती प्रचंड प्रमाणात मातीचा वापर होतो.याची जाणीव होते.केवळ पैशांच्या लोभासाठी सुपीक जमिनीतील मातीचा अशा कामांसाठी अतिवापर हा अविचारीपणा नव्हे का?

माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच, परंतु जमिनीचे स्वास्थ्य टिकवण्यासाठासुद्धा मदत होते. जमिनीच्या स्वास्थ्याविषयक समस्यांचे निदान व त्यावरील उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परीक्षणावरच आधरित असते. जमिनीच्या नियोजनासाठी माती परीक्षणाबरोबर मृद सर्वेक्षणामुळे जमिनीची उत्पत्ती, तिचे गुणधर्म काय आहे हे समजते. मृद सर्वेक्षणामुळे जमिनीच्या समस्या व प्रमाण यांची माहिती मिळते. अशा समस्या दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याचे नियोजन व व्यवस्थापन मृद सर्वेक्षणाच्या आधारे करता येते.

●मातीची आवश्यकता

अन्नधान्याच्या ९५ टक्के गरजा मातीतूनच पूर्ण होतात.जंगले वाढविण्यासाठी सुध्दा मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीवर एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात ‘ मातीचा ‘ मुख्य वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची साठविण्याची व शुद्ध करण्याची क्षमता आहे.

●मातीचे प्रकार

मातीचे ६ प्रमुख गट आहेत – १) चिकणमाती, २) वालुकामय माती, ३) सिल्टी माती, ४) पीट माती, ५) वन व पर्वतीय माती, ६) मूरिश लाईट ब्लॅक माती

● मृदा संधारण उपाय

१) वृक्षारोपण – वृक्षांमुळे मृदांचे कण धरून ठेवले जातात. व त्यामुळे मृदेचे वाहत्या पाण्यापासून संरक्षण केले जाते.
२) पिकांची फेरपालट करणे – विविध प्रकारची पिके आलटून पालटून घेणे ज्यामुळे जमिनीची धूप कमी होते.
३) आच्छादने – पिक लहान अवस्थेत असतांना पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप आच्छादनामुळे कमी प्रमाणात होते.तसेच कुरणांमुळे सुधा मृदांवर आच्छादन तयार होते व जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
४) पायऱ्यांची शेती – डोंगराळ भागात जेथे उतारावर शेती केली जाते. त्या जमिनीवर पायऱ्यां तयार करून शेती केल्यास मृदेची धूप कमी होण्यास सहाय्यता होते. याला च‘ सोपान शेती ‘ असे देखील म्हणले जाते.
५) बांध घालणे – उतारावरील शेतीच्या भागात विशिष्ट उतारावर जर बांध घातले गेले तर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणारे मृदेचे थर बांधामुळे अडवले जातील व मृदा सपाट होण्यास मदत होईल.तसेच बांधावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे
जिवाणू खतांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. – एक प्रकारचे जिवाणू खत वातावरणात उपलब्ध नायट्रोजनचे स्थिरीकरण व संचय प्रदान करते व पिकांना उपलब्ध करते. – दुसऱ्या प्रकारच्या जिवाणू खतामुळे जमिनीत विरघळणारा स्फुरद उपलब्ध होतो, म्हणजेच पिकांना उपलब्ध नसतो, विद्राव्य व पिकांना उपलब्ध होतो.

■मृत जमीन जीवंत व सुपीक करण्यासाठी कृषी टेकची सरकारमान्य व दर्जेदार जीवाणुयुक्त खते कोणती?

1)रायझो रीच
रायजोबियम बायोफर्टीलायजर
जैव खत म्हणजे काय?
जैव खते हे असे पदार्थ आहेत ज्यात सूक्ष्म जीव असतात, जे वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा वाढवून झाडे व झाडांच्या वाढीस मदत करतात. त्यात मायकोरायझल बुरशी, निळ्या-हिरव्या शैवाल व बॅक्टेरियासह सजीवांचा समावेश आहे. मायकोरायझल बुरशी प्राधान्याने वनस्पतीसाठी सेंद्रिय पदार्थांपासून खनिजे काढतात तर सायनोबॅक्टेरियामध्ये नायट्रोजन स्थिरीकरणाचा गुणधर्म असतो.

डाय-नायट्रोजन रेणू अमोनियामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणून नायट्रोजन फिक्सेशनची व्याख्या केली जाते. उदाहरणार्थ, काही जीवाणू नायट्रोजनचे अमोनियामध्ये रूपांतर करतात. परिणामी, नायट्रोजन वनस्पतींना उपलब्ध होते.
ते मुक्त-जिवंत मातीचे जीवाणू आहेत जे नायट्रोजनचे निराकरण करतात. ते क्लॉस्ट्रिडियम बेइजेरिंकी, ॲझोटोबॅक्टर इत्यादींसारखे सॅप्रोट्रॉफिक ॲनारोब आहेत.
सर्व प्रकारच्या जैव खतांमध्ये रायझोबियम व अझोस्पिरिलम यांचा सर्वाधिक वापर केला जातो.
जमिनीतून नत्र उपलब्ध झाल्यास हवेतून नत्र स्थिरीकरण मंदावते. मुळावरील गाठींचे प्रमाण कमी जास्त होते. मॉलिब्डेनम्‌ या घटकाचा स्थिरीकरणाशी अन्नोन्य संबंध आहे.
2)अझाटो रीच
एजोटोबॅक्टर बायोफर्टीलायजर
3)फॉस्फोरीच” –
फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टीलायजर
स्फुरद विरघळविण्यासाठी
जमिलीयम डीजीटॉटम तर अनुजीव प्रकारातील बॅसिलस पॉलिमेक्झा व सुडोमोनस ट्रायटा हे स्फुरद विरघळवणार्या जिवाणूंचे कार्यक्षम वाण आहेत. या जिवाणूंचा वापर केल्याने बियांची उगवण चांगली होते. रायझोबियम जिवाणूंची कार्यक्षमता वाढते व पिकांना अधिक नत्र उपलब्ध होते. तसेच पिकांना स्फुरदही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा तसेच सर्व कडधान्य व फुलझाडे इत्यादींना उपयुक्त आहे. 10 किलो बियास 250 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धन चोळावे.
4) के एमबी रीच पोटॅश सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायजर

पालाश प्रवाहित करण्यासाठी
5)कॉम्बीरीच™ (लिक्विड कन्सोर्टिया बायोफर्टिलायजर )
नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करण्यासाठी
6)पी एस एफ रीच (फॉस्फेट सोल्युबलायझिंग फंगल बायोफर्टिलायजर )

स्फुरद विरघळविण्यासाठी

7)झेड एसबी रीच- (झिंक सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायजर) झिंक विरघळविण्यासाठी
मायको झाल
8) मायकोझाल बायोफर्टिलायजर-
– पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी हे खत उपयुक्त आहे.

●खतांची वैशिष्टये कोणती आहे?

●परोपजीवी किडींना अपायकारक नाही.

●जमिनीची सुपिकीता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
●पेरणीपासून काढणीपर्यंत उपयुक्त आहे

●निर्यातीसाठी शेतकऱ्यांना वरदान आहे.
●बिनविषारी व पर्यावरणशील आहे.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring:
Exit mobile version